1 नोव्हेंबर 1683: छत्रपती संभाजी राजे यांच्या फौजेने फोंडा येथे अद्वितीय पराक्रम करून पोर्तुगिजांचा पराभव केला.
1 नोव्हेंबर 1755: भूकंप आणि सुनामीमुळे पोर्तुगालमधील लिस्बन शहर पूर्णपणे उद्ध्वस्त झाले तर सुमारे ६०,००० ते ९०,००० लोक ठार झाले.
1 नोव्हेंबर 1870: अमेरिकेत हवामान विभागाने पहिला अधिकृत हवामान अंदाज सांगितला.
1 नोव्हेंबर 1845: मुंबईत आधुनिक पाश्चात्य पद्धतीचे वैद्यकीय शिक्षण देणाऱ्या आद्य ग्रँट मेडिकल कॉलेज या पहिल्या वैद्यकीय महाविद्यालयाचा प्रारंभ झाला.
1 नोव्हेंबर 1848: महिलांसाठी पहिले वैद्यकीय महाविद्यालय बोस्ट्न, मॅसेच्युसेट्स, यूएसए येथे सुरू झाले. नंतर याचे बोस्टन विश्वविद्यालयात विलीनीकरण झाले.
1 नोव्हेंबर 1896: नॅशनल जिओग्राफिक मॅगझिनमध्ये पहिल्यांदाच नग्न चित्र प्रकाशित झाले.
1 नोव्हेंबर 1925: गोविंदराव देशमुखांच्या अध्यक्षतेखाली मध्यप्रांत वऱ्हाडातील स्वराज्य पक्षाच्या तिन्ही प्रांतिक समित्यांची एक अनौपचारिक संयुक्त बैठक झाली.
1 नोव्हेंबर 1928: हिंदुस्थान सरकारने आपल्याला हवे तसे बदल विधेयकात करून त्याचे कायद्यात रुपांतर केले आणि नवी महसूल संहिता वऱ्हाडात लागू करण्यात आली.
1 नोव्हेंबर 1945: ऑस्ट्रेलियाचा संयुक्त राष्ट्रांत (United Nations) प्रवेश.
1 नोव्हेंबर 1956: भारतामध्ये भाषावार प्रांतरचना अस्तित्त्वात आली.
1 नोव्हेंबर 1956: आंध्र प्रदेश राज्याची निर्मिती झाली. त्यावेळी कुर्नुल ही त्याची राजधानी होती.
1 नोव्हेंबर 1956: दक्षिण भारतातील कन्नड भाषिक प्रदेश एकत्र करुन कर्नाटक राज्याची स्थापना करण्यात आली.
1 नोव्हेंबर 1956: केरळ राज्य स्थापना दिन.
1 नोव्हेंबर 1956: कन्याकुमारी जिल्हा केरळ मधुन तामिळनाडूमध्ये हस्तांतरित करण्यात आला.
1 नोव्हेंबर 1966: पंजाब राज्याची पंजाब व हरियाणा राज्यात विभागणी झाली.
1 नोव्हेंबर 1968: मोशन पिक्चर असोसिएशन ऑफ अमेरिकाच्या फिल्म रेटिंग सिस्टीमची अधिकृतपणे सुरवात झाली.
1 नोव्हेंबर 1973: मैसूर राज्याचे नाव बदलुन ते कर्नाटक असे करण्यात आले.
1 नोव्हेंबर 1973: लखदीप, मिनिकॉय, अग्निदीव बेटांचे नांव लक्षद्वीप असे ठेवण्यात आले.
1 नोव्हेंबर 1982: अमेरिकेत मोटारगाड्यांचे उत्पादन करणारी होंडा ही पहिली आशियाई कंपनी बनली.
1 नोव्हेंबर 1993: औपचारिकपणे युरोपियन युनियन स्थापन झाले.
1 नोव्हेंबर 1994: मराठी चित्रपटसृष्टीतील विशेष कामगिरीचा गौरव म्हणून चित्रपट निर्माते, दिग्दर्शक व लेखक दिनकर द. पाटील यांची चित्रभूषण पुरस्कारासाठी निवड करण्यात आली.
1 नोव्हेंबर 1999: कवी नारायण सुर्वे यांना मध्यप्रदेश सरकारचा कबीर पुरस्कार हा मानाचा पुरस्कार जाहीर करण्यात आला.
1 नोव्हेंबर 2000: सर्बियाचा संयुक्त राष्ट्रांत (United Nations) प्रवेश.
1 नोव्हेंबर 2005: योगेशकुमार सभरवाल यांनी भारताचे ३६वे सरन्यायाधीश म्हणुन कार्यभार सांभाळला.
1 नोव्हेंबर 1956: द्विभाषिक मुंबई राज्याची निर्मिती