9 June Dinvishesh

9 June Dinvishesh (९ जून दिनविशेष) For MPSC / UPSC and Any Competitive Exam. You can use following search box to find out more dinvishesh like 9 June 2024 Dinvishesh by just typing day along with the month number. (eg. If you want to search for 15th August then type 15-08).

आपल्या मित्रांना पाठवा :

९ जून महत्वाच्या घटना

संपूर्ण दिनविशेष दिनदर्शिकायेथे क्लिक करा आणि लगेच डाऊनलोड करा आपल्या मोबाईल / कॉम्पुटर मध्ये. (75% Discount)
६८: ६८ ई .पुर्व : रोमन सम्राट नीरो याने आत्महत्या केली.
१६६५: मिर्झाराजे जयसिंग आणि छत्रपती शिवाजी महाराज यांच्यात पुरंदरचा तह झाला.
१६९६: छत्रपती राजाराम आणि महाराणी ताराबाई यांना तामिळनाडुतील जिंजी किल्ल्यावर पुत्ररत्‍न झाले. मुलाचे नाव शिवाजी असे ठेवले.
१७००: दख्खन स्वारीवर असलेल्या औरंगजेबाने सज्जनगड जिंकला.
१८६६: अलाहाबाद उच्च न्यायालयाची स्थापना.
१९००: भारतीय राष्ट्रवादी बिरसा मुंडा यांचे ब्रिटिशांच्या तुरुंगात निधन झाले.
१९०६: स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे लंडनला प्रयाण.
१९०७: नॉर्धनम्प्टनशायर क्रिकेट संघ १२ धावांत सर्वबाद.
१९२३: बल्गेरियात लष्करी उठाव झाला.
१९३१: रॉबर्ट गोडार्ड या शास्त्रज्ञाला अंतराळ प्रक्षेपणासाठी वापरल्या जाणार्‍या रॉकेटचे पेटंट मिळाले.
१९३४: डोनाल्ड डक पहिल्यांदा द व्हाइज लिटिल मर्न मध्ये दिसले.
१९३५: एडविन आर्मस्ट्राँगने पहिल्यांदा एफ.एम. लहरींचे प्रसारण केले.
१९४६: राजे भूमिबोल अतुल्यतेज थायलंडच्या राजसिंहासनावर विराजमान झाले. कोणत्याही देशावर सर्वात दीर्घकाळ राज्य करणारे हे राजे आहेत.
१९६४: भारताचे दुसरे पंतप्रधान म्हणून लाल बहादुर शास्त्री यांनी सूत्रे हाती घेतली.
१९७०: अ‍ॅनामे हेस, एलिझाबेथ पी. हॉइसिंग्टन या अमेरिकन सैन्यातील पहिल्या स्त्री जनरल झाल्या.
१९७४: सोविएत रशिया आणि पोर्तुगाल यांच्यात राजनैतिक संबंध पुन्हा प्रस्थापित झाले.
१९७५: ब्रिटनमधील लोकसभेच्या (House of Commons) कामकाजाचे दूरचित्रवाणीवरुन थेट प्रसारण सुरू झाले.
१९९७: सुखोई-३० के ही रशियन बनावटीची विमाने भारतीय हवाई दलात दाखल.
२००१: भारताच्या लिअँडर पेस व महेश भूपतीने फ्रेन्च टेनिस स्पर्धेच्या पुरुष दुहेरी गटाचे विजेतेपद मिळवले.
२००४: कॅसिनी-हायगेन्सअंतराळयान शनिचा उपग्रह फीबी जवळून गेले.
२००६: १८ वी फुटबॉल विश्वकरंडक स्पर्धा जर्मनीच्या म्युनिक शहरात सुरू झाली.
२००७: बांगलादेशातील चितगावमध्ये भूस्खलनामुळे १३० लोक ठार झाले.

