15 June Dinvishesh

15 June Dinvishesh (१५ जून दिनविशेष) For MPSC / UPSC and Any Competitive Exam. You can use following search box to find out more dinvishesh like 15 June 2024 Dinvishesh by just typing day along with the month number. (eg. If you want to search for 15th August then type 15-08).

आपल्या मित्रांना पाठवा :

१५ जून महत्वाच्या घटना

संपूर्ण दिनविशेष दिनदर्शिकायेथे क्लिक करा आणि लगेच डाऊनलोड करा आपल्या मोबाईल / कॉम्पुटर मध्ये. (75% Discount)
१६६७: वैद्यकीय इतिहासात प्रथमच जॉं बाप्तिस्ते डेनिस या डॉक्टरने १५ वर्षे वयाच्या एका फ्रेंच मुलाच्या शरीरात कोकराचे रक्त टोचले.
१८४४: चार्ल्स गुडइयरने रबराच्या व्हल्कनायझेशनचे पेटंट घेतले.
१८६९: महाराष्ट्रातील पहिला विधवा विवाह साजरा झाला.
१९१९: कॅप्टन जॉन अलकॉक, लेफ्टनंट आर्थर ब्राऊन यांनी विमानातून सर्वप्रथम अटलांटिक महासागर पार केला.
१९७०: बा. पां. आपटे पुणे विद्यापीठाचे आठवे कुलगुरू झाले.
१९९३: संपूर्ण देशी बनावटीच्या सहा ‘अर्जुन’ रणगाड्यांची पहिली तुकडी लष्कराकडे सुपूर्द करण्यात आली.
१९९४: इस्त्रायल व व्हॅटिकन सिटी यांमधे पूर्ण राजनैतिक संबंध प्रस्थापित झाले.
१९९७: अजामीनपात्र गुन्ह्याचा आरोप असलेली व्यक्ती फरारी असेल, तर तिच्यावर आरोपपत्र दाखल नसतानाही न्यायमूर्ती अटक वॉरंट जारी करू शकतात असा महत्त्वपूर्ण निर्णय सर्वोच्च न्यायालयाने दिला.
२००१: ग्रँडमास्टर विजयालक्ष्मी सुब्रह्मण्यम यांनी राष्ट्रीय अ बुद्धिबळ स्पर्धा विक्रमी पाचव्यांदा जिंकली.
२००८: लेहमन ब्रदर्स या वित्तसंस्थेने दिवाळखोरी जाहीर केली.

१५ जून जन्म

संपूर्ण दिनविशेष दिनदर्शिकायेथे क्लिक करा आणि लगेच डाऊनलोड करा आपल्या मोबाईल / कॉम्पुटर मध्ये. (75% Discount)
१८७८: भारतीय-अमेरिकन गोल्फर मार्गारेट अॅबॉट यांचा जन्म. (मृत्यू: १० जून १९५५)
१८९८: पुणे विद्यार्थी गृहाचे एक संस्थापक गजानन श्रीपत तथा अण्णासाहेब खेर यांचा जन्म. (मृत्यू: २९ ऑगस्ट १९८६)
१९०७: स्वातंत्र्यसैनिक, संयुक्त महाराष्ट्र चळवळीतील नेते आणि समाजवादी विचारवंत ना. ग. गोरे यांचा जन्म. (मृत्यू: १ मे १९९३)
१९१७: संगीतकार मेंडोलीनवादक सज्जाद हुसेन यांचा जन्म. (मृत्यू: २१ जुलै १९९५ – माहीम, मुंबई)
१९२३: साहित्यिक केशवजगन्नाथ पुरोहित ऊर्फ शांताराम यांचा जन्म.
१९२७: भारतीय-पाकिस्तानी कवी आणि लेखक इब्न-ए-इनशा यांचा जन्म. (मृत्यू: ११ जानेवारी १९७८)
१९२८: साहित्यिक शंकर वैद्य यांचा जन्म.
१९२९: गायिका व अभिनेत्री सुरैय्या जमाल शेख ऊर्फ सुरैय्या यांचा जन्म. (मृत्यू: ३१ जानेवारी २००४)
१९३२: धृपद गायक झिया फरिदुद्दीन डागर यांचा जन्म. (मृत्यू: ८ मे २०१३)
१९३३: लेखिका सरोजिनी वैद्य यांचा जन्म. (मृत्यू: ३ ऑगस्ट २००७)
१९३७: लोकपाल बिलासाठी आग्रह धरणारे समाजसेवक अण्णा हजारे यांचा जन्म.
१९४७: साहित्यिक आणि नाटककार प्रेमानंद गज्वी यांचा जन्म.

१५ जून मृत्यू

संपूर्ण दिनविशेष दिनदर्शिकायेथे क्लिक करा आणि लगेच डाऊनलोड करा आपल्या मोबाईल / कॉम्पुटर मध्ये. (75% Discount)
१५३४: योगी चैतन्य महाप्रभू यांचे निधन. (जन्म: १८ फेब्रुवारी १४८६)
१९३१: अर्वाचीन मराठीतील सुलभ लेखन शैलीचे प्रवर्तक, संदेशकार अच्युत बळवंत कोल्हटकर यांचे निधन.
१९७९: कवी गीतकार सूर्यकांत रामचंद्र खांडेकर यांचे निधन. (जन्म: २ एप्रिल १९२६)
१९८३: साहित्य अकादमी पुरस्कार विजेते तेलुगू कवी गीतकार श्रीरंगम श्रीनिवास राव ऊर्फ श्री श्री यांचे निधन. (जन्म: ३० एप्रिल १९१०)

जून महिन्यातील महत्त्वाच्या आणि विशेष घटना

NMK

दिनांक : २ जून २०१४

NMK

दिनांक : ३ जून १९४७

NMK

दिनांक : ६ जून १६७४

NMK

दिनांक : २१ जून २०१५

NMK

दिनांक : ५ जून १९७४

NMK

दिनांक : २५ जून १८७४

आपल्या मित्रांना पाठवा :
Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.