12 October Dinvishesh

12 October Dinvishesh (१२ ऑक्टोबर दिनविशेष) For MPSC / UPSC and Any Competitive Exam. You can use following search box to find out more dinvishesh like 12 October 2024 Dinvishesh by just typing day along with the month number. (eg. If you want to search for 15th August then type 15-08).

आपल्या मित्रांना पाठवा :

१२ ऑक्टोबर महत्वाच्या घटना

संपूर्ण दिनविशेष दिनदर्शिकायेथे क्लिक करा आणि लगेच डाऊनलोड करा आपल्या मोबाईल / कॉम्पुटर मध्ये. (75% Discount)
१४९२: ख्रिस्तोफर कोलंबस वेस्ट इंडिजमधील बहामाज येथे पोचला. आपण भारतात पोहोचलो आहोत असा त्याचा समज झाला.
१८२३: स्कॉटलंडचे चार्ल्स मॅकिंटॉश यांनी पहिला रेनकोट विकला.
१८४७: वर्नर वॉन सीमेन्स यांनी सीमेन्स व हलस्के (सीमेन्स एजी) कंपनी ची सुरवात केली.
१८५०: अमेरिकेतील पहिले महिला वैद्यकीय महाविद्यालय सुरू.
१८७१: भारतात ब्रिटिश सरकारने क्रिमिनल ट्राइब्स अॅक्ट या कायद्याद्वारे १६१ जाती व जमातींना गुन्हेगारी जमाती ठरविले.
१९०१: अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष थिओडोर रूजवेल्ट यांनी कार्यकारी हवेली ला अधिकृतपणे व्हाईट हाऊस हे नाव ठेवले.
१९६०: संयुक्त राष्ट्रांसमोर भाषण करताना सोवियेत संघाचे राष्ट्राध्यक्ष निकिता क्रुश्चेव्ह यांनी आपला मुद्दा ठसवण्यासाठी टेबलावर जोडा आपटला.
१९६८: मेक्सिकोतील मेक्सिको सिटी येथे १९ व्या ऑलिम्पिक स्पर्धांना सुरुवात झाली.
१९८३: लॉकहीड कॉर्पोरेशनकडून वीस लाख अमेरिकन डॉलरची लाच घेतल्या बद्दल जपानचे पंतप्रधान तनाका काकुऐ यांना चार वर्षांचा कारावास.
१९८८: जाफना विद्यापीठात एल.टी.टी.ई.च्या नेत्याला पकडण्यासाठी गेलेल्या भारतीय शांती सेनेच्या पथकावर गनिमी काव्याने हल्ला. भारतीय पथकाचे अतोनात नुकसान.
१९९८: तेहतिसाव्या बुद्धीबळ ऑलिम्पियाडमध्ये कोल्हापूरच्या पल्लवी शाहने तिची लढत जिंकून इंटरनॅशनल वूमन मास्टर हा किताब मिळवला.
२०००: भारतीय वनस्पती जनुकशास्त्रज्ञ डॉ. सुरिंदर के. वसल आणि मेक्सिकोच्या वनस्पती जनुकशास्त्रज्ञ डॉ. इव्हॅन्जेलिना व्हिलेगास यांना प्रोटिनयुक्त मक्याची जात विकसित केल्याबद्दल सहस्त्रक जागतिक अन्न पुरस्कार जाहीर.
२००१: संयुक्त राष्ट्रसंघ आणि राष्ट्रसंघाचे सरचिटणीस कोफी अन्‍नान यांना शांततेसाठीचे नोबेल पारितोषिक जाहीर.
२००२: दहशतवाद्यांनी इंडोनेशियातील बालीमधे दोन बारमध्ये घडवून आणलेल्या बॉम्बस्फोटात २०२ जण ठार तर ३०० जण जखमी झाले.
१९९३: राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाची स्थापना.

१२ ऑक्टोबर जन्म

संपूर्ण दिनविशेष दिनदर्शिकायेथे क्लिक करा आणि लगेच डाऊनलोड करा आपल्या मोबाईल / कॉम्पुटर मध्ये. (75% Discount)
१८६०: गॅरोकोम्पास चे निर्माते एल्मर अॅम्ब्रोस स्पीरी यांचा जन्म. (मृत्यू: १६ जून १९३०)
१८६८: ऑडी मोटार कंपनी चे संस्थापक ऑगस्ट हॉच यांचा जन्म. (मृत्यू: ३ फेब्रुवारी १९५१)
१९११: क्रिकेटपटू, क्रिकेट समालोचक, उद्योगपती व समाजसेवक विजय मर्चंट यांचा जन्म. (मृत्यू: २७ ऑक्टोबर १९८७)
१९१८: उद्योगपती व क्रिकेट प्रशासक, बोर्ड ऑफ कंट्रोल फॉर क्रिकेट इन इंडिया (BCCI) चे अध्यक्ष मुथ्थय्या अन्नामलाई तथा एम. ए. चिदंबरम यांचा जन्म. (मृत्यू: १९ जानेवारी २०००)
१९२१: संयुक्त महाराष्ट्र चळवळीचे एक नेते जयंत श्रीधर तथा जयंतराव टिळक यांचा जन्म. (मृत्यू: २३ एप्रिल २००१)
१९२२: कवयित्री आणि गीतलेखिका शांता शेळके यांचा जन्म. (मृत्यू: ६ जून २००२)
१९३५: भारतीय वकील आणि राजकारणी शिवराज पाटील यांचा जन्म.
१९४६: क्रिकेटपटू अशोक मांकड यांचा जन्म. (मृत्यू: १ ऑगस्ट २००८)

१२ ऑक्टोबर मृत्यू

संपूर्ण दिनविशेष दिनदर्शिकायेथे क्लिक करा आणि लगेच डाऊनलोड करा आपल्या मोबाईल / कॉम्पुटर मध्ये. (75% Discount)
१९६७: समाजवादी नेते, विख्यात संसदपटू, लोकसभेतील प्रभावी वक्ते व व्यासंगी लेखक डॉ. राम मनोहर लोहिया यांचे निधन. (जन्म: २३ मार्च १९१०)
१९९६: फ्रेन्च लॉन टेनिस खेळाडू आणि पोलो टी शर्टचे जनक रेने लॅकॉस्ते यांचे निधन. (जन्म: २ जुलै १९०४)
२०११: सी प्रोग्रामिंग लँग्वेज चे निर्माते डेनिस रितची यांचे निधन. (जन्म: ९ सप्टेंबर १९४१)
२०१२: भारतीय न्यायाधीश व राजकारणी सुखदेव सिंग कांग यांचे निधन. (जन्म: १५ मे १९३१)

ऑक्टोबर महिन्यातील महत्त्वाच्या आणि विशेष घटना

NMK

दिनांक : २१ ऑक्टोबर १९४३

NMK

दिनांक : २४ ऑक्टोबर १९४५

NMK

दिनांक : २ ऑक्टोबर १८६९

NMK

दिनांक : २ ऑक्टोबर १९०४

NMK

दिनांक : ११ ऑक्टोबर १९०२

NMK

दिनांक : १५ ऑक्टोबर १९३१

NMK

दिनांक : ३१ ऑक्टोबर १८७५

NMK

दिनांक : ५ ऑक्टोबर १९४८

NMK

दिनांक : ८ ऑक्टोबर १९७२

NMK

दिनांक : १२ ऑक्टोबर १९९३

NMK

दिनांक : २६ ऑक्टोबर २००६

आपल्या मित्रांना पाठवा :
Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.