5 October Dinvishesh


5 October Dinvishesh (५ ऑक्टोबर दिनविशेष) For MPSC / UPSC and Any Competitive Exam. You can use following search box to find out more dinvishesh like 5 October 2022 Dinvishesh by just typing day along with the month number. (eg. If you want to search for 15th August then type 15-08).

जानेवारी
फेब्रुवारी
मार्च
एप्रिल
मे
जून
जुलै
ऑगस्ट
सप्टेंबर
ऑक्टोबर
नोव्हेंबर
डिसेंबर

५ ऑक्टोबर महत्वाच्या घटना

१८६४: भीषण चक्री वादळामुळे कोलकाता शहर उद्धवस्त होऊन सुमारे ६०,००० लोक ठार झाले.

१९१०: पोर्तुगालमधील राजसत्ता संपुष्टात येऊन ते प्रजासत्ताक बनले.

१९४८: अश्गाबात येथील भूकपात सुमारे १,१०,००० लोक ठार झाले.

१९५५: पंडित नेहरुंच्या हस्ते हिंदुस्तान मशिन टूल्स या कारखान्याचे उद्‍घाटन झाले. भारताच्या औद्योगिक विकासात या कारखान्याचे स्थान महत्त्वाचे मानले जाते.

१९६२: डॉ. नो हा पहिला जेम्सबाँड चित्रपट प्रदर्शित झाला.

१९८९: मीरासाहेब फातिमा बिबी या सर्वोच्‍च न्यायालयातील पहिल्या महिला न्यायाधीश बनल्या.

१९९५: कुसुमाग्रज प्रतिष्ठानतर्फे दिला जाणारा जनस्थान पुरस्कार ज्येष्ठ कवयित्री इंदिरा संत यांना जाहीर.

१९९८: डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांना इंदिरा गांधी राष्ट्रीय एकात्मता पुरस्कार जाहीर.

१९४८: IUCN स्थापना

५ ऑक्टोबर जन्म

१८९०: तत्त्वज्ञ व हरिजन चे संपादक किशोरीलाल घनश्यामलाल मशरुवाला यांचा जन्म.

१९२२: लेखक, संपादक यदुनाथ थत्ते यांचा जन्म. (मृत्यू: १० मे १९९८)

१९२२: शंकर-जयकिशन या जोडीतील संगीतकार शंकरसिंग रघुवंशी यांचा जन्म. (मृत्यू: २६ एप्रिल १९८७)

१९२३: गुजरातचे राज्यपाल कैलाशपती मिश्रा यांचा जन्म. (मृत्यू: ३ नोव्हेंबर २०१२)

१९३२: भारतीय क्रिकेटपटू माधव आपटे यांचा जन्म.

१९३६: चेक रिपब्लिकचे पहिले अध्यक्ष वक्लाव हेवल यांचा जन्म. (मृत्यू: १८ डिसेंबर २०११)

१९३९: वॉल्टर वुल्फ रेसिंग चे संस्थापक वॉल्टर वुल्फ यांचा जन्म.

१९६४: भारतीय क्रिकेटपटू सरबिंदू मुखर्जी यांचा जन्म.

१९७५: ब्रिटीश अभिनेत्री केट विन्स्लेट यांचा जन्म.

५ ऑक्टोबर मृत्यू

१९२७: वॉर्नर ब्रदर्स चे सहसंस्थापक सॅम वॉर्नर यांचे निधन. (जन्म: १० ऑगस्ट १८८७)

१९२९: भारतीय पुजारि वर्गीस पायिपिल्ली पलक्कुप्पली यांचे निधन. (जन्म: ८ ऑगस्ट १८७६)

१९८१: पद्मभूषण पुरस्काराने सन्मानित हिन्दी लेखक भगवतीचरण वर्मा यांचे निधन. (जन्म: ३० ऑगस्ट १९०३)

१९८३: टपरवेअर चे संशोधक अर्ल टपर यांचे निधन. (जन्म: २८ जुलै १९०७)

१९९०: नाटककार, समीक्षक व छायावाद परंपरेतील हिन्दी कवी, पद्मभूषण राजकुमार वर्मा यांचे निधन. (जन्म: १५ सप्टेंबर १९०५)

१९९१: इन्डियन एक्सप्रेस वृत्तपत्रसमुहाचे संस्थापक रामनाथ गोएंका यांचे निधन. (जन्म: ३ एप्रिल १९०४)

१९९२: नामवंत मुत्सद्दी, पद्मश्री बॅ. परशुराम भवानराव तथा अप्पासाहेब पंत यांचे निधन.

१९९७: संसदपटू, फॉरवर्ड ब्लॉक चे सरचिटणीस चित्त बसू यांचे निधन. (जन्म: २५ डिसेंबर १९२६)

२०११: अ‍ॅपल कॉम्प्युटर्सचे संस्थापक स्टीव्ह जॉब्ज यांचे निधन. (जन्म: २४ फेब्रुवारी १९५५)

ऑक्टोबर महिन्यातील इतर महत्त्वाच्या आणि विशेष घटना

NMK
सिंगापूर येथे आझाद हिन्द सेनेची स्थापना.
NMK
संयुक्त राष्ट्रांची (United Nations) स्थापना झाली.
NMK
मोहनदास करमचंद गांधी उर्फ महात्मा गांधी यांचा पोरबंदर गुजरात येथे जन्म.
NMK
भारतरत्न लालबहादूर शास्त्री यांचा मुगलसराई उत्तरप्रदेश येथे जन्म. (मृत्यू: ११ जानेवारी १९६६)
NMK
स्वातंत्र्यसैनिक लोकनायक जयप्रकाश नारायण यांचा जन्म. (मृत्यू: ८ ऑक्टोबर १९७९ – पाटणा, बिहार)
NMK
वैज्ञानिक आणि भारताचे ११ वे राष्ट्रपती अवुल पाकिर जैनुलब्दीन उर्फ ए. पी. जे. अब्दुल कलाम यांचा जन्म. (मृत्यू: २५ जुलै २०१५)
NMK
भारतरत्‍न (मरणोत्तर) स्वतंत्र भारताचे पहिले उपपंतप्रधान सरदार वल्लभभाई पटेल यांचा जन्म. (मृत्यू: १५ डिसेंबर १९५०)
NMK
IUCN स्थापना
NMK
वन्यजीव सप्ताह
NMK
राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाची स्थापना.
NMK
महिलांचे कौटुंबिक हिंसाचारापासून संरक्षण प्रतिबंधक नियम अंमलात.