24 December Dinvishesh


24 December Dinvishesh (२४ डिसेंबर दिनविशेष) For MPSC / UPSC and Any Competitive Exam. You can use following search box to find out more dinvishesh like 24 December 2022 Dinvishesh by just typing day along with the month number. (eg. If you want to search for 15th August then type 15-08).

जानेवारी
फेब्रुवारी
मार्च
एप्रिल
मे
जून
जुलै
ऑगस्ट
सप्टेंबर
ऑक्टोबर
नोव्हेंबर
डिसेंबर

२४ डिसेंबर महत्वाच्या घटना

१७७७: कॅप्टन जेम्स कूक यांनी प्रशांत महासागरातील किरितीमती बेटांचा शोध लावला.

१९०६: रेजिनाल्ड फेसेंडेन यांनी प्रथमच एक कवितावाचन, व्हायोलिनवादन आणि एक भाषण यांचे रेडिओ प्रक्षेपण केले.

१९१०: स्वातंत्र्यवीर सावरकर यांना जन्मठेपेची व काळ्यापाण्याची शिक्षा.

१९२४: अल्बानिया या देशाला स्वातंत्र्य मिळाले.

१९४३: दुसरे महायुद्ध – जनरल ड्वाईट आयसेनहॉवर हे दोस्त राष्ट्रांच्या फौजांचे सरसेनापती बनले.

१९५१: लिबीया हा देश ईटलीकडून स्वतंत्र झाला.

१९७९: सोविएत युनियनने अफगणिस्तानवर आक्रमण केले.

१९९९: काठमांडू येथून नवी दिल्लीला येणार्‍या इंडियन एअरलाइन्स फ्लाईट ८१४ या विमानाचे तालिबानी अतिरेक्यांनी अपहरण करुन ते विमान अफगणिस्तानातील कंदाहार येथे नेले.

२०१६: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते अरबी समुद्रात उभारल्या जाणाऱ्या छत्रपती शिवस्मारकाचे जलपूजन आणि भूमिपूजन करण्यात आले.

१९८६: भारतीय ग्राहक दिन.

२४ डिसेंबर जन्म

११६६: इंग्लंडचा राजा जॉन यांचा जन्म. (मृत्यू: १९ ऑक्टोबर १२१६)

१८१८: ब्रिटिश पदार्थ वैज्ञानिक जेम्स प्रेस्कॉट ज्यूल यांचा जन्म. (मृत्यू: ११ ऑक्टोबर १८८९)

१८६४: ओडिया लेखक, संपादक व समाजसुधारक विश्वनाथ कार यांचा जन्म. (मृत्यू: १९ ऑक्टोबर १९३४)

१८८०: स्वातंत्र्यसैनिक, इतिहासकार आणि काँग्रेसचे नेते डॉ. भोगराजू पट्टाभी सीतारामय्या यांचा जन्म. (मृत्यू: १७ डिसेंबर १९५९)

१८९९: नामवंत साहित्यिक, बालसाहित्यिक, समाजवादी नेते, समाजसुधारक व स्वातंत्र्यसैनिक पांडुरंग सदाशिव साने ऊर्फ साने गुरूजी यांचा जन्म. (मृत्यू: ११ जून १९५०)

१९१०: हेल्वेस्टिका फॉन्ट निर्माते मॅक्स मिईदींगर यांचा जन्म. (मृत्यू: ८ मार्च १९८०)

१९२४: पार्श्वगायक मोहम्मद रफी यांचा जन्म. (मृत्यू: ३१ जुलै १९८० – मुंबई)

१९३२: भारतीय-इंग्लिश क्रिकेटपटू कॉलिन काऊड्रे यांचा जन्म. (मृत्यू: ४ डिसेंबर २०००)

१९४२: भारतीय अभिनेते, दिग्दर्शक, नाटककार इंद्र बानिया यांचा जन्म. (मृत्यू: २५ मार्च २०१५)

१९५७: अफगाणिस्तानचे राष्ट्राध्यक्ष हमीद करझाई यांचा जन्म.

१९५९: : हिन्दी चित्रपट कलाकार अनिल कपूर यांचा जन्म.

२४ डिसेंबर मृत्यू

१५२४: पोर्तुगीज दर्यावर्दी वास्को द गामा यांचे निधन.

१९६७: बास्किन-रोबिन्स चे सहसंस्थापक बर्ट बास्कीन यांचे निधन. (जन्म: १७ डिसेंबर १९१३)

१९९३: स्वातंत्र्यसैनिक, समाजसुधारक पेरीयार ई. व्ही. रामस्वामी यांचे निधन. (जन्म: १७ सप्टेंबर १८७९)

१९७७: आसामी कवयित्री व लेखिका नलिनीबाला देवी यांचे निधन. (जन्म: २३ मार्च १८९८)

१९८७: अभिनेते व तामिळनडुचे मुख्यमंत्री एम. जी. रामचंद्रन यांचे निधन. (जन्म: १७ जानेवारी १९१७)

१९८८: भारतीय लेखक जैनेंद्र कुमार यांचे निधन. (जन्म: २ जानेवारी १९०५)

१९९९: नायकी इंक चे सहसंस्थापक बिल बोरमन यांचे निधन. (जन्म: १९ फेब्रुवारी १९११)

२०००: कूपर कार कंपनीचे सहसंस्थापक जॉन कूपर यांचे निधन. (जन्म: १७ जुलै १९२३)

२००५: तामिळ व तेलगू चित्रपटांतील अभिनेत्री, दिग्दर्शक, निर्माती, गीतकार, संगीतकार, गायिका व लेखिका भानुमती रामकृष्ण यांचे निधन. (जन्म: ७ सप्टेंबर १९२५)

डिसेंबर महिन्यातील इतर महत्त्वाच्या आणि विशेष घटना

NMK
भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे निधन. (जन्म: १४ एप्रिल १८९१)
NMK
सार्क परिषदेची स्थापना.
NMK
दिल्लीमध्ये घटना परिषदेची पहिली बैठक.
NMK
युनिसेफ (UNICEF) ची स्थापना.
NMK
थोर भारतीय गणिती श्रीनिवास रामानुजन यांचा जन्म. (मृत्यू: २६ एप्रिल १९२०)
NMK
२८ देशांनी एकत्रित जागतिक बँक (World Bank) आणि आंतरराष्ट्रीय नाणेनिधी (International Monetary Fund) स्थापन केले.
NMK
जागतिक एड्स दिन.
NMK
राष्ट्रीय प्रदूषण नियंत्रण दिवस.
NMK
जागतिक अपंग दिन.
NMK
सुगम्य भारत अभियान.
NMK
भारतीय नौसेना दिवस.
NMK
जागतिक मृदा दिन.
NMK
मानवी हक्क दिन.
NMK
UNHCR ची स्थापना.
NMK
गोवा मुक्ती दिन.
NMK
भारतीय ग्राहक दिन.
NMK
मुस्लिम लिगची स्थापना.