1 जुलै 1693: संभाजीराजांच्या मृत्यूनंतर मोगलांकडे गेलेला सिंहगड नवजी बलकवडे यांनी पुन्हा स्वराज्यात आणला.
1 जुलै 1837: जन्म, मृत्यू व विवाह यांच्या सरकारी नोंदणीस इंग्लंडमधे सुरूवात झाली.
1 जुलै 1874: पहिले व्यावसायिक टंकलेखन यंत्र (टाइपराइटर) ची विक्री सुरु झाली.
1 जुलै 1881: जगातील पहिला टेलिफोन कॉल करण्यात आला.
1 जुलै 1903: पहिल्या टूर डी फ्रान्स सायकल रेसची सुरवात झाली.
1 जुलै 1908: एसओएस (SOS) हे आंतरराष्ट्रीय तत्काळ चिन्ह म्हणून स्वीकारण्यात आले.
1 जुलै 1909: क्रांतिकार कमदनलाल धिंग्रा यांनी कर्नल विल्यम कर्झन वायली यांची गोळ्या झाडून हत्या केली.
1 जुलै 1919: कै. बाबूराव ठाकूर यांनी तरुणभारत वृत्तपत्राची सुरुवात.
1 जुलै 1933: नाट्यमन्वंतरच्या आंधळ्यांची शाळा नाटकाचा १ला प्रयोग झाला.
1 जुलै 1934: मानवी शरीराचे सर्वप्रथम छायाचित्र घेण्यात अमेरिकन डॉक्टरांना यश आले.
1 जुलै 1947: फिलिपाइन्सच्या वायूदलाची स्थापना झाली.
1 जुलै 1948: बाजारपेठेतील व्यापार्यांचे नेतृत्त्व करणार्या पूना मर्चंट्स चेंबर या संस्थेची स्थापना झाली.
1 जुलै 1948: कायदेआझम मुहम्मद अली जीना यांच्या हस्ते स्टेट बँक ऑफ पाकिस्तान या पाकिस्तानच्या मध्यवर्ती बँकेचे उद्घाटन झाले.
1 जुलै 1949: त्रावणकोर आणि कोचीन ही संस्थाने एकत्र करून थिरुकोची संस्थान निर्माण झाले.
1 जुलै 1955: स्टेट बँक ऑफ इंडिया अॅक्ट १९५५ अन्वये स्टेट बँक ऑफ इंडिया अस्तित्वात आली. या आधी बँकचे नाव इंपिरिअल बँक होते.
1 जुलै 1960: रवांडा व बुरुंडी हे देश स्वतंत्र झाले.
1 जुलै 1961: महामहोपाध्याय दत्तो वामन पोतदार पुणे विद्यापीठाचे चौथे कुलगुरू म्हणून सूत्रे हाती घेतले.
1 जुलै 1962: सोमालिया व घाना हे देश स्वतंत्र झाले.
1 जुलै 1963: अमेरिकेतील पत्रव्यवहारामध्ये झिप कोड वापराची सुरवात करण्यात आली.
1 जुलै 1964: न. वि. गाडगीळ पुणे विद्यापीठाचे पाचवे कुलगुरू झाले.
1 जुलै 1966: कॅनडा मधील पहिल्या रंगीत टेलिव्हिजन चे प्रक्षेपण टोरांटो येथून सुरु झाले.
1 जुलै 1979: सोनी कंपनी ने व्हॅकमन प्रकाशित केला.
1 जुलै 1980: ओ कॅनडा हे अधिकृतपणे कॅनडाचे राष्ट्रागीत बनले.
1 जुलै 1991: सोविएत रशिया, अल्बानिया, बल्गेरिया, झेकोस्लोव्हाकिया, हंगेरी, पोलंड, रुमानिया आणि पूर्व जर्मनी या कम्युनिस्ट राष्ट्रांत अस्तित्त्वात असलेला वॉर्सा करार संपुष्टात आला.
1 जुलै 1997: सर्वोत्कृष्ट वेटलिफ्टर्सच्या यादीत भारताची कुंजराणी देवी यांना स्थान मिळाले.
1 जुलै 2001: फेरारी संघाच्या मायकेल शूमाकरने जागतिक फॉर्मुला वन मालिकेतील फ्रेन्च ग्रां. प्री. शर्यत जिंकून फॉर्मुला वन मालिकेतील ५० वे विजेतेपद पटकावले.
1 जुलै 2002: आंतरराष्ट्रीय गुन्हे न्यायालयाची स्थापना झाली.
1 जुलै 2007: इंग्लंड मध्ये सर्व सार्वजनिक स्थानांवर धूम्रपान करण्यास बंदी घालण्यात आली.
1 जुलै 2015: डिजिटल इंडिया या प्रकल्पाचे उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले.