9 November Dinvishesh


9 November Dinvishesh (९ नोव्हेंबर दिनविशेष) For MPSC / UPSC and Any Competitive Exam. You can use following search box to find out more dinvishesh like 9 November 2022 Dinvishesh by just typing day along with the month number. (eg. If you want to search for 15th August then type 15-08).

जानेवारी
फेब्रुवारी
मार्च
एप्रिल
मे
जून
जुलै
ऑगस्ट
सप्टेंबर
ऑक्टोबर
नोव्हेंबर
डिसेंबर

९ नोव्हेंबर महत्वाच्या घटना

१९०६: आपल्या कार्यकालात देशाबाहेर जाणारे थिओडोर रुझव्हेल्ट हे अमेरिकेचे पहिले राष्ट्राध्यक्ष बनले. त्यांनी पनामा कालव्याला भेट दिली.

१९२३: दिनचर्या नावाचे एक पत्र दतात्रय गणेशजी यांनी पुण्यात सुरु केले.

१९३७: जपानी सैन्याने चीनमधील शांघाय शहराचा ताबा घेतला.

१९४७: भारत सरकारने जूनागढ संस्थान बरखास्त करुन ताब्यात घेतले.

१९५३: कंबोडियाला फ्रान्सपासुन स्वातंत्र्य मिळाले.

१९६०: रॉबर्ट मॅकनामारा हे फोर्ड मोटर कंपनीचे अध्यक्ष बनले.

१९६५: इलेक्ट्रिसिटी ग्रिड खराब झाल्याने न्यूयॉर्क शहरासह पूर्व अमेरिकेतील बर्‍याच भागाचा वीजपुरवठा १२ तास खंडित झाला.

१९६७: रोलिंग स्टोन मासिकांचा पहिला अंक प्रकाशित झाला.

१९८८: मुंबईतील भारत पेट्रोलियमच्या शुद्धीकरण संकुलातील दुर्घटना, भीषण आगीत १२ जण मृत्युमुखी.

१९९७: साहित्यिक गंगाधर गाडगीळ यांना कुसुमाग्रज प्रतिष्ठान चा जनस्थान पुरस्कार प्रदान.

२०००: उत्तराखंड उच्‍च न्यायालयाची स्थापना.

२०००: न्यूयॉर्क येथे झालेल्या एका लिलावात पाब्लो पिकासो यांचे एक चित्र पाच कोटी छप्पन्न लाख डॉलरला विकले गेले. पिकासोच्या चित्रासाठी मिळालेली ही विक्रमी किंमत आहे.

२०००: उत्तराखंड राज्याची निर्मिती.

९ नोव्हेंबर जन्म

१८०१: आटवलेल्या दुधाचे शोधक गेल बोर्डन यांचा जन्म. (मृत्यू: ११ जानेवारी १८७४)

१८६७: जैन तत्त्वज्ञानी, विद्वान, कवी श्रीमद राजचंद्र यांचा जन्म. (मृत्यू: ९ एप्रिल १९०१)

१८७७: इटली प्रजास्ताक चे पहिले अध्यक्ष इरिको डी निकोला यांचा जन्म. (मृत्यू: १ ऑक्टोबर १९५९)

१८७७: सारे जहाँन से अच्छा चे पाकिस्तानी कवी, तत्त्वज्ञ आणि राजकीय नेते कवी मोहम्मद इक़्बाल यांचा जन्म. (मृत्यू: २१ एप्रिल १९३८)

१९०४: सपुष्प वनस्पतींतील पुनरुत्पादन क्रियेसंबंधी संशोधन करणारे वनस्पतीशास्त्रज्ञ पंचानन माहेश्वरी यांचा जन्म. (मृत्यू: १८ मे १९६६)

१९१८: तायक्वोंडो मार्शल आर्ट चे निर्माते चोई हाँग हाय यांचा जन्म. (मृत्यू: १५ जून २००२)

