5 August Dinvishesh

5 August Dinvishesh (५ ऑगस्ट दिनविशेष) For MPSC / UPSC and Any Competitive Exam. You can use following search box to find out more dinvishesh like 5 August 2025 Dinvishesh by just typing day along with the month number. (eg. If you want to search for 15th August then type 15-08).

आपल्या मित्रांना पाठवा :

५ ऑगस्ट महत्वाच्या घटना

संपूर्ण दिनविशेष दिनदर्शिकायेथे क्लिक करा आणि लगेच डाऊनलोड करा आपल्या मोबाईल / कॉम्पुटर मध्ये. (75% Discount)
१८६१: अमेरिकन सैन्यातील चाबकाचे फटके मारण्याची शिक्षा बंद करण्यात आली.
१९१४: ओहायो मध्ये पहिले इलेक्ट्रिक ट्रॅफिक सिगनल बसवले.
१९६२: नेल्सन मंडेला यांना तुरुंगात टाकण्यात आले. यानंतर १९९० मधे त्यांची सुटका झाली.
१९६२: कन्या नक्षत्रात पहिल्या क्‍वासार तार्‍याचं अस्तित्त्व सिद्ध करण्यात यश.
१९६५: पाकिस्तानी सैन्याने साध्या वेषात घुसखोरी केल्यामुळे भारत पाकिस्तान युद्धाला सुरूवात झाली.
१९९४: इंडियन नॅशनल सायन्स अ‍ॅकेडमी (INSA) तर्फे दिला जाणारा होमी जहांगीर भाभा पुरस्कार राष्ट्रीय पदार्थविज्ञान प्रयोगशाळेले (NPL) संचालक प्रा. इरोड सुब्रमणियन राजगोपाल यांना प्रदान.
१९९७: रशियाच्या दोन अंतराळवीरांना घेऊन सोयूझ-यू हे अंतराळयान मीर अंतराळस्थानकाकडे रवाना.
१९९७: फ्रेन्च खुल्या लॉनटेनिस स्पर्धेत मिश्र दुहेरी गटात विजेतेपद मिळवणार्‍या महेश भूपतीला क्रीडा खात्यातर्फे २ लाख रुपयांचा पुरस्कार जाहीर.
२०२०: राम मंदिर, अयोध्या - सर्वोच्च न्यायालयाच्या विवादित जमिनीवर मंदिर बांधण्याच्या बाजूने निकाल दिल्यानंतर भूमिपूजन करण्यात आले.
२०१९: भारत - जम्मू आणि काश्मीर या परदेशाला राज्यचा विशेष दर्जा रद्द करण्यात आला आणि राज्याचे दोन केंद्रशासित प्रदेशांमध्ये जम्मू आणि काश्मीर, व लडाख असे विभाजन करण्यात आले.
१९७३: मार्स ६ - अंतराळयान यूएसएसआर वरून प्रक्षेपित झाले.
१९६३: शीतयुद्ध - आंशिक आण्विक चाचणी बंदी करार: अमेरिका, युनायटेड किंगडम आणि सोव्हिएत युनियनने स्वाक्षरी केली.
१९६२: मर्लिन मनरो - अमेरिकन अभिनेत्री, त्यांच्या राहत्या घरात ड्रग्जच्या अतिसेवनामुळे मृतावस्थेत सापडल्या.
१९६०: बुर्किना फासो / अपर व्होल्टा - देश फ्रान्सपासून स्वतंत्र झाला.
१९४९: इक्वाडोर भूकंप - किमान ५० शहरे उद्ध्वस्त आणि किमान ६ हजार लोकांचे निधन.
१९४४: दुसरे महायुद्ध - पोलिश बंडखोरांनी वॉर्सामधील जर्मन कामगार शिबिर (Gęsiówka) येथील ३४८ ज्यू कैद्यांना मुक्त केले.
१९४४: दुसरे महायुद्ध - पोलंडमधील वोला येथे नाझींनी ४०हजार ते ५०हजार नागरिक आणि युद्धकैद्यांचा आठवडाभर नरसंहार सुरू केला.
१९४०: दुसरे महायुद्ध - सोव्हिएत युनियनने औपचारिकपणे लॅटव्हिया पादाक्रांत केले.
१९०१: पीटर ओ'कॉनर - यांनी २४ फूट ११.७५ इंच (७.६१३७ मीटर) लांब उडीचा जागतिक विक्रम प्रस्थापित केला.
१८८४: स्टॅच्यू ऑफ लिबर्टी, न्यूयॉर्क, अमेरिका - याची कोनशिला घातली गेली.
१८८२: स्टँडर्ड ऑइल कंपनी (एक्सॉनमोबिल) - स्थापन झाली.
१८७४: जपान या देशाने टपाल बचत योजना सुरू केली.
१८६१: अमेरिकन गृहयुद्ध - युद्धात होणारे खर्च आणि नुकसान नियंत्रणात आणण्यासाठी अमेरिकेत पहिल्यांदा आयकर लावण्यात आला.
१५८३: अमेरिका - सर हम्फ्रे गिल्बर्ट यांनी उत्तर अमेरिकेत पहिली इंग्रजी वसाहत स्थापन केली
७०: दुसरे मंदिर, जेरुसलेम येथे लागलेली आग विझली.
२६: हान साम्राज्य, चीन - पुनर्स्थापना झाली.

