१९ सप्टेंबर दिनविशेष


19 September Dinvishesh For MPSC / UPSC and Any Competitive Exam. You can use following search box to find out more dinvishesh by just typing day along with the month number. (eg. If you want to search for 15th August then type 15-08).

जानेवारी
फेब्रुवारी
मार्च
एप्रिल
मे
जून
जुलै
ऑगस्ट
सप्टेंबर
ऑक्टोबर
नोव्हेंबर
डिसेंबर

१९ सप्टेंबर महत्वाच्या घटना

१८९३: न्यूझीलंड मध्ये महिलांना मतदानाचा हक्क मिळाला.

१९५७: अमेरिकेने पहिल्यांदा भूमिगत अणुबॉम्बचाचणी केली.

१९५९: सुरक्षिततेच्या कारणास्तव रशियाचे अध्यक्ष निकिता क्रुश्चेव्ह यांना अमेरिकेतील डिस्‍नेलँड ला भेट देण्यास मनाई करण्यात आली.

१९८३: सेंट किटस आणि नेव्हिसला स्वातंत्र्य मिळाले.

२०००: सिडनी ऑलिम्पिक वेटलिफ्टिंग ६९ किलो वजन गटात ब्राँझ पदक मिळवणारी पहिली भारतीय महिला कर्नाम मल्लेश्वरी ठरली.

२००१: गांधीवादी विचारवंत डॉ. सतीशकुमार यांना जमनालाल बजाज पुरस्कार जाहीर.

२००७: टी २० क्रिकेट सामन्यातील एका षटकात सहा षटकार मारणारा युवराजसिंग हा पहिला खेळाडू बनला.

१९ सप्टेंबर जन्म

१५५१: फ्रान्सचा राजा हेन्‍री (तिसरा) यांचा जन्म. (मृत्यू: २ ऑगस्ट १५८९)

१८६७: चित्रकार, संस्कृत पंडित श्रीपाद दामोदर सातवळेकर यांचा जन्म. (मृत्यू: ३१ जुलै १९६८)

१९११: नोबेल पारितोषिक विजेते इंग्लिश लेखक विल्यम गोल्डिंग यांचा जन्म. (मृत्यू: १९ जून १९९३)

१९१२: भारतीय पशुवैद्य आणि प्राणीसंग्रहालय संस्थापक रुबेन डेव्हीड यांचा जन्म. (मृत्यू: २४ मार्च १९८९)

१९१७: कॉन्टिनेन्टल प्रकाशन चे संस्थापक अनंतराव कुलकर्णी यांचा जन्म. (मृत्यू: ६ नोव्हेंबर १९९८)

१९२५: निर्माते व नाटककार बाबूराव गोखले यांचा जन्म. (मृत्यू: २८ जुलै १९८१)

१९५८: गायक, अभिनेता व गीतलेखक लकी अली यांचा जन्म.

१९६५: भारतीय-अमेरिकन अंतराळवीर सुनिता विल्यम यांचा क्लीव्हलँड ओहायो अमेरिका येथे जन्म.

१९७७: भारतीय क्रिकेटपटू आकाश चोप्रा यांचा जन्म.

१९ सप्टेंबर मृत्यू

१७१०: डॅनिश खगोलशास्त्रज्ञ ओले रोमर यांचे निधन.

१७२६: छत्रपती संभाजी व छत्रपती राजाराम यांचे स्वीय सहाय्यक खंडो बल्लाळ चिटणीस यांचे निधन.

१८८१: अमेरिकेचे २०वे राष्ट्राध्यक्ष जेम्स गारफील्ड यांचे निधन. (जन्म: १९ नोव्हेंबर १८३१)

१९२५: इंग्लिश वनस्पती वैज्ञानिक सर फ्रान्सिस डार्विन यांचे निधन.

१९३६: हिंदुस्थानी संगीताचे प्रसारक, संशोधक व गांधर्व महाविद्यालयाचे एक संस्थापक पं. विष्णू नारायण भातखंडे यांचे निधन. (जन्म: १० ऑगस्ट १८६०)

१९६३: जगप्रसिद्ध व्यंगचित्रकार सर डेव्हिड लो यांचे निधन. (जन्म: ७ एप्रिल १८९१ - ड्युनेडिन, न्यूझीलंड)

१९८७: नॉर्वे देशाचे पहिले पंतप्रधान एनर गेरहर्देसन यांचे निधन. (जन्म: १० मे १८९७)

१९९२: साहित्यिक, विदर्भ साहित्य संघाचे अध्यक्ष ना. रा. शेंडे यांचे निधन.

१९९३: म. गांधींचे आरोग्य सल्लागार व सहकारी दिनशा के. मेहता यांचे निधन.

२००२: रंगभूमी व चित्रपट व दूरचित्रवाणी अभिनेत्री प्रिया तेंडुलकर यांचे निधन. (जन्म: १९ ऑक्टोबर १९५४)

२००४: सुप्रसिद्ध कथ्थक नृत्यांगना दमयंती जोशी यांचे निधन. (जन्म: ५ सप्टेंबर १९२८)

२००७: मराठी चित्रपट भावगीत व संगीतकार दत्ता डावजेकर यांचे निधन. (जन्म: १५ नोव्हेंबर १९१७)

सप्टेंबर महिन्यातील इतर महत्त्वाच्या आणि विशेष घटना

NMK
भारतात अंतरिम सरकारची स्थापना झाली.
NMK
हिंदी हि भारताची राष्ट्रभाषा म्हणून घोषित करून हिंदी दिन साजरा केला.
NMK
प्रायोगिक तत्त्वावर भारतातील पहिली दूरदर्शन सेवा.
NMK
महात्मा फुले यांनी सत्यशोधक समाजाची स्थापना केली.
NMK
भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे एक संस्थापक, ब्रिटिश संसदेचे सदस्यत्त्व मिळवणारे पहिले भारतीय पितामह दादाभाई नौरोजी यांचा जन्म. (मृत्यू: ३० जून १९१७)
NMK
भारताचे दुसरे राष्ट्रपती, तत्त्वज्ञ डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांचा जन्म. (मृत्यू: १७ एप्रिल १९७५)
NMK
आद्द क्रांतिकारक स्वातंत्र्य सैनिक उमाजी नाईक यांचा जन्म. (मृत्यू: ३ फेब्रुवारी १८३२)
NMK
भारतरत्न पुरस्कृत सर मोक्षमुंडम विश्वेश्वरैया यांचा मदनहळ्ळी म्हैसूर येथे जन्म. (मृत्यू: १४ एप्रिल १९६२)
NMK
विख्यात शास्त्रीय गायिका एम. एस. सुब्बुलक्ष्मी यांचा जन्म. (मृत्यू: ११ डिसेंबर २००४)
NMK
NCERT स्थापना
NMK
जागतिक पर्यटन दिन