17 NOVEMBER DINVISHESH: Check all the latest november dinvishesh like birth, death and important events from MahaNMK.com. November Important Events is the special category which may help you in your MPSC / UPSC / Competitive exams.
नोव्हेंबर दिनविशेष : "आता स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करणं झालं सोप्पं" MahaNMK आपल्यासाठी घेऊन आले आहेत Dinvishesh, सर्व महत्वाच्या दिनविशेष आपल्याला एकाच ठिकाणी उपलब्ध करून देण्यासाठी आम्ही हा नवीन उपक्रम राबवला आहे.

महत्वाच्या घटना (17 NOVEMBER)
17 नोव्हेंबर 1831: ग्रॅन कोलंबिया या प्रांताचे विभाजन होऊन इक्वेडोर व व्हेनेझुएला असे दोन देश अस्तित्त्वात आले.
17 नोव्हेंबर 1869: भूमध्य समुद्र व लाल समुद्र यांना जोडणार्या सुएझ कालव्याचे उद्घाटन झाले. या कालव्याचे बांधकाम मात्र १० वर्षे आधीच पूर्ण झाले होते.
17 नोव्हेंबर 1932: तिसर्या गोलमेज परिषदेची सुरूवात झाली.
17 नोव्हेंबर 1933: अमेरिकेने सोविएत युनियनला मान्यता दिली.
17 नोव्हेंबर 1950: ल्हामो डोंड्रब हे अधिकृतपणे १४वे दलाई लामा बनले.
17 नोव्हेंबर 1992: देवरुख येथील मातृमंदिर संस्थेच्या संस्थापिका इंदिराबई हळबे यांची जीवनगौरव पुरस्कारासाठी निवड.
17 नोव्हेंबर 1992: महाराष्ट्र कामगार साहित्य परिषदेचे अध्यक्ष हरी नरके यांना दिल्ली येथील भारतीय दलित साहित्य अकादमीची फेलोशिप जाहीर.
17 नोव्हेंबर 1994: रशियाच्या मीर या अंतराळस्थानकाने पृथ्वीभोवती ५०,००० फेर्या पूर्ण करून नवा विक्रम केला.
17 नोव्हेंबर 1996: पुणे येथील राष्ट्रीय रासायनिक प्रयोगशाळेच्या (NCL) सेन्द्रिय रसायनशास्त्र विभागाचे प्रमुख डॉ. के. एन. गणेश यांची अहमदाबादच्या नॅशनल अॅकेडमी ऑफ सायन्सेस चे फेलो म्हणून निवड.
जन्म (17 NOVEMBER)
17 नोव्हेंबर 9: रोमन सम्राट व्हेस्पासियन यांचा जन्म. (मृत्यू: २३ जून ००७९)
17 नोव्हेंबर 1749: कॅनिंग चे निर्माते निकोलस एपर्टीट यांचा जन्म. (मृत्यू: १ जून १८४१)
17 नोव्हेंबर 1755: फ्रान्सचा राजा जन्म लुई (अठरावा) यांचा जन्म. (मृत्यू: १६ सप्टेंबर १८२४)
17 नोव्हेंबर 1901: युरोपियन कमिशनचे पहिले अध्यक्ष वॉल्टर हॉलस्टेन यांचा जन्म. (मृत्यू: २९ मार्च १९८२)
17 नोव्हेंबर 1906: होंडा मोटर कंपनी चे सहसंस्थापक सोईचिरो होंडा यांचा जन्म. (मृत्यू: ५ ऑगस्ट १९९१)
17 नोव्हेंबर 1920: भारतीय अभिनेते आणि दिग्दर्शक मिथुन गणेशन यांचा जन्म. (मृत्यू: २२ मार्च २००२)
17 नोव्हेंबर 1923: केप व्हर्दे देशाचे पहिले अध्यक्ष अरिसिदास परेरा यांचा जन्म. (मृत्यू: २२ सप्टेंबर २०११)
17 नोव्हेंबर 1925: अमेरिकन अभिनेता रॉक हडसन यांचा जन्म. (मृत्यू: २ ऑक्टोबर १९८५)
17 नोव्हेंबर 1932: अभिनेत्री शकुंतला महाजन तथा बेबी शकुंतला यांचा जन्म. (मृत्यू: १८ जानेवारी २०१५ – कोल्हापूर)
17 नोव्हेंबर 1938: लेखक, नाटककार, निर्माते रत्नाकर मतकरी यांचा जन्म.