५ ऑगस्ट जन्म

संपूर्ण दिनविशेष दिनदर्शिकायेथे क्लिक करा आणि लगेच डाऊनलोड करा आपल्या मोबाईल / कॉम्पुटर मध्ये. (75% Discount)
१८५८: इतिहासाचार्य, लेखक, नाटककार व कवी वासुदेव वामन तथा वासुदेवशास्त्री खरे यांचा जन्म. (मृत्यू: ११ जून १९२४)
१८९०: इतिहासकार, लेखक, वक्ते आणि पुणे विद्यापीठाचे कुलगुरू, टिळक महाराष्ट्र विद्यापीठाचे कुलगुरू, पद्मविभूषण महामहोपाध्याय दत्तो वामन पोतदार यांचा जन्म. (मृत्यू: ६ ऑक्टोबर १९७९)
१९३०: चंद्रावर पाऊल ठेवलेला पहिला मानव नील आर्मस्ट्राँग यांचा जन्म. (मृत्यू: २५ ऑगस्ट २०१२)
१९३३: लेखिका व समीक्षिका विजया राजाध्यक्ष यांचा जन्म.
१९५०: भारतीय वकील आणि राजकारणी महेंद्र कर्मा यांचा जन्म. (मृत्यू: २५ मे २०१३)
१९६९: जलदगती गोलंदाज वेंकटेश प्रसाद यांचा जन्म.
१९७२: पाकिस्तानी जलदगती गोलंदाज अकिब जावेद यांचा जन्म.
१९७४: भारतीय अभिनेत्री काजोल यांचा जन्म.
१९८७: भारतीय अभिनेत्री जेनेलिया डिसोझा यांचा जन्म.
१९७१: लॅटव्हिया देशाचे ११वे पंतप्रधान, शैक्षणिक आणि राजकारणीवाल्डिस डोम्ब्रोव्स्कीस यांचा जन्म
१९६९: जलदगती गोलंदाज वेंकटेश प्रसाद यांचा जन्म
१९४७: श्रीलंकेचे क्रिकेटर टोनी ओपाथा यांचा जन्म (मृत्यू : ११ सप्टेंबर २०२०)
१९४२: अमेरिकन रेकॉर्ड निर्माते, हॅनिबल रेकॉर्ड्सचे संस्थापक जो बॉयड यांचा जन्म
१९१५: भारतीय कवी आणि शैक्षणिक शिवमंगल सिंग सुमन यांचा जन्म (मृत्यू : २७ नोव्हेंबर २००२)
१८२७: ब्राझील देशाचे १ले राष्ट्रपती, ब्राझिलियन फील्ड मार्शल आणि राजकारणी डियोडोरो डा फोन्सेका यांचा जन्म (मृत्यू : २३ ऑगस्ट १८९२)
१४६१: पोलिश देशाचे राजा अलेक्झांडर जेगीलॉन यांचा जन्म \ (मृत्यू : १९ ऑगस्ट १५०६)

