MahaNMK > Dinvishesh > 15 JULY DINVISHESH

15 JULY DINVISHESH

15 JULY DINVISHESH: Check all the latest july dinvishesh like birth, death and important events from MahaNMK.com. July Important Events is the special category which may help you in your MPSC / UPSC / Competitive exams.

जुलै दिनविशेष : "आता स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करणं झालं सोप्पं" MahaNMK आपल्यासाठी घेऊन आले आहेत Dinvishesh, सर्व महत्वाच्या दिनविशेष आपल्याला एकाच ठिकाणी उपलब्ध करून देण्यासाठी आम्ही हा नवीन उपक्रम राबवला आहे.


15 JULY DINVISHESH

महत्वाच्या घटना (15 JULY)

15 जुलै 1662: इंग्लंडमध्ये प्रतिष्ठित असलेल्या रॉयल सोसायटीची स्थापना झाली.
15 जुलै 1674: मुघल सरदार बहादूरशहा कोकलताशच्या ताब्यातील पेडगावाची सुमारे कोटीची लूट रायगडावर जमा झाली.
15 जुलै 1926: मुंबईतील कुलाबा ते क्रॉफर्ड मार्केट उपनगरी बस सेवा सुरू झाली.
15 जुलै 1927: र. धों. कर्वे यांच्या समाजस्वास्थ्य मासिकाचा पहिला अंक प्रकाशित झाला.
15 जुलै 1955: आण्विक अस्त्रांवर बंदी घालणाऱ्या मैनाऊ जाहीरनाम्यावर ५८ नोबेल पारितोषिक विजेत्या शास्त्रज्ञांच्या स्वाक्षऱ्या.
15 जुलै 1955: पंडित जवाहरलाल नेहरू यांना भारतरत्न सन्मान जाहीर.
15 जुलै 1962: ज्ञानप्रबोधिनी संस्थेचा पुणे येथे प्रारंभ.
15 जुलै 1996: पांडुरंग शास्त्री आठवले यांना रॅमन मॅगसेसे पुरस्कार जाहीर.
15 जुलै 1997: पर्यावरणवादी महेशचंद्र मेहता यांना रॅमन मॅगसेसे पुरस्कार जाहीर.
15 जुलै 2006: ट्विटर हा सर्वात मोठा सोशिअल प्लॅटफॉर्म सुरु झाला.
15 जुलै 2014: जागतिक युवा कौशल्य दिन

जन्म (15 JULY)

15 जुलै 1606: डच चित्रकार रेंब्राँ यांचा जन्म. (मृत्यू: ४ ऑक्टोबर १६६९)
15 जुलै 1611: जयपूर चे राजे मिर्झाराजे जयसिंग यांचा जन्म. (मृत्यू: २८ ऑगस्ट १६६७)
15 जुलै 1903: खासदार आणि तामिळनाडूचे मुख्यमंत्री के. कामराज यांचा जन्म. (मृत्यू: २ ऑक्टोबर १९७५)
15 जुलै 1904: जयपूर – अत्रौली घराण्याच्या शास्त्रीय गायिका गानतपस्विनी मोगुबाई कुर्डीकर यांचा जन्म. (मृत्यू: १० फेब्रुवारी २००१)
15 जुलै 1905: पाकिस्तानचे ४थे पंतप्रधान चौधरी मुहंमद अली यांचा जन्म. (मृत्यू: २ डिसेंबर १९८०)
15 जुलै 1917: अफगणिस्तानचे ३रे राष्ट्राध्यक्ष नूरमोहंमद तराकी यांचा जन्म. (मृत्यू: १४ सप्टेंबर १९७९)
15 जुलै 1927: विचारवंत, वक्ते व डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. शिवाजीराव भोसले यांचा जन्म. (मृत्यू: २९ जून २०१०)
15 जुलै 1932: विद्वान, टीकाकार आणि लेखक नरहर कुरुंदकर यांचा जन्म. (मृत्यू: १० फेब्रुवारी १९८२)
15 जुलै 1933: भारतीय लेखक आणि पटकथालेखक एम. टी. वासुदेवन नायर यांचा जन्म.
15 जुलै 1937: भारतीय पत्रकार श्री प्रभाज जोशी यांचा जन्म. (मृत्यू: ५ नोव्हेंबर २००९)
15 जुलै 1949: दलित साहित्यिक माधव कोंडविलकर यांचा जन्म.

