16 October Dinvishesh

16 October Dinvishesh (१६ ऑक्टोबर दिनविशेष) For MPSC / UPSC and Any Competitive Exam. You can use following search box to find out more dinvishesh like 16 October 2024 Dinvishesh by just typing day along with the month number. (eg. If you want to search for 15th August then type 15-08).

आपल्या मित्रांना पाठवा :

१६ ऑक्टोबर महत्वाच्या घटना

संपूर्ण दिनविशेष दिनदर्शिकायेथे क्लिक करा आणि लगेच डाऊनलोड करा आपल्या मोबाईल / कॉम्पुटर मध्ये. (75% Discount)
१७७५: ब्रिटिश सैन्याने अमेरिकेच्या मेन राज्यातील पोर्टलँड शहर जाळले.
१७९३: फ्रेन्च राज्यक्रांती – फ्रान्सचा राजा सोळावा लुई याची विधवा पत्‍नी मेरी अ‍ॅंटोनिएत हिचा गिलोटीनवर वध करण्यात आला.
१८४६: डॉ. जॉन वॉरेन या अमेरिकन डॉक्टरने शस्त्रक्रिया करताना भूल देण्यासाठी सर्वप्रथम इथर या रसायनाचा वापर केला.
१८६८: डेन्मार्कने निकोबार बेटांचे सर्व हक्‍क ब्रिटिशांना विकले.
१९०५: भारताचे व्हॉइसरॉय लॉर्ड कर्झन यांनी बंगालची फाळणी करण्याचा आदेश दिला.
१९२३: वॉल्ट डिस्‍ने आणि त्याचा भाऊ रॉय डिस्‍ने यांनी द वॉल्ट डिस्‍ने कंपनी ची स्थापना केली.
१९५१: पाकिस्तानचे पहिले पंतप्रधान लियाकत अली खान यांची रावळपिंडी येथे हत्या करण्यात आली.
१९६८: हर गोविंद खुराना यांना नोबेल पारितोषिक प्रदान.
१९७३: हेन्‍री किसिंजर आणि ली डक थो यांना नोबेल शांति पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
१९७५: बांगला देशातील रहिमा बानू ही २ वर्षांची मुलगी ही देवी रोगाचा जगातील शेवटचा रुग्ण ठरली.
१९७८: माऊंट एव्हरेस्टच्या शिखरावर पोहोचण्यासाठी वांडा रुटकिविझ पहिल्या युरोपियन महिला आहे.
१९८४: आर्चबिशप डेसमंड टुटू यांना नोबेल शांति पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
१९८६: ८००० मीटर पेक्षा उच्च असणारी १४ शिखरे सर करणारे रिइनॉल्ड मेस्नर हे पहिली व्यक्ती ठरले.
१९९९: जागतिक व्यावसायिक बिलियर्ड्‌स, स्‍नूकर संघटनेतर्फे वर्षातील सर्वोत्कृष्ट बिलियर्ड्‌स खेळाडूसाठी दिला जाणारा फ्रेड डेव्हिस पुरस्कार भारताच्या गीत सेठीला देण्यात आला.