17 नोव्हेंबर 1982: भारतीय क्रिकेटपटू युसूफ पठाण यांचा जन्म.
मृत्यू (17 NOVEMBER)
17 नोव्हेंबर 1812: द टाईम्स वृत्तपत्र चे संस्थापक जॉन वॉल्टर यांचे निधन.
17 नोव्हेंबर 1828: स्वातंत्र्यसेनानी पंजाब केसरी लाला लजपतराय यांचे निधन. (जन्म: २८ जानेवारी १८६५)
17 नोव्हेंबर 1931: संस्कृत विद्वान, शिक्षणतज्ञ, इतिहासकार हरप्रसाद शास्त्री यांचे निधन. (जन्म: ६ डिसेंबर १८५३)
17 नोव्हेंबर 1935: भारत सेवक समाजाचे (Servants of India Society) एक संस्थापक सदस्य गोपाळ कृष्ण देवधर यांचे निधन. (जन्म: २१ ऑगस्ट १८७१)
17 नोव्हेंबर 1961: साहित्यिक व समीक्षक कुसुमावती आत्माराम देशपांडे यांचे निधन. (जन्म: १० नोव्हेंबर १९०४)
17 नोव्हेंबर 2003: भारतीय गायक सुरजित बिंद्राखिया यांचे निधन. (जन्म: १५ एप्रिल १९६२)
17 नोव्हेंबर 2012: हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांचे निधन. (जन्म: २३ जानेवारी १९२६)
17 नोव्हेंबर 2012: भारतीय उद्योगपती पॉंटि चड्डा यांचे निधन. (जन्म: २२ ऑक्टोबर १९५७)
17 नोव्हेंबर 2015: विश्व हिंदू परिषदेचे अध्यक्ष अशोक सिंघल यांचे निधन.
17 नोव्हेंबर 2015: कर्नल संतोष महाडिक कुपवाडा श्रीनगर येथे कोम्बिंग ऑपरेशनचे नेतृत्व करताना शहीद.
नोव्हेंबर महिन्यातील दिनविशेष
नोव्हेंबर महिन्यातील महत्त्वाच्या आणि विशेष घटना
भारताचे पहिले पंतप्रधान पं. जवाहरलाल नेहरू यांचा जन्म. (मृत्यू: २७ मे १९६४)दिनांक : 14 नोव्हेंबर 1889
झारखंड हे २८ वे राज्य तयार झाले.दिनांक : 15 नोव्हेंबर 2000
युनेस्को (UNESCO) ची स्थापना झाली.दिनांक : 16 नोव्हेंबर 1945
डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या हस्ते शिवाजी विद्यापीठाचे उद्घाटन झाले.दिनांक : 18 नोव्हेंबर 1962
उत्तराखंड उच्च न्यायालयाची स्थापना.दिनांक : 9 नोव्हेंबर 2000
स्वातंत्र्य चळवळीतील नेते चित्तरंजन दास यांचा जन्म. (मृत्यू: १६ जून १९२५)दिनांक : 5 नोव्हेंबर 1870
द्विभाषिक मुंबई राज्याची निर्मितीदिनांक : 1 नोव्हेंबर 1956
डॉ. भाऊ दाजी लाड जन्मदिन.दिनांक : 7 नोव्हेंबर 1824
उत्तराखंड राज्याची निर्मिती.दिनांक : 9 नोव्हेंबर 2000
राष्ट्रीय एकत्मता दिन.दिनांक : 19 नोव्हेंबर 2013
इंदिरा गांधी यांचा जन्म दिवस.दिनांक : 19 नोव्हेंबर 1917
संयुक्त राष्ट्र विकास कार्यक्रम (UNDP) स्थापना झाली.दिनांक : 22 नोव्हेंबर 1965
संविधान दिन.दिनांक : 26 नोव्हेंबर 1949