१९२४: ख्यालगायक, गुरु व बंदिशकार पं. चिंतामणी रघुनाथ तथा सी. आर. व्यास यांचा जन्म. (मृत्यू: १० जानेवारी २००२)

१९३१: लोकसभा सदस्य, कायदेपंडित, विद्वान, मुत्सद्दी व भारताचे इंग्लंडमधील राजदूत एल. एम. सिंघवी यांचा जन्म. (मृत्यू: ६ ऑक्टोबर २००७)

१९३४: अमेरिकन अंतराळतज्ञ, लेखक व विज्ञानप्रसारक कार्ल सगन यांचा जन्म. (मृत्यू: २० डिसेंबर १९९६- सिअ‍ॅटल, वॉशिंग्टन, यु. एस. ए.)

१९४४: भारतीय कोरिओग्राफर चितेश दास यांचा जन्म. (मृत्यू: ४ जानेवारी २०१५)

१९८०: अभिनेत्री व मॉडेल पायल रोहतगी यांचा जन्म.

९ नोव्हेंबर मृत्यू

१९४०: इंग्लंडचे पंतप्रधान नेव्हिल चेंबरलेन यांचे निधन. (जन्म: १८ मार्च १८६९)

१९५२: इस्त्राएलचे पहिले राष्ट्राध्यक्ष चेम वाइझमॅन यांचे निधन. (जन्म: २७ नोव्हेंबर १८७४)

१९६२: भारतरत्न पुरस्कार विजेते धोंडो केशव कर्वे यांचे निधन. (जन्म: १८ एप्रिल १८५८)

१९६७: मराठी रंगभूमीचे खलनायक व चित्रपट अभिनेते बाबुराव पेंढारकर यांचे निधन.

१९७०: फ्रेंच राष्ट्राध्यक्ष आणि सेनापती चार्ल्स द गॉल यांचे निधन. (जन्म: २२ नोव्हेंबर १८९०)

१९७७: सुप्रसिद्ध संगीत समीक्षक, संगीतकार, संगीत दिगदर्शक व लेखक केशवराव भोळेे यांचे निधन. (जन्म: २३ मे १८९६)

२०००: मिस वर्ल्ड स्पर्धेचे निर्माते एरिक मॉर्ले यांचे निधन. (जन्म: २६ सप्टेंबर १९१८)

२००३: मैथिली भाषेतील लेखक व कवी विनोद बिहारी वर्मा यांचे निधन.

२००५: भारताचे १०वे राष्ट्रपती के. आर. नारायणन यांचे निधन. (जन्म: २७ ऑक्टोबर १९२०)

२०११: भारतीय-अमेरिकन नोबेल पारितोषिक विजेते हर गोविंद खुराना यांचे निधन. (जन्म: ९ जानेवारी १९२२)

नोव्हेंबर महिन्यातील इतर महत्त्वाच्या आणि विशेष घटना

NMK
भारताचे पहिले पंतप्रधान पं. जवाहरलाल नेहरू यांचा जन्म. (मृत्यू: २७ मे १९६४)
NMK
झारखंड हे २८ वे राज्य तयार झाले.
NMK
युनेस्को (UNESCO) ची स्थापना झाली.
NMK
डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या हस्ते शिवाजी विद्यापीठाचे उद्‍घाटन झाले.
NMK
उत्तराखंड उच्‍च न्यायालयाची स्थापना.
NMK
स्वातंत्र्य चळवळीतील नेते चित्तरंजन दास यांचा जन्म. (मृत्यू: १६ जून १९२५)
NMK
द्विभाषिक मुंबई राज्याची निर्मिती
NMK
डॉ. भाऊ दाजी लाड जन्मदिन.
NMK
उत्तराखंड राज्याची निर्मिती.
NMK
राष्ट्रीय एकत्मता दिन.
NMK
इंदिरा गांधी यांचा जन्म दिवस.
NMK
संयुक्त राष्ट्र विकास कार्यक्रम (UNDP) स्थापना झाली.
NMK
संविधान दिन.