21 JULY DINVISHESH: Check all the latest july dinvishesh like birth, death and important events from MahaNMK.com. July Important Events is the special category which may help you in your MPSC / UPSC / Competitive exams.
जुलै दिनविशेष : "आता स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करणं झालं सोप्पं" MahaNMK आपल्यासाठी घेऊन आले आहेत Dinvishesh, सर्व महत्वाच्या दिनविशेष आपल्याला एकाच ठिकाणी उपलब्ध करून देण्यासाठी आम्ही हा नवीन उपक्रम राबवला आहे.
महत्वाच्या घटना (21 JULY)
21 जुलै 356: ३५६ इ.स. पूर्व : जगातील सात आश्चर्यांपैकी एक एफिसस आर्टेमिसचे मंदिर नष्ट झाले.
21 जुलै 1831: बेल्जिअमचा पहिला राजा लिओपॉल्ड याचा शपथविधी झाला.
21 जुलै 1944: २० जुलै १९४४ रोजी अॅडॉल्फ हिटलरची हत्या करण्याचा प्रयत्न करणाऱ्या क्लाऊस व्हॉन स्टाऊफेनबर्गला फाशी.
21 जुलै 1960: सिरीमाओ बंदरनायके या श्रीलंकेच्या ६ व्या पंतप्रधान बनल्या. त्या जगातील पहिल्या महिला पंतप्रधान आहेत.
21 जुलै 1976: आयर्लंडमधील ब्रिटिश राजदूताची हत्या.
21 जुलै 1983: अंटार्क्टिका वरील व्होस्टॉक येथे उणे ८९.२ सेल्सियस या पृथ्वीवरील सर्वात नीचांकी तापमानाची नोंद केली गेली.
21 जुलै 2002: जगभर दूरसंचार सेवा पुरवणाऱ्या वर्ल्ड कॉम या अमेरिकन कंपनीने दिवाळखोरी घोषित केली.
जन्म (21 JULY)
21 जुलै 1853: ज्योतिषगणिताचे अभ्यासक, ग्रंथलेखक शंकर बाळकृष्ण दीक्षित यांचा जन्म. (मृत्यू: २७ एप्रिल १८९८)
21 जुलै 1899: नोबेल पारितोषिक विजेते अमेरिकन लेखक अर्नेस्ट हेमिंग्वे यांचा जन्म. (मृत्यू: २ जुलै १९६१)
21 जुलै 1910: स्वातंत्र्यसैनिक, रोजगार हमी योजनेचे जनक वि. स. पागे यांचा जन्म. (मृत्यू: १६ मार्च १९९०)
21 जुलै 1911: भारतीय लेखक, कवी आणि विद्वान उमाशंकर जोशी यांचा जन्म. (मृत्यू: १९ डिसेंबर १९८८)
21 जुलै 1920: गीतकार आनंद बक्षी यांचा जन्म. (मृत्यू: ३० ऑगस्ट २००२)
21 जुलै 1930: भारतीय संस्कृतीचे अभ्यासक संशोधक डॉ. रा. चिं. ढेरे यांचा जन्म.
21 जुलै 1934: क्रिकेट कप्तान आणि निवड समितीचे अध्यक्ष चंदू बोर्डे यांचा जन्म.
21 जुलै 1945: दक्षिण आफ्रिकेचा क्रिकेट खेळाडू बॅरी रिचर्ड्स यांचा जन्म.
21 जुलै 1947: सलामीचे फलंदाज आणि राज्यसभा सदस्य चेतन चौहान यांचा जन्म.
21 जुलै 1960: पंजाबी गायक अमरसिंग चमकीला यांचा जन्म. (मृत्यू: ८ मार्च १९८८)
मृत्यू (21 JULY)
21 जुलै 1972: भूतानचे राजे जिग्मेदोरजी वांगचूक यांचे निधन. (जन्म: २ मे १९२९)
21 जुलै 1994: मराठी बखर वाङ्मयाचे अभ्यासक डॉ. र. वि. हेरवाडकर यांचे निधन.
21 जुलै 1995: संगीतकार मेंडोलिन वादक सज्जाद हुसेन यांचे निधन.
21 जुलै 1997: साहित्यिक राजा राजवाडे यांचे निधन. (जन्म: १ जानेवारी १९३६)
21 जुलै 1998: अमेरिकन अंतराळवीर ऍलन शेपर्ड यांचे निधन.
21 जुलै 2001: दाक्षिणात्य अभिनेते शिवाजी गणेशन यांचे निधन. (जन्म: १ ऑक्टोबर १९२८)
21 जुलै 2002: मराठी चित्रकार गोपाळराव बळवंतराव कांबळे यांचे निधन.
21 जुलै 2009: किराणा घराण्याच्या शास्त्रीय गायिका गंगूबाई हनगळ यांचे निधन. (जन्म: ५ मार्च १९१३)
21 जुलै 2013: भारतीय मार्शल आर्टिस्ट लूरेम्बॅम ब्रजेशोतोरी देवी यांचे निधन. (जन्म: १ जानेवारी १९८१)
जुलै महिन्यातील दिनविशेष
जुलै महिन्यातील महत्त्वाच्या आणि विशेष घटना
मुंबई विद्यापीठाची स्थापना.दिनांक : 18 जुलै 1857
भारताचा कारगिल युद्धात विजय झाला.दिनांक : 26 जुलै 1999
लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांचा रत्नागिरी जिल्ह्यातील चिखलगाव येथे जन्म. (मृत्यू: १ ऑगस्ट १९२० – मुंबई)दिनांक : 23 जुलै 1856
आधुनिक मुंबईचे शिल्पकार जगन्नाथ उर्फ नाना शंकर शेटे यांचे निधन. (जन्म: १० फेब्रुवारी १८०३)दिनांक : 31 जुलै 1865
वसंतराव नाईक जयंतीदिनांक : 1 जुलै 1913
FRBM कायदा २००३ अमलात.दिनांक : 5 जुलै 2004
राज्य मतदार दिन (महाराष्ट्र सरकार) सुरुवात.दिनांक : 5 जुलै 2017
बॉम्बे स्पिनिंग अँड वेअविंग मिल स्थापना.दिनांक : 7 जुलै 1854
फोर्ट विल्यम कॉलेज ची स्थापना.दिनांक : 10 जुलै 1800
जागतिक लोकसंख्या दिन सुरुवात.दिनांक : 11 जुलै 1989
जागतिक युवा कौशल्य दिनदिनांक : 15 जुलै 2014
अण्णाभाऊ साठे स्मृतिदिनदिनांक : 18 जुलै 1969
बहिष्कृत हितकारिणी सभेची स्थापना.दिनांक : 20 जुलै 1924
राष्ट्रीय ध्वजाचा स्वीकार.दिनांक : 22 जुलै 1947
१४ बँकांचे राष्ट्रीयकरणदिनांक : 19 जुलै 1969
कोल्हापूर संस्थानात आरक्षणाची तरतूद.दिनांक : 26 जुलै 1902
कारगिल विजय दिवसदिनांक : 26 जुलै 1999