19 October Dinvishesh

19 October Dinvishesh (१९ ऑक्टोबर दिनविशेष) For MPSC / UPSC and Any Competitive Exam. You can use following search box to find out more dinvishesh like 19 October 2024 Dinvishesh by just typing day along with the month number. (eg. If you want to search for 15th August then type 15-08).

आपल्या मित्रांना पाठवा :

१९ ऑक्टोबर महत्वाच्या घटना

संपूर्ण दिनविशेष दिनदर्शिकायेथे क्लिक करा आणि लगेच डाऊनलोड करा आपल्या मोबाईल / कॉम्पुटर मध्ये. (75% Discount)
१२१६: इंग्लंडचा राजा जॉन मृत्यूमुखी पडल्यामुळे त्याचा ९ वर्षाचा मुलगा हेन्‍री हा राजेपदी आरुढ झाला.
१८१२: नेपोलियन बोनापार्टने मॉस्कोच्या सीमेवरुन माघार घेतली.
१९३३: जर्मनी लीग ऑफ नेशन्स (League of Nations) मधून बाहेर पडले.
१९३५: इथिओपियावर आक्रमण केल्यामुळे राष्ट्रसंघाने (League of Nations) इटलीवर आर्थिक निर्बंध घातले.
१९४४: दुसरे महायुद्ध – अमेरिकन फौजा फिलीपाइन्सला पोचल्या.
१९७०: भारतीय बनावटीचे पहिले मिग लढाऊ विमान हवाईदलाकडे सुपुर्द.
१९९३: पुण्याजवळील महारेडिओ दुर्बिण (GMRT) प्रकल्पाचे जनक आणि शास्त्रज्ञ प्रा. गोविंद स्वरुप यांना सर सी. व्ही. रामन पदक जाहीर.
१९९४: रुद्रवीणावादक उस्ताद असद अली खाँ यांना मध्य प्रदेश सरकारचा तानसेन पुरस्कार जाहीर.
२०००: पार्श्वगायिका आशा भोसले यांना राज्यशासनाचा गानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार प्रदान.
२००५: मानवतेविरुद्ध गुन्ह्यांसाठी सद्दाम हुसेन यांच्याविरुद्ध खटला सुरू झाला.

१९ ऑक्टोबर जन्म

संपूर्ण दिनविशेष दिनदर्शिकायेथे क्लिक करा आणि लगेच डाऊनलोड करा आपल्या मोबाईल / कॉम्पुटर मध्ये. (75% Discount)
१९०२: कथालेखक दिवाकर कृष्ण केळकर तथा दिवाकर कृष्ण यांचा जन्म. (मृत्यू: ३१ मे १९७३ – हैदराबाद, आंध्र प्रदेश)
१९१०: तार्‍यांचे आयुर्मान व त्यांचा शेवट यावरील संशोधनासाठी १९८३ मधे नोबेल पारितोषिक मिळालेले भारतीय- अमेरिकन खगोल वैज्ञानिक सुब्रमण्यन चंद्रशेखर यांचा जन्म. (मृत्यू: २१ ऑगस्ट १९९५)
१९२०: कृतीशील विचारवंत आणि तत्त्वज्ञ पांडुरंगशास्त्री आठवले यांचा जन्म. (मृत्यू: २५ ऑक्टोबर २००३)
१९२५: वनस्पतीशास्त्रज्ञ व देवराई अभ्यासक डॉ. वामन दत्तात्रय तथा वा. द. वर्तक यांचा जन्म. (मृत्यू: १७ एप्रिल २००१)
१९३६: गीतकार शांताराम नांदगावकर यांचा जन्म. (मृत्यू: ११ जुलै २००९)
१९५४: रंगभूमी, चित्रपट व दूरचित्रवाणीवरील अभिनेत्री, लेखिका, सामाजिक कार्यकर्त्या प्रिया तेंडुलकर यांचा जन्म. (मृत्यू: १९ सप्टेंबर २००२)
१९६१: अभिनेते अजय सिंग देओल ऊर्फ सनी देओल यांचा जन्म.

१९ ऑक्टोबर मृत्यू

संपूर्ण दिनविशेष दिनदर्शिकायेथे क्लिक करा आणि लगेच डाऊनलोड करा आपल्या मोबाईल / कॉम्पुटर मध्ये. (75% Discount)
१२१६: इंग्लंडचा राजा जॉन यांचे निधन. (जन्म: २४ डिसेंबर ११६६)
१९३४: ओडिया लेखक, संपादक व समाजसुधारक विश्वनाथ कार यांचे निधन. (जन्म: २४ डिसेंबर १८६४)
१९३७: नोबेल पारितोषिक विजेते ब्रिटिश भौतिकशास्त्रज्ञ अर्नेस्ट रुदरफोर्ड यांचे निधन. (जन्म: ३० ऑगस्ट १८७१)
१९८६: मोझांबिक देशाचे पहिले राष्ट्रपती समोरा महेल यांचे निधन. (जन्म: २९ सप्टेंबर १९३३)
१९५०: पुणे विद्यार्थी गृहाचे एक संस्थापक विष्णू गंगाधर तथा दादासाहेब केतकर यांचे निधन. (जन्म: ९ एप्रिल १८८७)
१९९५: बाल कलाकार व अभिनेत्री सलमा बेग ऊर्फ बेबी नाझ यांचे निधन.
२००३: बोत्सिया व हर्जेगोविना देशाचे पहिले अध्यक्ष अलिजा इझेटबेगोविच यांचे निधन. (जन्म: ८ ऑगस्ट १९२५)
२०११: भारतीय लेखक कक्कणदन यांचे निधन. (जन्म: २३ एप्रिल १९३५)

ऑक्टोबर महिन्यातील महत्त्वाच्या आणि विशेष घटना

NMK

दिनांक : २१ ऑक्टोबर १९४३

NMK

दिनांक : २४ ऑक्टोबर १९४५

NMK

दिनांक : २ ऑक्टोबर १८६९

NMK

दिनांक : २ ऑक्टोबर १९०४

NMK

दिनांक : ११ ऑक्टोबर १९०२

NMK

दिनांक : १५ ऑक्टोबर १९३१

NMK

दिनांक : ३१ ऑक्टोबर १८७५

NMK

दिनांक : ५ ऑक्टोबर १९४८

NMK

दिनांक : ८ ऑक्टोबर १९७२

NMK

दिनांक : १२ ऑक्टोबर १९९३

NMK

दिनांक : २६ ऑक्टोबर २००६

आपल्या मित्रांना पाठवा :
Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.