१५ ऑक्टोबर दिनविशेष


15 October Dinvishesh For MPSC / UPSC and Any Competitive Exam. You can use following search box to find out more dinvishesh by just typing day along with the month number. (eg. If you want to search for 15th August then type 15-08).

जानेवारी
फेब्रुवारी
मार्च
एप्रिल
मे
जून
जुलै
ऑगस्ट
सप्टेंबर
ऑक्टोबर
नोव्हेंबर
डिसेंबर

१५ ऑक्टोबर महत्वाच्या घटना

१८४६: अमेरिकन डॉक्टर डॉ. जॉन वॉरेन यांनी शस्त्रक्रिया करताना भूल देण्यासाठी सर्वप्रथम इथर या रसायनाचा वापर केला.

१८७८: एडिसन इलेक्ट्रिक लाईट कंपनीचे काम सुरू झाले.

१८८८: गोपाळ गणेश आगरकर यांनी सुधारक पत्राची सुरूवात केली.

१९१७: पहिले महायुद्ध – जर्मनीसाठी हेरगिरी केल्याबद्दल डच नर्तिका माता हारी हिला पॅरिसजवळ गोळ्या घालून मृत्युदंड देण्यात आला.

१९३२: टाटा एअरलाइन्सचे पहिले उड्डाण झाले. जे. आर. डी. टाटा यांनी हे विमान कराचीहुन मुंबई येथे आणले व नागरी विमानसेवेची सुरुवात केली. याच कंपनीचे पुढे राष्ट्रीयीकरण होऊन एअर इंडिया ही कंपनी अस्तित्त्वात आली.

१९६८: हरगोविंद खुराणा यांना नोबेल पारितोषिक प्रदान.

१९७३: हेन्री किसिंजर आणि ली डक यांना शांततेचा नोबेल पुरस्कार जाहीर.

१९७५: बांगलादेशातील रहिमा बानू ही २ वर्षांची मुलगी ही देवी रोगाचा शेवटचा रुग्ण ठरली.

१९८४: आर्च बिशप डेसमंड टुटू यांना शांततेचा नोबेल पुरस्कार जाहीर.

१९९३: अफ्रिकन नॅशनल काँग्रेसचे नेते नेल्सन मंडेला आणि दक्षिण अफ्रिकेचे अध्यक्ष एफ. डब्ल्यू. डी. क्लर्क यांना शांततेसाठीचा नोबेल पुरस्कार जाहीर.

१९९७: भारतीय लेखिका अरुंधती रॉय यांच्या द गॉड ऑफ स्मॉल थिंग्ज या कादंबरीला साहित्य क्षेत्रात प्रतिष्ठेचा समजला जाणारा बुकर पुरस्कार मिळाला.

१९९९: जागतिक फ्रेड डेव्हिस पुरस्कार भारताच्या गीत सेठी यांना प्रदान.

१५ ऑक्टोबर जन्म

१५४२: तिसरा मुघल सम्राट बादशाह अकबर यांचा जन्म. (मृत्यू: १२ ऑक्टोबर १६०५)

१६०८: इटालियन गणिती व पदार्थ वैज्ञानिक, हवादाबमापीचे (barometer) संशोधक इव्हानजेलिस्टा टॉरिसेली यांचा जन्म. (मृत्यू: २५ ऑक्टोबर १६४७)

१८४१: जपानचे पहिले पंतप्रधान इटो हिरोबुमी यांचा जन्म.

१८८१: इंग्लिश लेखक पी. जी. वूडहाऊस यांचा जन्म. (मृत्यू: १४ फेब्रुवारी १९७५)

१८९६: स्वातंत्र्यसैनिक, लोकसभेचे हंगामी सभापती सेठ गोविंद दास यांचा जन्म.

१९०८: कॅनेडियन-अमेरिकन अर्थशास्त्रज्ञ जे. के. गालब्रेथ यांचा जन्म. (मृत्यू: २९ एप्रिल २००६)

१९२०: अमेरिकन लेखक मारिओ पुझो यांचा जन्म. (मृत्यू: २ जुलै १९९९)

१९२६: कवी नारायण गंगाराम सुर्वे यांचा जन्म. (मृत्यू: १६ ऑगस्ट २०१०)

१९३१: वैज्ञानिक आणि भारताचे ११ वे राष्ट्रपती अवुल पाकिर जैनुलब्दीन उर्फ ए. पी. जे. अब्दुल कलाम यांचा जन्म. (मृत्यू: २५ जुलै २०१५)

१९३४: कर्नाटिक शैलीचे बासरीवादक एन. रामाणी यांचा जन्म.

