24 August Dinvishesh


24 August Dinvishesh (२४ ऑगस्ट दिनविशेष) For MPSC / UPSC and Any Competitive Exam. You can use following search box to find out more dinvishesh like 24 August 2022 Dinvishesh by just typing day along with the month number. (eg. If you want to search for 15th August then type 15-08).

जानेवारी
फेब्रुवारी
मार्च
एप्रिल
मे
जून
जुलै
ऑगस्ट
सप्टेंबर
ऑक्टोबर
नोव्हेंबर
डिसेंबर

२४ ऑगस्ट महत्वाच्या घटना

७९: ७९ई.पुर्व : इटलीतील माउंट व्हेसुव्हियस ज्वालामुखीचा उद्रेक. पॉम्पेई, हर्क्युलेनियम स्टेबी ही शहरे राखेखाली दडपली जाऊन नष्ट.

१६०८: ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीचा पहिला प्रतिनिधी सुरत ला दाखल.

१६९०: कोलकाता शहराची स्थापना.

१८७५: कॅप्टन मॅथ्यू व्हेब इंग्लिश खाडी पोहणारे पहिला व्यक्ती ठरले.

१८९१: थॉमस अल्वा एडिसनने चलचित्र कॅमेऱ्याचे पेटंट घेतले.

१९५०: एडिथ सॅम्पसन हा संयुक्त राष्ट्रात जाणारा पहिला कृष्णवर्णीय अमेरिकन प्रतिनिधी ठरला.

१९३६: ऑस्ट्रेलियन अंटार्क्टिक प्रदेश तयार करण्यात आला.

१९६६: रशियाचे लुना-११ हे मानव विरहित यान चांद्र मोहिमेवर निघाले.

१९६६: विक्रमवीर भारतीय जलतरणपटू मिहिर सेन यांनी जिब्राल्टरची सामुद्रधुनी पोहून पार केली.

१९९१: युक्रेन सोव्हिएत युनियनपासून स्वतंत्र झाला.

१९९५: मायक्रोसॉफ्टने विंडोज ९५ ही संगणकप्रणाली प्रकाशित केली.

२४ ऑगस्ट जन्म

१८३३: गुजराथी लेखक समाजसुधारक नर्मदाशंकर दवे ऊर्फ नर्मद यांचा जन्म. (मृत्यू: २६ फेब्रुवारी १८८६)

१८७२: केसरी वृत्तपत्राचे संपादक तसेच कायदेमंडळाचे सभासद न. चिं. केळकर यांचा जन्म. (मृत्यू: १४ ऑक्टोबर १९४७)

१८८०: निरक्षर पण प्रतिभावान कवयित्री बहिणाबाई चौधरी यांचा जन्म. (मृत्यू: ३ डिसेंबर १९५१)

१८८८: स्वतंत्र भारतातील मुंबई राज्याचे पहिले मुख्यमंत्री बाळ गंगाधर खेर यांचा जन्म. (मृत्यू: ८ मार्च १९५७)

१८८८: मार्टिन बेकर एरिक कंपनी चे सहसंस्थापक वेलेंटाइन बेकर यांचा जन्म. (मृत्यू: १२ सप्टेंबर १९४२)

१९०८: क्रांतिकारक शिवराम हरी राजगुरू यांचा जन्म. (मृत्यू: २३ मार्च १९३१)

१९१७: किराणा घराण्याचे गायक पं. बसवराज राजगुरू यांचा जन्म.

१९१८: केन्द्रीय परराष्ट्रमंत्री सिकंदर बख्त यांचा जन्म. (मृत्यू: २३ फेब्रुवारी २००४)

१९२७: नोबेल पारितोषिक विजेते अमेरिकन अर्थशास्त्रज्ञ हॅरी मार्कोवित्झ यांचा जन्म.

१९२७: भारतीय अभिनेत्री आणि निर्मात्या अंजली देवी यांचा जन्म.

१९२९: नोबेल पारितोषिक विजेते पॅलेस्टाइनचे नेते यासर अराफत यांचा जन्म. (मृत्यू: ११ नोव्हेंबर २००४)

१९३२: व्यासंगी साहित्यसमीक्षक रावसाहेब जाधव यांचा जन्म.

१९४४: ओडीसी नर्तिका संयुक्ता पाणिग्रही यांचा जन्म. (मृत्यू: २४ जून १९९७)

१९४५: डब्ल्यू.डब्ल्यू.ई. (WWE) चे सहसंस्थापक विन्स मॅकमेहन यांचा जन्म.

१९४७: ब्राझीलियन लेखक पाउलो कोएलो यांचा जन्म.

२४ ऑगस्ट मृत्यू

१९२५: संस्कृत पण्डित, प्राच्यविद्या संशोधक, भाषाशास्त्रज्ञ, इतिहास संशोधक व समाजसुधारक सर रामकृष्ण गोपाळ भांडारकर यांचे निधन. (जन्म: ६ जुलै १८३७)

१९६७: कैसर शिपयार्ड आणि कैसर एल्युमिनियम चे संस्थापक हेन्री जे. कैसर यांचे निधन. (जन्म: ९ मे १८८२)

१९९३: क्रिकेटमहर्षी प्रथमश्रेणीचे क्रिकेट खेळाडू दि. ब. देवधर यांचे निधन. (जन्म: १४ जानेवारी १८९२)

२०००: कल्याणजी-आनंदजी या संगीतकार द्वयीतील ज्येष्ठ बंधू कल्याणजी वीरजी शहा यांचे निधन. (जन्म: ३० जून १९२८)

२००८: चिनी भाषेमधील कवी, लेखक, पत्रकार वै वै यांचे निधन.

२०१९: भारताचे केंद्रीय अर्थमंत्री आणि भाजपचे ज्येष्ठ नेते अरुण जेटली यांचे निधन. (जन्म: २८ डिसेंबर १९५२)

ऑगस्ट महिन्यातील इतर महत्त्वाच्या आणि विशेष घटना

NMK
भारत देश स्वतंत्र झाला.
NMK
भारतीय हॉकीपटू मेजर ध्यानचंद यांचा जन्म. (मृत्यू: ३ डिसेंबर १९७९)
NMK
असहकार चळवळ प्रारंभ
दिनांक : १ ऑगस्ट १९२०
NMK
राष्ट्रीय विकास परिषदेची स्थापना.
दिनांक : ६ ऑगस्ट १९५२
NMK
आसियान ची स्थापना
दिनांक : ८ ऑगस्ट १९६७
NMK
भारत छोडो दिन
दिनांक : ९ ऑगस्ट १९४२
NMK
ISRO ची स्थापना
NMK
रॅमसे मॅक्डोनाल्ड चा जातीय निवाडा.
NMK
वन्यजीव संरक्षण कायदा संमत.
NMK
राष्ट्रीय क्रीडा दिन