१६ ऑक्टोबर जन्म

संपूर्ण दिनविशेष दिनदर्शिकायेथे क्लिक करा आणि लगेच डाऊनलोड करा आपल्या मोबाईल / कॉम्पुटर मध्ये. (75% Discount)
१६७०: शिख सेनापती बंदा सिंग बहादूर यांचा जन्म. (मृत्यू: ९ जून १७१६)
१८४१: जपानचे पहिले पंतप्रधान इटो हिरोबुमी यांचा जन्म. (मृत्यू: २६ ऑक्टोबर १९०९)
१८४४: अल्बेनिया देशाचे पहिले पंतप्रधान इस्माईल क्यूम्ली यांचा जन्म. (मृत्यू: २४ जानेवारी १९१९)
१८५४: आयरिश लेखक व नाटककार ऑस्कर वाईल्ड यांचा जन्म. (मृत्यू: ३० नोव्हेंबर १९००)
१८८६: इस्राईल देशाचे पहिले पंतप्रधान डेव्हिड बेन-गुरीयन यांचा जन्म.
१८९०: वार्ताहर, संपादक, थोर समाजसुधारक आणि नाटिका संप्रदायाचे प्रवर्तक अनंत हरी गद्रे तथा समतानंद यांचा जन्म. (मृत्यू: ३ सप्टेंबर १९६७)
१८९६: स्वातंत्र्यसैनिक, लोकसभेचे हंगामी सभापती, साहित्यिक सेठ गोविंद दास यांचा जन्म. (मृत्यू: १८ जून १९७४)
१९०७: कवी, कवयित्री बहिणाबाई चौधरी यांचे पुत्र सोपानदेव चौधरी यांचा जन्म. (मृत्यू: ४ ऑक्टोबर १९८२)
१९२६: केबल विजन आणि एचबीओ चे संस्थापक चार्ल्स डोलन यांचा जन्म.
१९४८: अभिनेत्री, दिग्दर्शिका, निर्माती, भरतनाट्यम नर्तिका आणि नृत्यदिग्दर्शक हेमा मालिनी यांचा जन्म.
१९४९: भारतीय अभिनेते, पटकथालेखक आणि नाटककार क्रेझी मोहन यांचा जन्म.
१९५९: मराठी चित्रपट निर्माते व दिग्दर्शक आणि अखिल भारतीय चित्रपट महामंडळाचे अध्यक्ष अजय सरपोतदार यांचा जन्म. (मृत्यू: ३ जून २०१०)
१९८२: भारतीय अभिनेते, गायक आणि निर्माता पृथ्वीराज सुकुमारन यांचा जन्म.
२००३: नेपाळची राजकन्या कृत्तिका यांचा जन्म.

१६ ऑक्टोबर मृत्यू

संपूर्ण दिनविशेष दिनदर्शिकायेथे क्लिक करा आणि लगेच डाऊनलोड करा आपल्या मोबाईल / कॉम्पुटर मध्ये. (75% Discount)
१७९३: फ्रेन्च सम्राज्ञी मेरी आंत्वानेत यांचे निधन. (जन्म: २ नोव्हेंबर १७५५)
१७९९: भारतीय स्वातंत्र्यसैनिक वीरपदिया कट्टाबोम्मन यांचे निधन. (जन्म: ३ जानेवारी १७६०)
१९०५: आध्यात्मिक गुरू पंत महाराज बाळेकुन्द्री यांचे निधन. (जन्म: ३ सप्टेंबर १८५५)
१९४४: उद्योजक, प्रभाकर कंदिलचे निर्माते गुरुनाथ प्रभाकर ओगले यांचे निधन.
१९४८: नाटककार माधव नारायण तथा माधवराव जोशी यांचे निधन.
१९५०: अनाथ विद्यार्थी गृहाचे एक संस्थापक वि. गं. तथा दादासाहेब केतकर यांचे निधन.
१९५१: पाकिस्तानचे पहिले पंतप्रधान लियाकत अली खान यांची भर सभेत गोळ्या घालून हत्या. (जन्म: १ ऑक्टोबर १८९५)
१९८१: इस्त्रायलचे परराष्ट्रमंत्री, कृषीमंत्री आणि संरक्षणमंत्री, इस्रायली सेना प्रमुख मोशे दायान यांचे निधन. (जन्म: २० मे १९१५)
१९९७: मराठी चित्रपटसृष्टीतील छायालेखक दत्ता गोर्ले यांचे निधन.
२००२: लेखक नागनाथ संतराम तथा ना. सं. इनामदार यांचे निधन. (जन्म: २३ नोव्हेंबर १९२३)
२०१३: भारतीय नाटककार गोविंद पुरुषोत्तम देशपांडे यांचे निधन.

ऑक्टोबर महिन्यातील महत्त्वाच्या आणि विशेष घटना

NMK

दिनांक : २१ ऑक्टोबर १९४३

NMK

दिनांक : २४ ऑक्टोबर १९४५

NMK

दिनांक : २ ऑक्टोबर १८६९

NMK

दिनांक : २ ऑक्टोबर १९०४

NMK

दिनांक : ११ ऑक्टोबर १९०२

NMK

दिनांक : १५ ऑक्टोबर १९३१

NMK

दिनांक : ३१ ऑक्टोबर १८७५

NMK

दिनांक : ५ ऑक्टोबर १९४८

NMK

दिनांक : ८ ऑक्टोबर १९७२

NMK

दिनांक : १२ ऑक्टोबर १९९३

NMK

दिनांक : २६ ऑक्टोबर २००६

आपल्या मित्रांना पाठवा :
Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.