५ ऑगस्ट मृत्यू

संपूर्ण दिनविशेष दिनदर्शिकायेथे क्लिक करा आणि लगेच डाऊनलोड करा आपल्या मोबाईल / कॉम्पुटर मध्ये. (75% Discount)
८८२: ८८२ई.पुर्व : फ्रान्सचा राजा लुई (तिसरा) यांचे निधन.
१९६२: अमेरिकन अभिनेत्री मेरिलीन मन्‍रो यांनी गोळी मारून आत्महत्या केली. (जन्म: १ जून १९२६)
१९८४: अभिनेता रिचर्ड बर्टन यांचे निधन. (जन्म: १० नोव्हेंबर १९२५)
१९९१: होंडा कंपनी चे स्थापक सुइचिरो होंडा यांचे निधन. (जन्म: १७ नोव्हेंबर १९०६)
१९९२: स्वातंत्र्यसैनिक, विचारवंत, तत्त्वचिंतक व सामाजिक कार्यकर्ते अच्युतराव पटवर्धन यांचे निधन. (जन्म: ५ फेब्रुवारी १९०५)
१९९७: स्वातंत्र्यसैनिक, कम्युनिस्ट व नक्षलवादी नेते के. पी. आर. गोपालन यांचे निधन.
२०००: भारतीय क्रिकेटचे भीष्माचार्य, स्वतंत्र भारताच्या पहिल्या क्रिकेट संघाचे कर्णधार व स्वतंत्र भारताचे पहिले शतकवीर लाला अमरनाथ भारद्वाज यांचे निधन.
२००१: गानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार विजेत्या गायिका आणि अभिनेत्री ज्योत्स्‍ना भोळे यांचे निधन. (जन्म: ११ मे १९१४)
२०१४: भारतीय-इंग्रजी इतिहासकार चापमॅन पिंचर यांचे निधन. (जन्म: २९ मार्च १९१४)
२०२२: भारतीय राजकारणी, खासदार देबी घोसाल यांचे निधन (जन्म: १ नोव्हेंबर १९३४)
२०२२: भारतीय नृत्यांगना गोरिमा हजारिका यांचे निधन
२०२२: भारतीय फुटबॉलपटू नरेंदर थापा यांचे निधन (जन्म: २२ सप्टेंबर १९६४)
२०१९: अमेरिकन लेखक, - नोबेल, पुलित्झर पुरस्कार टोनी मॉरिसन यांचे निधन (जन्म: १८ फेब्रुवारी १९३१)
२०१४: भारतीय व्यंगचित्रकार प्राण कुमार शर्मा यांचे निधन (जन्म: १५ ऑगस्ट १९३८)
२०११: पोलंड देशाचे उपपंतप्रधान, शेतकरी आणि राजकारणी आंद्रेज लेपर यांचे निधन (जन्म: १३ जून १९५४)
२००१: युगांडा देशाचे २रे पंतप्रधान, राजकारणी ओटेमा अल्लिमादी यांचे निधन (जन्म: ११ फेब्रुवारी १९२९)
१९९८: बल्गेरिय देशाचे ३६वे पंतप्रधान, कमांडर आणि राजकारणी टोडोर झिव्हकोव्ह यांचे निधन (जन्म: ७ सप्टेंबर १९११)
१९९२: भारतीय प्रकाशक, पर्यावरणवादी आणि परोपकारी - पद्मश्री भगत पूरण सिंग यांचे निधन (जन्म: ४ जून १९०४)
१९९२: न्यूझीलंड देशाचे ३१वे पंतप्रधान, राजकारणी रॉबर्ट मुल्डून यांचे निधन (जन्म: २५ सप्टेंबर १९२१)
१९६०: कॅनड देशाचे ९वे पंतप्रधान, वकील आणि राजकारणी आर्थर मेघेन यांचे निधन (जन्म: १६ जून १८७४)
१९५७: जर्मन रसायनशास्त्रज्ञ आणि शैक्षणिक - नोबेल पुरस्कार हेनरिक ओटो वेलँड यांचे निधन (जन्म: ४ जून १८७७)
१९२१: ग्रीस देशाचे ७८वे पंतप्रधान, ग्रीक वकील आणि राजकारणी दिमित्रीओस रॅलिस यांचे निधन
१९०१: युनायटेड किंगडमची राजकुमारी रॉयल आणि जर्मन देशाचे सम्राज्ञी व्हिक्टोरिया यांचे निधन (जन्म: २१ नोव्हेंबर १८४०)
१८९५: जर्मन तत्वज्ञानी, समीक्षक आणि द कम्युनिस्ट मॅनिफेस्टोचे सह-लेखक फ्रेडरिक एंजल्स यांचे निधन (जन्म: २८ नोव्हेंबर १८२०)
१७९२: इंग्रजी राजकारणी, युनायटेड किंगडमचे पंतप्रधान फ्रेडरिक नॉर्थ, लॉर्ड नॉर्थ यांचे निधन (जन्म: १३ एप्रिल १७३२)
१३६४: जपानी सम्राट कोगोन यांचे निधन (जन्म: १ ऑगस्ट १३१३)
८२४: जपान देशाचे सम्राट हैझेई यांचे निधन
६४२: मर्सिय देशाचे राजा इओवा यांचे निधन
६४१: नॉर्थम्ब्रिय देशाचे राजा ओसवाल्ड यांचे निधन
५५३: लिआंग राजवंशाचे राजकुमार क्सिओ जी यांचे निधन

ऑगस्ट महिन्यातील महत्त्वाच्या आणि विशेष घटना

NMK

दिनांक : १५ ऑगस्ट १९४७

NMK

दिनांक : २९ ऑगस्ट १९०५

NMK

दिनांक : १ ऑगस्ट १९२०

NMK

दिनांक : ६ ऑगस्ट १९५२

NMK

दिनांक : ८ ऑगस्ट १९६७

NMK

दिनांक : ९ ऑगस्ट १९४२

NMK

दिनांक : १५ ऑगस्ट १९६९

NMK

दिनांक : १६ ऑगस्ट १९३२

NMK

दिनांक : २७ ऑगस्ट १९७२

NMK

दिनांक : २९ ऑगस्ट २०१३

आपल्या मित्रांना पाठवा :
Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.