24 May Dinvishesh

24 May Dinvishesh (२४ मे दिनविशेष) For MPSC / UPSC and Any Competitive Exam. You can use following search box to find out more dinvishesh like 24 May 2024 Dinvishesh by just typing day along with the month number. (eg. If you want to search for 15th August then type 15-08).

आपल्या मित्रांना पाठवा :

२४ मे महत्वाच्या घटना

संपूर्ण दिनविशेष दिनदर्शिकायेथे क्लिक करा आणि लगेच डाऊनलोड करा आपल्या मोबाईल / कॉम्पुटर मध्ये. (75% Discount)
१६२६: पीटर मिन्युईटने स्थानिक लोकांकडून मॅनहटन बेट २४ डॉलरला विकत घेतले.
१८४४: तारायंत्राचे संशोधक सॅम्युअल मोर्स यांनी स्वत: विकसित केलेल्या सांकेतिक भाषेत पहिला संदेश वॉशिंग्टन येथून बाल्टिमोर येथे पाठवला.
१८८३: न्यूयॉर्क मधील ब्रूकलिन ब्रिज वाहतुकीस खुला झाला.
१९४०: इगोर सिकोरसकी यांनी एका-रोटर हेलिकॉप्टर चे यशस्वी उड्डाण केले.
१९७६: ध्वनीपेक्षा अधिक वेगाने जाणार्‍या काँकॉर्ड विमानाची लंडन ते न्यूयॉर्क अशी सेवा सुरू झाली.
१९९१: एरिट्रियाला इथिओपियाकडून स्वातंत्र्य मिळाले.
१९९४: २६ फेब्रुवारी १९९३ रोजी न्यूयॉर्क येथील वर्ल्ड ट्रेड सेंटरमध्ये बॉम्बस्फोट घडवून आणणार्‍या चार मुस्लीम दहशतवाद्यांना प्रत्येकी २४० वर्षे कारावासाची शिक्षा सुनावण्यात आली.
२०००: भारतीय अवकाश संशोधन संस्थेने (ISRO) विकसित केलेला इन्सॅट-३बी हा उपग्रह पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या हस्ते राष्ट्राला अर्पण.
२००१: १८ व्या वर्षी माऊंट एव्हरेस्ट शिखर सर करणारा शेर्पा तेब्बा त्रेथी सर्वात लहान व्यक्ती ठरला.

२४ मे जन्म

संपूर्ण दिनविशेष दिनदर्शिकायेथे क्लिक करा आणि लगेच डाऊनलोड करा आपल्या मोबाईल / कॉम्पुटर मध्ये. (75% Discount)
१६८६: फॅरनहाइट तापमान प्रणाली चे जनक डॅनियल फॅरनहाइट यांचा जन्म. (मृत्यू: १६ सप्टेंबर १७३६)
१८१९: इंग्लंडची राणी व्हिक्टोरिया यांचा जन्म. (मृत्यू: २२ जानेवारी १९०१)
१९२४: आंतरराष्ट्रीय कीर्तीचे जादूगार रघुवीर भोपळे ऊर्फ जादूगार रघुवीर यांचा जन्म. (मृत्यू: २० ऑगस्ट १९८४)
१९३३: रणजी व कसोटी क्रिकेटपटू, कुशल क्रीडा संघटक हेमचंद्र तुकाराम तथा बाळ दाणी यांचा जन्म. (मृत्यू: १९ डिसेंबर १९९९)
१९४२: पर्यावरणतज्ञ माधव गाडगीळ यांचा जन्म.
१९५५: संगीतकार राजेश रोशन यांचा जन्म.
१९७३: भारतीय दिग्दर्शक, निर्माता आणि पटकथालेखक शिरीष कुंदर यांचा जन्म.

२४ मे मृत्यू

संपूर्ण दिनविशेष दिनदर्शिकायेथे क्लिक करा आणि लगेच डाऊनलोड करा आपल्या मोबाईल / कॉम्पुटर मध्ये. (75% Discount)
१५४३: पोलिश खगोलशास्त्रज्ञ आणि गणितज्ञ निकोलस कोपर्निकस यांचे निधन. (जन्म: १९ फेब्रुवारी १४७३)
१९५०: भारताचे ४३वे गर्वनर जनरल आर्चिबाल्ड वावेल यांचे निधन. (जन्म: ५ मे १८८३)
१९८४: डब्ल्यू.डब्ल्यू.ई. चे स्थापक विन्स मॅकमोहन सीनिय यांचे निधन. (जन्म: ६ जुलै १९१४)
१९९३: जुन्या पिढीतील संगीतकार व गायक बुलो चंदीराम रामचंदानी ऊर्फ बुलो सी. रानी यांचे निधन. (जन्म: ६ मे १९२० – हैदराबाद)
१९९५: इंग्लंडचे पंतप्रधान हॅरॉल्ड विल्सन यांचे निधन. (जन्म: ११ मार्च १९१६)
१९९९: पद्मश्री आणि द्रोणाचार्य पुरस्कार विजेते कुस्ती प्रक्षिशक विजयपाल लालाराम तथा गुरू हनुमान यांचे निधन. (जन्म: १५ मार्च १९०१)
२०००: दादासाहेब फाळके पुरस्कार विजेते शायर, गीतकार आणि कवी मजरुह सुलतानपुरी यांचे निधन. (जन्म: १ ऑक्टोबर १९१९)

मे महिन्यातील महत्त्वाच्या आणि विशेष घटना

NMK

दिनांक : १ मे १९६०

NMK

दिनांक : ९ मे १८६६

NMK

दिनांक : २२ मे १७७२

NMK

दिनांक : २८ मे १८८३

NMK

दिनांक : ८ मे १८१७

NMK

दिनांक : ११ मे १९९८

आपल्या मित्रांना पाठवा :
Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.