१९४६: भारतीय अभिनेते आणि दिग्दर्शक व्हिक्टर बॅनर्जी यांचा जन्म.

१९४९: पत्रकार, एन. डी. टी. व्ही. चे संस्थापक प्रणोय रॉय यांचा जन्म.

१९५५: भारतीय फील्ड हॉकी खेळाडू कुलबुर भौर यांचा जन्म.

१९५७: भारतीय वंशाच्या अमेरिकन चित्रपट निर्मात्या व दिग्दर्शिका मीरा नायर यांचा जन्म.

१९६९: मेवाती घराण्याचे शास्त्रीय गायक पं. संजीव अभ्यंकर यांचा जन्म.

१५ ऑक्टोबर मृत्यू

१७८९: उत्तर पेशवाईतील प्रसिद्ध न्यायाधीश रामचंद्र विश्वनाथ तथा रामशास्त्री प्रभुणे यांचे निधन.

१७९३: फ्रेंच राज्यक्रांती – फ्रान्सचा राजा लुई (सोळावा) यांची विधवा पत्नी मेरी अँटोनिएत हिचा गिलोटीनवर वध करण्यात आला.

१९१७: पहिल्या महायुद्धात गाजलेली डच नर्तिका, सौंदर्यवती व गुप्तहेर माता हारी यांचे निधन. (जन्म: ७ ऑगस्ट १८७६)

१९१८: भारतीय गुरू आणि संत शिर्डीचे साई बाबा यांचे निधन.

१९३०: डाऊ केमिकल कंपनी चे संस्थापक हर्बर्ट डाऊ यांचे निधन. (जन्म: १६ फेब्रुवारी १८६६)

१९४४: ओगले काच कारखान्याचे एक संस्थापक गुरुनाथ प्रभाकर ओगले यांचे निधन.

१९४६: जर्मन नाझी हर्मन गोअरिंग यांचे निधन. (जन्म: १२ जानेवारी १८९३)

१९६१: हिन्दी साहित्यिक सूर्यकांत त्रिपाठी निराला यांचे निधन. (जन्म: २१ फेब्रुवारी १८९६)

१९८१: इस्रायली सेना प्रमुख व परराष्ट्रमंत्री, संरक्षणमंत्री मोशे दायान यांचे निधन.

१९९७: मराठी चित्रपटसृष्टीतील छायालेखक दत्ता गोर्ले यांचे निधन.

२००२: प्रसिद्ध एेतिहासिक कादंबरीकार ना. सं. इनामदार यांचे निधन.

२००२: लेखक व पटकथाकार वसंत सबनीस यांचे निधन. (जन्म: ६ डिसेंबर १९२३)

२०१२: कंबोडिया देशाचे पहिले पंतप्रधान नॉरदॉम सिहानोक यांचे निधन. (जन्म: ३१ ऑक्टोबर १९२२)

ऑक्टोबर महिन्यातील इतर महत्त्वाच्या आणि विशेष घटना

NMK
सिंगापूर येथे आझाद हिन्द सेनेची स्थापना.
NMK
संयुक्त राष्ट्रांची (United Nations) स्थापना झाली.
NMK
मोहनदास करमचंद गांधी उर्फ महात्मा गांधी यांचा पोरबंदर गुजरात येथे जन्म.
NMK
भारतरत्न लालबहादूर शास्त्री यांचा मुगलसराई उत्तरप्रदेश येथे जन्म. (मृत्यू: ११ जानेवारी १९६६)
NMK
स्वातंत्र्यसैनिक लोकनायक जयप्रकाश नारायण यांचा जन्म. (मृत्यू: ८ ऑक्टोबर १९७९ – पाटणा, बिहार)
NMK
वैज्ञानिक आणि भारताचे ११ वे राष्ट्रपती अवुल पाकिर जैनुलब्दीन उर्फ ए. पी. जे. अब्दुल कलाम यांचा जन्म. (मृत्यू: २५ जुलै २०१५)
NMK
भारतरत्‍न (मरणोत्तर) स्वतंत्र भारताचे पहिले उपपंतप्रधान सरदार वल्लभभाई पटेल यांचा जन्म. (मृत्यू: १५ डिसेंबर १९५०)
NMK
IUCN स्थापना
NMK
वन्यजीव सप्ताह
NMK
राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाची स्थापना.
NMK
महिलांचे कौटुंबिक हिंसाचारापासून संरक्षण प्रतिबंधक नियम अंमलात.