4 November Dinvishesh


4 November Dinvishesh (४ नोव्हेंबर दिनविशेष) For MPSC / UPSC and Any Competitive Exam. You can use following search box to find out more dinvishesh like 4 November 2022 Dinvishesh by just typing day along with the month number. (eg. If you want to search for 15th August then type 15-08).

जानेवारी
फेब्रुवारी
मार्च
एप्रिल
मे
जून
जुलै
ऑगस्ट
सप्टेंबर
ऑक्टोबर
नोव्हेंबर
डिसेंबर

४ नोव्हेंबर महत्वाच्या घटना

१८९६: पुण्यात डेक्कन सभेची स्थापना.

१९१८: पहिले महायुद्ध – ऑस्ट्रिया व हंगेरीने इटलीसमोर शरणागती पत्करली.

१९२१: जपानचे पंतप्रधान हारा ताकाशी यांची टोकियो येथे हत्या.

१९२२: तुतनखामेन राजाच्या प्रसिद्ध पिरॅमिडमधील कबरस्थानाचे मुख्य द्वार शोधण्यात यश.

१९४८: डॉ. बाबासाहेब आंबेडकर अध्यक्ष असणाऱ्या घटना समितीने घटनेचा मसुदा सादर केला.

१९९६: कलागौरव प्रतिष्ठानच्या वतीने देण्यात येणारा नाट्यगौरव पुरस्कार डॉ. श्रीराम लागू व सत्यदेव दुबे यांना जाहीर

२०००: हिन्दुस्तानी शास्त्रीय संगीतातील असामान्य कामगिरीबद्दल गायक पं. भीमसेन जोशी यांना आदित्य विक्रम बिर्ला कलाशिखर पुरस्कार जाहीर.

२००१: हॅरी पॉटर अण्ड फिलॉसॉफर्स स्टोन या चित्रपटाचा लंडन येथे प्रिमियर.

२००८: बराक ओबामा हे अमेरिकेचे पहिले कृष्णवर्णीय राष्ट्राध्यक्ष बनले.

४ नोव्हेंबर जन्म

१६१८: मुघल सम्राट औरंगजेब याचा जन्म. (मृत्यू: ३ मार्च १७०७)

१८४५: भारतीय स्वातंत्र्य चळवळीतील सशस्त्र क्रांतीचे एक आद्य प्रवर्तक वासुदेव बळवंत फडके यांचा शिरढोण जि. कुलाबा, रायगड येथे जन्म. (मृत्यू: १७ फेब्रुवारी १८८३)

१८७१: मानववंशशास्त्रज्ञ शरदचंद्र रॉय यांचा जन्म.

१८८४: प्रसिद्ध गांधीवादी कार्यकर्ते, स्वातंत्र्यसैनिक आणि बजाज उद्योगसमुहाचे प्रणेते जमनालाल बजाज यांचा जन्म. (मृत्यू: ११ फेब्रुवारी १९४२)

१८८४: ट्रॅक्टरचे निर्माते हॅरी फर्ग्युसन यांचा जन्म. (मृत्यू: २५ ऑक्टोबर १९६०)

१८९४: कोकणचे गांधी अप्पासाहेब पटवर्धन यांचा जन्म. (मृत्यू: १० मार्च १९७१)

१८९७: भारतीय वनस्पतिशास्त्रज्ञ जानकी अम्माल यांचा जन्म. (मृत्यू: ४ फेब्रुवारी १९८४)

१९१६: बार्बी बाहुलीच्या निर्मात्या रुथ हँडलर यांचा जन्म. (मृत्यू: २७ एप्रिल २००२)

१९२५: चित्रपट निर्माते आणि पटकथालेखक ऋत्विक घटक यांचा जन्म. (मृत्यू: ६ फेब्रुवारी १९७६)

