1 December Dinvishesh


1 December Dinvishesh (१ डिसेंबर दिनविशेष) For MPSC / UPSC and Any Competitive Exam. You can use following search box to find out more dinvishesh like 1 December 2022 Dinvishesh by just typing day along with the month number. (eg. If you want to search for 15th August then type 15-08).

जानेवारी
फेब्रुवारी
मार्च
एप्रिल
मे
जून
जुलै
ऑगस्ट
सप्टेंबर
ऑक्टोबर
नोव्हेंबर
डिसेंबर

१ डिसेंबर महत्वाच्या घटना

१८३५: हान्स क्रिस्चीयन अँडरसन च्या परीकथांचे पहिले पुस्तक प्रकाशित.

१९१७: कोल्हापूरमधील पॅलेस थिएटरमधे श्रीपतराव काकडे, दामलेमामा, फत्तेलाल, बाबा गजबर, ज्ञानबा मेस्त्री, पंत धर्माधिकारी यांच्या उपस्थितीत बाबूराव पेंटर यांनी महाराष्ट्र फिल्म कंपनीची स्थापना केली.

१९४८: एस. एस. आपटे यांनी हिन्दुस्तान समाचार ही बहुभाषिक वृत्तसंस्था स्थापन केली.

१९६३: नागालँड भारताचे १६ वे राज्य झाले.

१९६४: मालावी, माल्टा आणि झांबियाचा संयुक्त राष्ट्रांत (United Nations) प्रवेश झाला.

१९६५: भारतीय सीमा सुरक्षा दल (बोर्डर सिक्युरिटी फोर्से – बिएसएफ) ची स्थापना झाली.

१९७३: पापुआ न्यू गिनीला ऑस्ट्रेलियाकडून स्वातंत्र्य मिळाले.

१९७६: अंगोलाचा संयुक्त राष्ट्रांत (United Nations) प्रवेश.

१९८०: मराठी विश्वकोश मंडळाची पुनर्रचना करण्यात आली.

१९८१: AIDS विषाणूची प्रथमच ओळख पटली.

१९९२: कलाक्षेत्रात केलेल्या प्रदीर्घ व अविस्मरणीय कामगिरीबद्दल गदिमा प्रतिष्ठानच्या वतीने देण्यात येणारा गदिमा पुरस्कार गायिका आशा भोसले यांना जाहीर.

१९९२: ज्यूडी लेदेन या ब्रिटिश महिलेने ३९७० मीटर (१३०२५ फूट) उंचीवरुन हँग ग्लायडर चालवून उंचीचा नवीन उच्‍चांक प्रस्थापित केला.

१९९३: प्राच्यविद्या विशारद डॉ. रा. ना. दांडेकर, वेदविद्या पारंगत डॉ. चिं. ग. काशिकर आणि प्रसिद्ध साहित्यिक पु. ल. देशपांडे यांना टिळक महाराष्ट्र विद्यापीठातर्फे सन्माननीय डी. लिट. पदवी जाहीर.

१९९९: भारताच्या पहिल्या महिला पंतप्रधान इंदिरा गांधी यांना वूमन ऑफ द मिलेनियम म्हणून मानांकित करण्यात आले.

२०००: नागालँड येथे दरवर्षी १ ते ७ डिसेंबर दरम्यान होर्निबल महोत्सव साजरा करण्याची सुरवात झाली.

२०१५: ज्येष्ठ पत्रकार डॉ. मुझफ्फर हुसैन यांना लोकमान्य टिळक जीवन गौरव पुरस्कार प्रदान केला.

१९८८: जागतिक एड्स दिन.

१ डिसेंबर जन्म

१०८१: फ्रान्सचा राजा लुई (सहावा) यांचा जन्म. (मृत्यू: १ ऑगस्ट ११३७)

१७६१: मॅडम तूसाँ वॅक्स म्युझियम च्या संस्थापिका मेरी तूसाँ यांचा जन्म. (मृत्यू: १६ एप्रिल १८५०)

१८८५: साहित्य अकादमी पारितोषिक विजेते साहित्यिक आचार्य काका कालेलकर यांचा जन्म. (मृत्यू: २१ ऑगस्ट १९८१ – संनिधि आश्रम, नवी दिल्ली)

१९०९: मराठी नवकाव्याचे प्रणेते बाळ सीताराम मर्ढेकर उर्फ बी. सी. मर्ढेकर यांचा जन्म. (मृत्यू: २० मार्च १९५६)

१९११: पत्रकार, कथाकार, कवी आणि समीक्षक अनंत बाळकृष्ण अंतरकर यांचा जन्म. (मृत्यू: ४ ऑक्टोबर १९६६)

१९५०: भारतीय जीवशास्त्रज्ञ आणि शैक्षणिक मंजू बन्सल यांचा जन्म.

१९५५: पार्श्वगायक उदित नारायण यांचा जन्म.

१९६०: भारतीय-इंग्रजी राजकीय शास्त्रज्ञ आणि शैक्षणिक शिरिन एम. राय यांचा जन्म.

१९६३: श्रीलंकेचा क्रिकेटपटू आणि माजी कर्णधार अर्जुन रणतुंगा यांचा जन्म.

१९८०: भारतीय क्रिकेटपटू मोहोम्मद कैफ यांचा जन्म.

१ डिसेंबर मृत्यू

११३५: इंग्लंडचा राजा हेन्री पहिला यांचे निधन.

१८६६: भारताचे सर्वेक्षण करणारे कर्नल सर जॉर्ज एव्हरेस्ट यांचे निधन. (जन्म: ४ जुलै १७९०)

१९७३: इस्रायल देशाचे पहिले पंतप्रधान डेव्हिड बेन गुरियन यांचे निधन. (जन्म: १६ ऑक्टोबर १८८६)

१९८५: स्वातंत्र्यसेनानी व समाजसुधारक शंकर त्रिंबक तथा दादा धर्माधिकारी यांचे निधन. (जन्म: १८ जून १८९९)

१९८८: प्रा. गंगाधर बाळकृष्ण सरदार यांचे निधन.

१९९०: राजदूत, मुत्सद्दी व राजकारणी विजयालक्ष्मी पंडीत यांचे निधन. (जन्म: १८ ऑगस्ट १९००)

डिसेंबर महिन्यातील इतर महत्त्वाच्या आणि विशेष घटना

NMK
भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे निधन. (जन्म: १४ एप्रिल १८९१)
NMK
सार्क परिषदेची स्थापना.
NMK
दिल्लीमध्ये घटना परिषदेची पहिली बैठक.
NMK
युनिसेफ (UNICEF) ची स्थापना.
NMK
थोर भारतीय गणिती श्रीनिवास रामानुजन यांचा जन्म. (मृत्यू: २६ एप्रिल १९२०)
NMK
२८ देशांनी एकत्रित जागतिक बँक (World Bank) आणि आंतरराष्ट्रीय नाणेनिधी (International Monetary Fund) स्थापन केले.
NMK
जागतिक एड्स दिन.
NMK
राष्ट्रीय प्रदूषण नियंत्रण दिवस.
NMK
जागतिक अपंग दिन.
NMK
सुगम्य भारत अभियान.
NMK
भारतीय नौसेना दिवस.
NMK
जागतिक मृदा दिन.
NMK
मानवी हक्क दिन.
NMK
UNHCR ची स्थापना.
NMK
गोवा मुक्ती दिन.
NMK
भारतीय ग्राहक दिन.
NMK
मुस्लिम लिगची स्थापना.