३१ ऑक्टोबर दिनविशेष


31 October Dinvishesh For MPSC / UPSC and Any Competitive Exam. You can use following search box to find out more dinvishesh by just typing day along with the month number. (eg. If you want to search for 15th August then type 15-08).

जानेवारी
फेब्रुवारी
मार्च
एप्रिल
मे
जून
जुलै
ऑगस्ट
सप्टेंबर
ऑक्टोबर
नोव्हेंबर
डिसेंबर

३१ ऑक्टोबर महत्वाच्या घटना

१८६४: नेवाडा हे अमेरिकेचे ३६वे राज्य बनले.

१८७६: भारतात आलेल्या महाभयानक चक्रीवादळात २,००,००० पेक्षा अधिक व्यक्ती ठार.

१८८०: धनत्रयोदशी (आश्विन वद्य त्रयोदशी) च्या दिवशी पुण्यातील आनंदोद्‍भव थिएटरमधे किर्लोस्करांच्या संगीत शाकुंतल या नाटकाचा पहिला प्रयोग झाला.

१९२०: नारायण मल्हार जोशी, लाला लजपतराय व इतर काही जणांनी ऑल इंडिया ट्रेड युनियन काँग्रेसची (AITUC) स्थापना केली. लाला लजपतराय पहिले अध्यक्ष बनले.

१९४१: माऊंट रशमोअर या स्मारकाचे बांधकाम पूर्ण झाले.

१९६६: दिल्ली उच्‍च न्यायालयाची स्थापना झाली.

१९८४: पंतप्रधान इंदिरा गांधी यांची त्यांच्याच अंगरक्षकांकडून हत्या.

१९८४: भारताचे ६वे पंतप्रधान म्हणून राजीव गांधी यांनी सूत्रे हाती घेतली.

२०११: जागतिक लोकसंख्या सात अब्जांपर्यंत पोचली.

३१ ऑक्टोबर जन्म

१३९१: पोर्तुगालचा राजा एडवर्ड यांचा जन्म. (मृत्यू: ९ सप्टेंबर १४३८)

१८७५: भारतरत्‍न (मरणोत्तर) स्वतंत्र भारताचे पहिले उपपंतप्रधान सरदार वल्लभभाई पटेल यांचा जन्म. (मृत्यू: १५ डिसेंबर १९५०)

१८९५: क्रिकेटपटू सी. के. नायडू यांचा जन्म. (मृत्यू: १४ नोव्हेंबर १९६७)

१८९७: चीन गणराज्य (तैवान) चे पहिले पंतप्रधान चियांग काई-शेक यांचा जन्म. (मृत्यू: ५ एप्रिल १९७५)

१९२२: कंबोडिया देशाचे पहिले पंतप्रधान नॉरदॉम सिहानोक यांचा जन्म. (मृत्यू: १५ ऑक्टोबर २०१२)

१९४६: क्रिकेटपटू रामनाथ पारकर यांचा जन्म. (मृत्यू: ११ ऑगस्ट १९९९)

३१ ऑक्टोबर मृत्यू

१९२९: भारतीय-इंग्लिश अभिनेते नॉर्मन प्रिचर्ड यांचे निधन. (जन्म: २३ जून १८७७)

१९७५: संगीतकार व गायक सचिन देव बर्मन याचं निधन. (जन्म: १ ऑक्टोबर १९०६)

१९८४: भारताच्या ३र्‍या पंतप्रधान इंदिरा गांधी यांची त्यांच्याच अंगरक्षकांनी गोळ्या झाडुन हत्या केली. (जन्म: १९ नोव्हेंबर १९१७)

१९८६: लेखिका, बालसाहित्यिका आनंदीबाई शिर्के याचं निधन. (जन्म: ३ जून १८९२)

२००५: पंजाबी लेखिका आणि कवयित्री अमृता प्रीतम याचं निधन. (जन्म: ३१ ऑगस्ट १९१९)

२००९: मराठी ज्येष्ठ अभिनेत्री सुमती गुप्ते याचं निधन.

ऑक्टोबर महिन्यातील इतर महत्त्वाच्या आणि विशेष घटना

NMK
सिंगापूर येथे आझाद हिन्द सेनेची स्थापना.
NMK
संयुक्त राष्ट्रांची (United Nations) स्थापना झाली.
NMK
मोहनदास करमचंद गांधी उर्फ महात्मा गांधी यांचा पोरबंदर गुजरात येथे जन्म.
NMK
भारतरत्न लालबहादूर शास्त्री यांचा मुगलसराई उत्तरप्रदेश येथे जन्म. (मृत्यू: ११ जानेवारी १९६६)
NMK
स्वातंत्र्यसैनिक लोकनायक जयप्रकाश नारायण यांचा जन्म. (मृत्यू: ८ ऑक्टोबर १९७९ – पाटणा, बिहार)
NMK
वैज्ञानिक आणि भारताचे ११ वे राष्ट्रपती अवुल पाकिर जैनुलब्दीन उर्फ ए. पी. जे. अब्दुल कलाम यांचा जन्म. (मृत्यू: २५ जुलै २०१५)
NMK
भारतरत्‍न (मरणोत्तर) स्वतंत्र भारताचे पहिले उपपंतप्रधान सरदार वल्लभभाई पटेल यांचा जन्म. (मृत्यू: १५ डिसेंबर १९५०)
NMK
IUCN स्थापना
NMK
वन्यजीव सप्ताह
NMK
राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाची स्थापना.
NMK
महिलांचे कौटुंबिक हिंसाचारापासून संरक्षण प्रतिबंधक नियम अंमलात.