मृत्यू (15 JULY)

15 जुलै 1291: जर्मनीचा राजा रुडॉल्फ (पहिला) यांचे निधन. (जन्म: १ मे १२१८)
15 जुलै 1542: लिओनार्डो दा विंची यांच्या पेंटिंग मोना लिसा मधील महिला लिसा डेल जिकॉन्डो यांचे निधन. (जन्म: १५ जून १४७९)
15 जुलै 1904: रशियन कथाकार व नाटककार अंतॉन चेकॉव्ह यांचे निधन. (जन्म: २९ जानेवारी १८६०)
15 जुलै 1919: नोबेल पारितोषिक विजेते जर्मन रसायनशास्त्रज्ञ हर्मान एमिल फिशर यांचे निधन. (जन्म: ९ ऑक्टोबर १८५२)
15 जुलै 1953: ऑर्डर ऑफ दी इमिटेशन ऑफ क्राइस्ट चे संस्थापक भारतीय आर्चबिशप गिवरगीस मार इव्हानिओस यांचे निधन. (जन्म: २१ सप्टेंबर १८८२)
15 जुलै 1967: गायक व नट नारायण श्रीपाद राजहंस तथा बालगंधर्व यांचे निधन. (जन्म: २६ जून १८८८)
15 जुलै 1979: मेक्सिकोचे राष्ट्राध्यक्ष गुस्तावोदियाझ ओर्दाझ यांचे निधन.
15 जुलै 1991: जनसंघ व भाजपचे नेते, गोवा मुक्तिसंग्रामातील स्वातंत्र्यसैनिक, संसदपटू, वक्ते जगन्नाथराव जोशी यांचे निधन.
15 जुलै 1998: स्वातंत्र्यसैनिक ताराचंद परमार यांचे निधन.
15 जुलै 1999: पर्यावरणवादी लेखक जगदीश गोडबोले यांचे निधन.
15 जुलै 1999: सामाजिक कार्यकर्त्या इंदुताई टिळक यांचे निधन.
15 जुलै 2004: कुटुंबनियोजनाच्या क्षेत्रात सलग साठ वर्षे कार्य करणाऱ्या सामाजिक डॉ. बानू कोयाजी यांचे निधन. (जन्म: २२ ऑगस्ट १९१८)

जुलै महिन्यातील दिनविशेष

15 JULY DINVISHESH
सोममंगळबुधगुरुशुक्रशनिरवि
12
3456789
10111213141516
17181920212223
24252627282930
31
15 JULY DINVISHESH

जुलै महिन्यातील महत्त्वाच्या आणि विशेष घटना

मुंबई विद्यापीठाची स्थापना.

दिनांक : 18 जुलै 1857

भारताचा कारगिल युद्धात विजय झाला.

दिनांक : 26 जुलै 1999

लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांचा रत्नागिरी जिल्ह्यातील चिखलगाव येथे जन्म. (मृत्यू: १ ऑगस्ट १९२० – मुंबई)

दिनांक : 23 जुलै 1856

आधुनिक मुंबईचे शिल्पकार जगन्नाथ उर्फ नाना शंकर शेटे यांचे निधन. (जन्म: १० फेब्रुवारी १८०३)

दिनांक : 31 जुलै 1865

वसंतराव नाईक जयंती

दिनांक : 1 जुलै 1913

FRBM कायदा २००३ अमलात.

दिनांक : 5 जुलै 2004

राज्य मतदार दिन (महाराष्ट्र सरकार) सुरुवात.

दिनांक : 5 जुलै 2017

बॉम्बे स्पिनिंग अँड वेअविंग मिल स्थापना.

दिनांक : 7 जुलै 1854

फोर्ट विल्यम कॉलेज ची स्थापना.

दिनांक : 10 जुलै 1800

जागतिक लोकसंख्या दिन सुरुवात.

दिनांक : 11 जुलै 1989

जागतिक युवा कौशल्य दिन

दिनांक : 15 जुलै 2014

अण्णाभाऊ साठे स्मृतिदिन

दिनांक : 18 जुलै 1969

बहिष्कृत हितकारिणी सभेची स्थापना.

दिनांक : 20 जुलै 1924

राष्ट्रीय ध्वजाचा स्वीकार.

दिनांक : 22 जुलै 1947

१४ बँकांचे राष्ट्रीयकरण

दिनांक : 19 जुलै 1969

कोल्हापूर संस्थानात आरक्षणाची तरतूद.

दिनांक : 26 जुलै 1902

कारगिल विजय दिवस

दिनांक : 26 जुलै 1999

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2022 All Rights Reserved.

Made with ❤ in India.