5 जुलै 1687: सर आयझॅक न्यूटन यांनी फिलोसॉफी नॅचरालिस प्रिन्सिपिया मॅथेमॅटिका हे अतिमहत्त्वाचे पुस्तक प्रकाशित केले.
5 जुलै 1811: व्हेनेझुएलाला स्पेनपासुन स्वातंत्र्य मिळाले.
5 जुलै 1830: फ्रान्सने अल्जीरीया पादाक्रांत केला.
5 जुलै 1841: थॉमस कुक यांनी लेस्टर ते लोफबरो अशी पहिली सहल आयोजित केली.
5 जुलै 1884: जर्मनीने कॅमॅरून हा देश ताब्यात घेतला.
5 जुलै 1905: लॉर्ड कर्झन याने बंगालची फाळणी केली.
5 जुलै 1913: बालगंधर्वांनी गंधर्व नाटक मंडळीची स्थापना केली.
5 जुलै 1946: फ्रान्स फॅशन शोमध्ये पदार्पण केल्यानंतर बिकिनीची विक्री सुरु.
5 जुलै 1950: इस्रायलच्या क्वेन्सेटने जगातील ज्यू व्यक्तीला इस्रायलमध्ये राहण्याचा हक्क दिला.
5 जुलै 1954: आंध्रप्रदेश उच्च न्यायालयाची स्थापना.
5 जुलै 1954: बीबीसीने पहिले टेलिव्हिजन बातम्या बुलेटिन प्रसारित केले.
5 जुलै 1962: अल्जीरीयाला फ्रान्सपासुन स्वातंत्र्य मिळाले
5 जुलै 1975: देवी या रोगाचे भारतातून समूळ उच्चाटन झाल्याचे जागतिक आरोग्य संघटनेने (WHO) जाहीर केले.
5 जुलै 1975: केप व्हर्डेला पोर्तुगालकडून स्वातंत्र्य मिळाले.
5 जुलै 1975: विम्बल्डन एकेरी लॉन टेनिस स्पर्धा जिंकणारा आर्थर अॅश हे पहिले कृष्णवर्णीय खेळाडू बनले.
5 जुलै 1977: पाकिस्तानमध्ये लष्करी उठाव. झुल्फिकार अली भुत्तो तुरुंगात.
5 जुलै 1980: स्वीडन टेनिसपटू ब्योर्न बोरग यांनी विम्बल्डन एकेरी लॉन टेनिस स्पर्धा सलग पाच वेळा जिंकली.
5 जुलै 1996: डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम आणि एन. पंत यांना आर्यभट्ट पुरस्कार जाहीर.
5 जुलै 1997: स्वित्झर्लंडच्या १६ वर्षाच्या मार्टिना हिंगीसने चेक प्रजासत्ताकाच्या याना नोव्होत्नाला पराभूत करून विम्बल्डन टेनिस स्पर्धेतील महिला एकेरीचे विजेतेपद जिंकण्याची कामगिरी केली.
5 जुलै 2009: अँडी रॉडीकला विम्बल्डनमधे पराभूत करुन रॉजर फेडररने विक्रमी १५ वे ग्रँड स्लॅम विजेतेपद जिंकले.
5 जुलै 2012: ३१० मीटर (१०२० फूट) उंचीसह लंडनमधील द शर्ड ही युरोपमधील सर्वात उंच इमारत ठरली.
5 जुलै 2004: FRBM कायदा २००३ अमलात.
5 जुलै 2017: राज्य मतदार दिन (महाराष्ट्र सरकार) सुरुवात.