22 June Dinvishesh

22 June Dinvishesh (२२ जून दिनविशेष) For MPSC / UPSC and Any Competitive Exam. You can use following search box to find out more dinvishesh like 22 June 2024 Dinvishesh by just typing day along with the month number. (eg. If you want to search for 15th August then type 15-08).

आपल्या मित्रांना पाठवा :

२२ जून महत्वाच्या घटना

संपूर्ण दिनविशेष दिनदर्शिकायेथे क्लिक करा आणि लगेच डाऊनलोड करा आपल्या मोबाईल / कॉम्पुटर मध्ये. (75% Discount)
१६३३: गॅलेलिओ गॅलिली याने पोपच्या दबावाखाली पृथ्वी हाच सूर्यमालेचा केंद्रबिंदू आहे असे कबूल केले.
१७५७: प्लासीची लढाई सुरू झाली.
१८९७: पुणे शहरात पसरलेल्या प्लेगच्या साथीच्या काळात झालेल्या जुलुमाचा प्रतिशोध म्हणून चार्ल्स रँड या मुलकी अधिकार्‍याला दामोदर हरी चाफेकर यांनी गोळ्या घालून ठार केले.
१९०८: इंग्लंडचा राजा जॉर्ज (पाचवा) याचे राज्यारोहण.
१९४०: दुसरे महायुद्ध – फ्रान्सने जर्मनीसमोर शरणागती पत्करली.
१९४०: नेताजी सुभाषचंद्र बोस यांनी काँग्रेसमधुन बाहेर पडुन ऑल इंडिया फॉरवर्ड ब्लॉक या पक्षाची स्थापना केली.
१९४१: नेताजी सुभाषचंद्र बोस यांनी सावरकर सदन येथे स्वातंत्र्यवीर सावरकर यांची भेट घेतली.
१९७६: कॅनडाने मृत्यूदंडावर बंदी घातली.
१९७८: जेम्स ख्रिस्ती या खगोलशास्त्रज्ञाने अ‍ॅरिझोना येथील वेधशाळेतून शेरॉन या प्लूटोच्या चंद्राचा शोध लावला.
१९८४: व्हर्जिन अटलांटिक एअरवेजची पहिली उड्डाण लंडन हिथ्रो विमानतळावरून सुरू झाली.
१९८६: अर्जेंटिना आणि इंग्लंड यांच्यादरम्यान १९८६ स्पर्धेच्या उपांत्यपूर्व फेरीत डिएगो मॅराडोना यांनी विवादास्पद हँड ऑफ गॉड गोल केला.
१९९४: महाराष्ट्र सरकारचे महिलाविषयक धोरण जाहीर झाले. त्याद्वारे सरकारी व निमसरकारी नोकर्‍यात महिलांना ३० टक्‍के आरक्षण.
२००७: अंतराळवीर सुनिता विल्यम यांनी सुमारे १९४ दिवस १८ तास पूर्ण करून सर्वाधिक काळ अंतराळात राहून पृथ्वीवर परत आले.

२२ जून जन्म

संपूर्ण दिनविशेष दिनदर्शिकायेथे क्लिक करा आणि लगेच डाऊनलोड करा आपल्या मोबाईल / कॉम्पुटर मध्ये. (75% Discount)
१८०५: इटालियन स्वातंत्र्यवीर जोसेफ मॅझिनी यांचा जन्म. (मृत्यू: १० मार्च १८७२)
१८८७: ब्रिटिश जीवशास्त्रज्ञ ज्यूलियन हक्सले यांचा जन्म. (मृत्यू: १४ फेब्रुवारी १९७५)
१८९६: नटश्रेष्ठ बाबुराव पेंढारकर यांचा जन्म.
१८९९: मास्किंग टेप चे शोधक रिचर्ड गिर्ली ड्र्यू यांचा जन्म. (मृत्यू: १४ डिसेंबर १९८०)
१९०८: महानुभाव पंथाचे अभ्यासक, विचारवंत व तत्त्वज्ञ, नागपूर विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. विष्णू भिकाजी तथा वि. भि. कोलते यांचा जन्म. (मृत्यू: ९ एप्रिल १९९८)
१९२७: भारतीय-इंग्लिश इतिहासकार आणि शैक्षणिक एन्थोनी लो यांचा जन्म. (मृत्यू: १२ फेब्रुवारी २०१५)
१९३२: आंतरराष्ट्रीय किर्ती प्राप्त केलेले चित्रपट व रंगमंच कलाकार अमरीश पुरी यांचा जन्म. (मृत्यू: १२ जानेवारी २००५ – मुंबई, महाराष्ट्र)

२२ जून मृत्यू

संपूर्ण दिनविशेष दिनदर्शिकायेथे क्लिक करा आणि लगेच डाऊनलोड करा आपल्या मोबाईल / कॉम्पुटर मध्ये. (75% Discount)
१९५५: लेगस्पिनर व गुगली गोलंदाज सदाशिव ऊर्फ सदू शिंदे यांचे निधन. (जन्म: १८ ऑगस्ट १९२३)
१९९३: चित्रपट अभिनेते विष्णूपंत जोग यांचे निधन.
१९९४: चित्रपट निर्माते व दिग्दर्शक अक्किनेरी लक्ष्मीवर प्रसाद राव ऊर्फ एल. व्ही. प्रसाद यांचे निधन. (जन्म: १७ जानेवारी १९०८)
२०१४: भारतीय दिग्दर्शक आणि निर्माता रामा नारायणन यांचे निधन. (जन्म: ३ एप्रिल १९४९)

जून महिन्यातील महत्त्वाच्या आणि विशेष घटना

NMK

दिनांक : २ जून २०१४

NMK

दिनांक : ३ जून १९४७

NMK

दिनांक : ६ जून १६७४

NMK

दिनांक : २१ जून २०१५

NMK

दिनांक : ५ जून १९७४

NMK

दिनांक : २५ जून १८७४

आपल्या मित्रांना पाठवा :
Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.