२८ सप्टेंबर दिनविशेष


28 September Dinvishesh For MPSC / UPSC and Any Competitive Exam. You can use following search box to find out more dinvishesh by just typing day along with the month number. (eg. If you want to search for 15th August then type 15-08).

जानेवारी
फेब्रुवारी
मार्च
एप्रिल
मे
जून
जुलै
ऑगस्ट
सप्टेंबर
ऑक्टोबर
नोव्हेंबर
डिसेंबर

२८ सप्टेंबर महत्वाच्या घटना

१९२४: पहिली पृथ्वी प्रदक्षिणा करणारी विमान फेरी पूर्ण झाली.

१९२८: सर अलेक्झांडर फ्लेमिंग यांना प्रयोगशाळेत विशिष्ट प्रकारच्या जिवाणूंची वाढ होताना आढळली. यातूनच पुढे पेनिसिलिन या प्रतिजैविकाचा शोध लागला.

१९३९: दुसरे महायुद्ध – वॉर्साने नाझी जर्मनीसमोर शरणागती पत्करली.

१९५०: इंडोनेशिया देशाचा संयुक्त राष्ट्रांत प्रवेश.

१९५८: फ्रान्स देशाने नवीन संविधान स्वीकारले.

१९६०: माली आणि सेनेगल देशांचा संयुक्त राष्ट्रांत प्रवेश.

१९९९: आशा भोसले यांना गानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार जाहीर.

२०००: नाटककार विजय तेंडुलकर यांना विष्णुदास भावे गौरव पुरस्कार जाहीर.

२००२: सलमान खान यांच्या पांढऱ्या टोयोटा लँडक्रुझर गाडीचा वांद्रे येथे अपघात, अपघातात १ मृत्यू टर ४ गंभीर जखमी. सलमान खानच्या रक्ताचे नमुने घेण्यात आले. पोलिसांकडून अटक व जमीन वर सुटका.

२००८: स्पेसएक्स कंपनी ने फाल्कन १ हे पहिले खाजगी अंतराळयान प्रक्षेपित केले.

२८ सप्टेंबर जन्म

१८०३: फ्रेंच कथालेखक, नाटककार, इतिहासकार आणि पुरातत्त्वज्ञ प्रॉस्पर मेरिमी यांचा जन्म. (मृत्यू: २३ सप्टेंबर १८७०)

१८३६: बॉलकोक चे संशोधकथॉमस क्रैपर यांचा जन्म. (मृत्यू: २७ जानेवारी १९१०)

१८६७: जपानी पंतप्रधान कीचिरो हिरानुमा यांचा जन्म.

१८९८: स्वातंत्र्यसैनिक व पत्रकार शंकर रामचंद्र तथा मामाराव दाते यांचा जन्म.

१९०७: क्रांतिकारक भगत सिंग यांचा जन्म. (मृत्यू: २३ मार्च १९३१)

१९०९: हिंदी चित्रपटसृष्टीतील ज्येष्ठ अभिनेते पी. जयराज यांचा जन्म. (मृत्यू: ११ ऑगस्ट २०००)

१९२५: अमेरिकन संगणकशास्त्रज्ञ सेमूर क्रे यांचा जन्म.

१९२९: जगप्रसिद्ध पार्श्वगायिका लता मंगेशकर यांचा जन्म.

१९४६: पाकिस्तानी क्रिकेट कप्तान माजिद खान यांचा जन्म.

१९४७: बांगलादेशच्या १०व्या पंतप्रधान शेख हसीना यांचा जन्म.

१९६६: भारतीय दिग्दर्शक, निर्माते आणि पटकथालेखक पुरी जगन्नाथ यांचा जन्म.

१९८२: ऑलिम्पिकमध्ये वयक्तिक सुवर्णपदक मिळवणारे पहिले भारतीय अभिनव बिंद्रा यांचा जन्म.

१९८२: चित्रपट अभिनेता रणबीर कपूर यांचा जन्म.

