1 October Dinvishesh


1 October Dinvishesh (१ ऑक्टोबर दिनविशेष) For MPSC / UPSC and Any Competitive Exam. You can use following search box to find out more dinvishesh like 1 October 2022 Dinvishesh by just typing day along with the month number. (eg. If you want to search for 15th August then type 15-08).

जानेवारी
फेब्रुवारी
मार्च
एप्रिल
मे
जून
जुलै
ऑगस्ट
सप्टेंबर
ऑक्टोबर
नोव्हेंबर
डिसेंबर

१ ऑक्टोबर महत्वाच्या घटना

१७९१: फ्रेन्च संसदेचे पहिले अधिवेशन सुरू झाले.

१८३७: भारतातील पहिले टपाल कार्यालय सुरू झाले.

१८८०: थॉमस एडिसनने विद्युत दिव्यांचा कारखाना सुरू केला.

१८९१: स्टॅनफोर्ड विद्यापीठाची स्थापना झाली.

१९४३: दुसरे महायुद्ध – दोस्त राष्ट्रांच्या फौजांनी नेपल्स शहरावर ताबा मिळवला.

१९४६: युनायटेड किंग्डममधे मेन्सा इंटरनॅशनल या संस्थेची ची स्थापना झाली.

१९४९: संगीत रंगभूमीवरील गायक,अभिनेते जयराम शिलेदार यांनी स्वत:ची मराठी रंगभूमी नाट्यसंस्था स्थापन केली.

१९५८: भारतात दशमान (मेट्रिक) पद्धत वापरण्यास सुरूवात झाली.

१९५९: भुवनेशप्रसाद सिन्हा यांनी भारताचे ६ वे सरन्यायाधीश म्हणुन कार्यभार सांभाळला.

१९६०: नायजेरियाला (युनायटेड किंगडमपासुन) स्वातंत्र्य मिळाले.

१९६९: कॉनकॉर्ड विमान प्रथमच ध्वनीगती पेक्षा जोरात उडण्यात यशस्वी झाले.

१९७१: अमेरिकेतील वॉल्ट डिस्ने वर्ल्ड सुरु झाले.

१९८२: सोनी कंपनीने पहिले कॉम्पॅक्ट डिस्क प्लेयर प्रकाशित केले.

१९९२: कार्टून नेटवर्क सुरु झाले.

२००२: भारतीय दंड संहिता, मोटार वाहन कायदा, १९८८ आणि मुंबई प्रतिबंधक कायदा १९४९ अंतर्गत सलमान खान वर गुन्हा दाखल. तसेच मुंबई पोलिसांनी सलमान विरुद्ध भारतीय दंड संहिता कला ३०४(भाग-२) अंतर्गत सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल केला.

२००५: इंडोनेशियातील बाली बेटांवर बॉम्बस्फोटांत १९ जण ठार झाले.

१ ऑक्टोबर जन्म

१८४७: थिऑसॉफिस्ट, सामाजिक कार्यकर्त्या व भारतीय स्वातंत्र्याच्या पुरस्कर्त्या अ‍ॅनी बेझंट यांचा जन्म. (मृत्यू: २० सप्टेंबर १९३३)

१८८१: बोईंग विमान कंपनीचे संस्थापक विल्यम बोईंग यांचा जन्म. (मृत्यू: २८ सप्टेंबर १९५६)

१८९५: पाकिस्तानचे पहिले पंतप्रधान लियाकत अली खान यांचा जन्म. (मृत्यू: १६ ऑक्टोबर १९५१)

१९०६: संगीतकार व गायक सचिन देव बर्मन यांचा जन्म. (मृत्यू: ३१ ऑक्टोबर १९७५)

१९१९: गीतकार, कवी, लेखक, पटकथाकार, अभिनेते गजानन दिगंबर तथा ग. दि. माडगूळकर यांचा जन्म. (मृत्यू: १४ डिसेंबर १९७७)

१९१९: दादासाहेब फाळके पुरस्कार विजेते शायर, गीतकार आणि कवी मजरुह सुलतानपुरी यांचा जन्म. (मृत्यू: २४ मे २०००)

१९२४: नोबेल पारितोषिक विजेते अमेरिकेचे ३९ वे राष्ट्राध्यक्ष जिमी कार्टर यांचा जन्म.

१९२८: दाक्षिणात्य अभिनेते विझुपुरम चिन्नया तथा शिवाजी गणेशन यांचा जन्म. (मृत्यू: २१ जुलै २००१)

१९३०: कर्नाटकचे १५ वे मुख्यमंत्री जयदेवप्पा हलप्पा तथा जे. एच. पटेल यांचा जन्म. (मृत्यू: १२ डिसेंबर २०००)

१ ऑक्टोबर मृत्यू

१८६८: थायलंडचा राजा मोंगकुट ऊर्फ राम (चौथा) यांचे निधन. (जन्म: १८ ऑक्टोबर १८०४)

१९३१: नाट्यछटाकार शंकर काशिनाथ गर्गे तथा दिवाकर यांचे निधन. (जन्म: १८ जानेवारी १८८९)

१९५९: इटलीचे पहिले अध्यक्ष इरिको डी निकोला यांचे निधन. (जन्म: ९ नोव्हेंबर १८७७)

१९९७: जगातील सर्वात बुटकी व्यक्ती (२२.१”) गुल मोहम्मद यांचे निधन.

ऑक्टोबर महिन्यातील इतर महत्त्वाच्या आणि विशेष घटना

NMK
सिंगापूर येथे आझाद हिन्द सेनेची स्थापना.
NMK
संयुक्त राष्ट्रांची (United Nations) स्थापना झाली.
NMK
मोहनदास करमचंद गांधी उर्फ महात्मा गांधी यांचा पोरबंदर गुजरात येथे जन्म.
NMK
भारतरत्न लालबहादूर शास्त्री यांचा मुगलसराई उत्तरप्रदेश येथे जन्म. (मृत्यू: ११ जानेवारी १९६६)
NMK
स्वातंत्र्यसैनिक लोकनायक जयप्रकाश नारायण यांचा जन्म. (मृत्यू: ८ ऑक्टोबर १९७९ – पाटणा, बिहार)
NMK
वैज्ञानिक आणि भारताचे ११ वे राष्ट्रपती अवुल पाकिर जैनुलब्दीन उर्फ ए. पी. जे. अब्दुल कलाम यांचा जन्म. (मृत्यू: २५ जुलै २०१५)
NMK
भारतरत्‍न (मरणोत्तर) स्वतंत्र भारताचे पहिले उपपंतप्रधान सरदार वल्लभभाई पटेल यांचा जन्म. (मृत्यू: १५ डिसेंबर १९५०)
NMK
IUCN स्थापना
NMK
वन्यजीव सप्ताह
NMK
राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाची स्थापना.
NMK
महिलांचे कौटुंबिक हिंसाचारापासून संरक्षण प्रतिबंधक नियम अंमलात.