१९२९: शंकर-जयकिशन या संगीतकार जोडीतील संगीतकार जयकिशन डाह्याभाई पांचाळ यांचा जन्म. (मृत्यू: ६ ऑक्टोबर १९७१)

१९२९: गणितज्ञ, ज्योतिर्विद आणि अतिवेगाने आकडेमोड करणारी भारतीय महिला शकुंतलादेवी यांचा जन्म. (मृत्यू: २१ एप्रिल २०१३)

१९३०: भारतीय औषधीशास्त्रज्ञ आणि शैक्षणिक रंजीत रॉय चौधरी यांचा जन्म. (मृत्यू: २७ ऑक्टोबर २०१५)

१९३४: दिग्दर्शिका विजया मेहता यांचा जन्म.

१९३९: चालते बोलते गणिती यंत्र म्हणून ओळखल्या जाणाऱ्या शकुंतलादेवी यांचा जन्म.

१९५०: व्हर्जिन ग्रुपचे सहसंस्थापक निग पॉवेल यांचा जन्म.

१९५५: भारतीय लेखक, कवी आणि विद्वान अल्हाज मौलाना घोसी शाह यांचा जन्म.

१९७१: अभिनेत्री तब्बू यांचा जन्म.

१९८६: भारतीय उद्योजक सुहास गोपीनाथ यांचा जन्म.

४ नोव्हेंबर मृत्यू

१९७०: लखनौ घराण्याचे कथ्थक नर्तक पं. शंभू महाराज यांचे निधन.

१९९१: प्राच्य विद्या संशोधक, आंतरराष्ट्रीय कीर्तीचे पाली भाषा कोविद, सिंहली, ब्राम्ही व थाई भाषा तज्ञ पुरुषोत्तम विश्वनाथ तथा पु. वि. बापट यांचे निधन. (जन्म: १२ जून १८९४)

१९९२: मोटर-व्हीलचेअरचे निर्माते जॉर्ज क्लाईन यांचे निधन. (जन्म: १५ ऑगस्ट १९०४)

१९९५: इस्त्रायलचे ५ वे पंतप्रधान, संरक्षणमंत्री आणि नोबेल पारितोषिक विजेते यित्झॅक राबिन यांचे निधन. (जन्म: १ मार्च १९२२)

१९९८: हिंदी कवी नागार्जुन यांचे निधन.

१९९९: वेस्ट इंडिजचा क्रिकेटपटू माल्कम मार्शल यांचे निधन. (जन्म: १८ एप्रिल १९५८)

२००५: इतिहासकार, वृत्तपत्रकार,कोशकार स. मा. गर्गे यांचे पुणे येथे निधन झाले.

२०११: नाटककार व साहित्यिक दिलीप परदेशी यांचे निधन.

नोव्हेंबर महिन्यातील इतर महत्त्वाच्या आणि विशेष घटना

NMK
भारताचे पहिले पंतप्रधान पं. जवाहरलाल नेहरू यांचा जन्म. (मृत्यू: २७ मे १९६४)
NMK
झारखंड हे २८ वे राज्य तयार झाले.
NMK
युनेस्को (UNESCO) ची स्थापना झाली.
NMK
डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या हस्ते शिवाजी विद्यापीठाचे उद्‍घाटन झाले.
NMK
उत्तराखंड उच्‍च न्यायालयाची स्थापना.
NMK
स्वातंत्र्य चळवळीतील नेते चित्तरंजन दास यांचा जन्म. (मृत्यू: १६ जून १९२५)
NMK
द्विभाषिक मुंबई राज्याची निर्मिती
NMK
डॉ. भाऊ दाजी लाड जन्मदिन.
NMK
उत्तराखंड राज्याची निर्मिती.
NMK
राष्ट्रीय एकत्मता दिन.
NMK
इंदिरा गांधी यांचा जन्म दिवस.
NMK
संयुक्त राष्ट्र विकास कार्यक्रम (UNDP) स्थापना झाली.
NMK
संविधान दिन.