24 September Dinvishesh

24 September Dinvishesh (२४ सप्टेंबर दिनविशेष) For MPSC / UPSC and Any Competitive Exam. You can use following search box to find out more dinvishesh like 24 September 2023 Dinvishesh by just typing day along with the month number. (eg. If you want to search for 15th August then type 15-08).

२४ सप्टेंबर महत्वाच्या घटना

१६६४: नेदरलँड्सने न्यू ऍम्स्टरडॅम इंग्लंडच्या हवाली केले.
१८७३: महात्मा फुले यांनी सत्यशोधक समाजाची स्थापना केली.
१९३२: पुणे करारावर महात्मा गांधी, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, पं. मदनमोहन मालवीय, बॅ. मुकुंदराव जयकर आदींच्या सह्या.
१९४६: हाँगकाँग येथे कॅथे पॅसिफिक एअरवेज ची स्थापना झाली.
१९४८: होंडा मोटार कंपनीची स्थापना.
१९६०: अणुशक्तीवर चालणाऱ्या यू. एस. एस. एंटरप्राइझ या जगातील पहिल्या विमानवाहू नौकेचे जलावतरण झाले.
१९७३: गिनी-बिसाऊला पोर्तुगालपासून स्वातंत्र्य.
१९९४: सॅटॅनिक व्हर्सेस या कादंबरीचे वादग्रस्त लेखक डॉ. सलमान रश्दी यांच्यावरील मृत्युदंडाचा फतवा मागे.
१९९५: मृत्यूंजय कादंबरीसाठी शिवाजी सावंत यांना भारतीय ज्ञानपीठ या संस्थेतर्फे मूर्तिदेवी पुरस्कार जाहीर झाला. हा पुरस्कार मिळवणारे ते पहिलेच मराठी लेखक आहेत.
१९९९: कैगा अणूशक्ती प्रकल्पाचे दुसरे युनिट कार्यान्वित झाले.
२००७: कर्णधार धोनीच्या नेतृवाखाली भारताने टी-२० विश्वकप जिंकला.
२०१४: मार्स ऑर्बिटरी मिशन (एमओएम) – भारतीय अंतराळ संशोधन संस्थेद्वारे (इसरो) प्रक्षेपण केलेल्या मार्स ऑर्बिटर ने मार्स ची कक्षा ओलांडली.
२०१५: मक्का शहरात हज चालू असताना चेंगराचेंगरीत ७१७ लोक ठार.

२४ सप्टेंबर जन्म

१५३४: शिखांचे ४ थे गुरू गुरू राम दास यांचा जन्म. (मृत्यू: १ सप्टेंबर १५८१)
१५५१: प्रचंड कवी दासो दिगंबर देशपांडे ऊर्फ दासोपंत यांचा जन्म. (मृत्यू: २८ जानेवारी १६१६)
१८६१: भारतीय क्रांतिकारक मॅडम भिकाजी रुस्तुम कामा यांचा जन्म. (मृत्यू: १३ ऑगस्ट १९३६)
१८७०: नीऑन लाईट चे संशोधक जॉर्जेस क्लॉड यांचा जन्म. (मृत्यू: २३ मे १९६०)
१८८९: चित्रपट व रंगभूमीवरील अभिनेते, नाट्यशिक्षक केशवराव त्र्यंबक दाते यांचा जन्म. (मृत्यू: १३ सप्टेंबर १९७१ – मुंबई)
१८९८: प्राच्यविद्यापंडित अनंत सदाशिव अळतेकर यांचा जन्म. (मृत्यू: २५ नोव्हेंबर १९६०)
१९०२: इराणी धर्मगुरु आणि राजकारणी रुहोलह खोमेनी यांचा जन्म. (मृत्यू: ३ जून १९८९)
१९११: रशियातील कम्युनिस्ट पक्षाचे सचिव कॉन्स्टंटिन चेरेनेन्को यांचा जन्म. (मृत्यू: १० मार्च १९८५)
१९१५: चित्रपट व रंगभूमीवरील कलावंत प्रभाकर शंकर मुजूमदार यांचा जन्म.
१९२१: लेखक, समीक्षक व संपादक डॉ. सखाराम गंगाधर मालशे यांचा जन्म. (मृत्यू: ७ जून १९९२)
१९२२: सोबत साप्ताहिकाचे संस्थापक, संपादक व साहित्यिक गजानन वासुदेव तथा ग. वा. बेहेरे यांचा जन्म. (मृत्यू: ३० ऑगस्ट १९८९)
१९२४: अकाली दलाचे नेते आणि शिरोमणी गुरुद्वारा प्रबंधक समितीचे अध्यक्ष गुरू चरणसिंग तोहरा यांचा जन्म. (मृत्यू: ३१ मार्च २००४)
१९२५: भारतीय विज्ञान आणि शैक्षणिक लेखक ऑटो सिंग पेंटल यांचा जन्म. (मृत्यू: २१ डिसेंबर २००४)
१९३६: भारतीय उद्योजिक शिवती आदितन यांचा जन्म. (मृत्यू: १९ एप्रिल २०१३)
१९४०: इंग्लिश खाडी पोहून जाणारी पहिली भारतीय महिला जलतणपटू आरती साहा यांचा जन्म. (मृत्यू: २३ ऑगस्ट १९९४)
१९५०: क्रिकेटपटू आणि समालोचक मोहिंदर अमरनाथ यांचा जन्म.

२४ सप्टेंबर मृत्यू

१८९६: स्वीडन देशाचे पहिले पंतप्रधान लुईस गेरहार्ड डी गेर यांचे निधन. (जन्म: १८ जुलै १८१८)
१९३९: युनिव्हर्सल स्टुडियो चे संस्थापक कार्ल लामेल्स् यांचे निधन. (जन्म: १७ जानेवारी १८६७)
१९९२: १३वे सरन्यायाधीश सर्वमित्र सिकरी यांचे निधन. (जन्म: २६ एप्रिल १९०८)
१९९८: बालरंगभूमीचे खंदे पुरस्कर्ते, दिग्दर्शक वासुदेव पाळंदे यांचे निधन.
२००२: लेखक, शब्दकोशकार व अनुवादक श्रीपाद जोशी यांचे निधन.

सप्टेंबर महिन्यातील महत्त्वाच्या आणि विशेष घटना

NMK

दिनांक : २ सप्टेंबर १९४६

NMK

दिनांक : १४ सप्टेंबर १९४९

NMK

दिनांक : १५ सप्टेंबर १९५९

NMK

दिनांक : २४ सप्टेंबर १८७३

NMK

दिनांक : ४ सप्टेंबर १८२५

NMK

दिनांक : ५ सप्टेंबर १८८८

NMK

दिनांक : ७ सप्टेंबर १७९१

NMK

दिनांक : १५ सप्टेंबर १८६१

NMK

दिनांक : १६ सप्टेंबर १९१६

NMK

दिनांक : १ सप्टेंबर १९६१

NMK

दिनांक : २७ सप्टेंबर १९८०

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.