९ जून जन्म

संपूर्ण दिनविशेष दिनदर्शिकायेथे क्लिक करा आणि लगेच डाऊनलोड करा आपल्या मोबाईल / कॉम्पुटर मध्ये. (75% Discount)
१६७२: रशियाचा झार पीटर द ग्रेट (पहिला) यांचा जन्म. (मृत्यू: ८ फेब्रुवारी १७२५)
१८४५: भारताचे ३६वे गव्हर्नर-जनरल गिल्बर्ट इलियट-मरे-क्यंनमॉंड यांचा जन्म. (मृत्यू: १ मार्च १९१४)
१८९७: क्रांतिकारक रामप्रसाद बिस्मिल यांचा जन्म.
१९१२: संगीतकार वसंत देसाई यांचा जन्म. (मृत्यू: २२ डिसेंबर १९७५)
१९३१: भारतीय लेखक व राजकारणी नंदिनी सत्पथी यांचा जन्म. (मृत्यू: ४ ऑगस्ट २००६)
१९४९: सामाजिक कार्यकर्त्या व भारतातील पहिल्या महिला आय. पी. एस. अधिकारी किरण बेदी यांचा जन्म.
१९७७: अभिनेत्री अमिशा पटेल यांचा जन्म.
१९८१: इंग्लिश-भारतीय सतार वादक आणि संगीतकार अनुष्का शंकर यांचा जन्म.
१९८५: अभिनेत्री सोनम कपूर यांचा जन्म.

९ जून मृत्यू

संपूर्ण दिनविशेष दिनदर्शिकायेथे क्लिक करा आणि लगेच डाऊनलोड करा आपल्या मोबाईल / कॉम्पुटर मध्ये. (75% Discount)
६८: ६८ई.पुर्व : रोमन सम्राट नीरो यांनी आत्महत्या केली. (जन्म: १५ डिसेंबर ३७)
१७१६: शिख सेनापती बंदा सिंग बहादूर यांचे निधन. (जन्म: १६ ऑक्टोबर १६७०)
१८३४: अर्वाचीन बंगाली व मराठी गद्यलेखनाचा पाया घालणारे धर्मप्रसारक पं. विल्यम केरी यांचे निधन. (जन्म: १७ ऑगस्ट १७६१)
१८७०: इंग्लिश कादंबरीकार व लेखक चार्ल्स डिकन्स यांचे निधन. (जन्म: ७ फेब्रुवारी १८१२)
१९००: आदिवासी स्वातंत्र्यसैनिक बिरसा मुंडा यांचा ब्रिटिशांच्या कैदेत संशयास्पदरित्या मृत्यू. (जन्म: १५ नोव्हेंबर १८७५)
१९४६: थायलँडचा राजा आनंद महिडोल तथा राम (सातवा) यांचे निधन. (जन्म: २० सप्टेंबर १९२५)
१९८८: अभिनेते गणेश भास्कर अभ्यंकर ऊर्फ विवेक यांचे निधन.
१९९३: बंगाली व हिन्दी चित्रपट दिग्दर्शक व पटकथालेखक सत्येन बोस यांचे निधन. (जन्म: २२ जानेवारी १९१६)
१९९५: स्वातंत्र्यसैनिक, संसदपटू, शेतकरी चळवळीतील नेते प्रा. गोगिनेनी रंगा नायकुलू ऊर्फ एन. जी. रंगा यांचे निधन.(जन्म: ७ नोव्हेंबर १९००)
१९९७: इंग्लिश खाडी पोहून जाणारे पहिले भारतीय मिहिर सेन यांचे निधन.
२०००: कॉँग्रेस नेता केंद्रीय मंत्री राजेश पायलट यांचे निधन.
२०११: चित्रकार व दिग्दर्शक मकबूल फिदा हुसेन यांचे निधन. (जन्म: १७ सप्टेंबर १९१५)

जून महिन्यातील महत्त्वाच्या आणि विशेष घटना

NMK

दिनांक : २ जून २०१४

NMK

दिनांक : ३ जून १९४७

NMK

दिनांक : ६ जून १६७४

NMK

दिनांक : २१ जून २०१५

NMK

दिनांक : ५ जून १९७४

NMK

दिनांक : २५ जून १८७४

आपल्या मित्रांना पाठवा :
Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.