२८ सप्टेंबर मृत्यू

१८९५: रेबीज किंवा हैड्रोफोबिया रोगावर लस शोधणारें रसायनशास्त्रज्ञ लुई पाश्चर यांचे निधन. (जन्म: २७ डिसेंबर १८२२)

१९३५: कायनेटोस्कोप चे संशोधक विल्यम केनेडी डिक्सन यांचे निधन. (जन्म: ३ ऑगस्ट १८६०)

१९५३: अमेरिकन खगोलशास्त्रज्ञ एडविन हबल यांचे निधन. (जन्म: २० नोव्हेंबर १८८९)

१९५६: बोइंग विमान कंपनीचे संस्थापक विल्यम बोइंग यांचे निधन. (जन्म: १ ऑक्टोबर १८८१)

१९७०: इजिप्तचे दुसरे राष्ट्राध्यक्ष गमाल अब्दल नासर यांचे निधन.

१९८१: व्हेनेझुएलाचे राष्ट्राध्यक्ष रोम्लो बेटानको यु र्ट यांचे निधन.

१९८९: फिलिपाइन्सचे १० वे राष्ट्राध्यक्ष फर्डिनांड मार्कोस यांचे निधन. (जन्म: ११ सप्टेंबर १९१७)

१९९१: अमेरिकन जॅझ संगीतकार माइल्स डेव्हिस यांचे निधन.

१९९२: पानशेत पूरग्रस्तांना न्याय मिळवून देण्यासाठी दीर्घकाळ लढा देणारे मेजर ग. स. ठोसर यांचे निधन.

१९९४: भारतीय चित्रपट अभिनेते आणि कॉमेडियन के. ए. थांगवेलू यांचे निधन. (जन्म: १५ जानेवारी १९१७)

२०००: सोलापूरचे प्रसिद्ध पंचांगकर्ते श्रीधरपंत दाते यांचे निधन.

२००४: इंग्रजी भाषेतून लिखाण करणारे लेखक डॉ. मुल्कराज आनंद यांचे निधन. (जन्म: १२ डिसेंबर १९०५)

२०१२: चित्रपट संकलनासाठी शोले या चित्रपटाचे सर्वोत्तम पारितोषिक विजेते प्रसिद्ध संकलक एम. एस. शिंदे यांचे निधन.

२०१२: राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार ब्रजेश मिश्रा यांचे निधन. (जन्म: २९ सप्टेंबर १९२८)

सप्टेंबर महिन्यातील इतर महत्त्वाच्या आणि विशेष घटना

NMK
भारतात अंतरिम सरकारची स्थापना झाली.
NMK
हिंदी हि भारताची राष्ट्रभाषा म्हणून घोषित करून हिंदी दिन साजरा केला.
NMK
प्रायोगिक तत्त्वावर भारतातील पहिली दूरदर्शन सेवा.
NMK
महात्मा फुले यांनी सत्यशोधक समाजाची स्थापना केली.
NMK
भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे एक संस्थापक, ब्रिटिश संसदेचे सदस्यत्त्व मिळवणारे पहिले भारतीय पितामह दादाभाई नौरोजी यांचा जन्म. (मृत्यू: ३० जून १९१७)
NMK
भारताचे दुसरे राष्ट्रपती, तत्त्वज्ञ डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांचा जन्म. (मृत्यू: १७ एप्रिल १९७५)
NMK
आद्द क्रांतिकारक स्वातंत्र्य सैनिक उमाजी नाईक यांचा जन्म. (मृत्यू: ३ फेब्रुवारी १८३२)
NMK
भारतरत्न पुरस्कृत सर मोक्षमुंडम विश्वेश्वरैया यांचा मदनहळ्ळी म्हैसूर येथे जन्म. (मृत्यू: १४ एप्रिल १९६२)
NMK
विख्यात शास्त्रीय गायिका एम. एस. सुब्बुलक्ष्मी यांचा जन्म. (मृत्यू: ११ डिसेंबर २००४)
NMK
NCERT स्थापना
NMK
जागतिक पर्यटन दिन