13 NOVEMBER DINVISHESH: Check all the latest november dinvishesh like birth, death and important events from MahaNMK.com. November Important Events is the special category which may help you in your MPSC / UPSC / Competitive exams.
नोव्हेंबर दिनविशेष : "आता स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करणं झालं सोप्पं" MahaNMK आपल्यासाठी घेऊन आले आहेत Dinvishesh, सर्व महत्वाच्या दिनविशेष आपल्याला एकाच ठिकाणी उपलब्ध करून देण्यासाठी आम्ही हा नवीन उपक्रम राबवला आहे.

महत्वाच्या घटना (13 NOVEMBER)
13 नोव्हेंबर 1841: जेम्स ब्रॅडी यांना प्राण्यांच्या आकर्षणामुळे संमोहन विषयावर अभ्यास करण्याला प्रोत्साहन मिळाले.
13 नोव्हेंबर 1864: ग्रीस देशाने नवीन संविधान स्वीकारले जाते.
13 नोव्हेंबर 1913: रवीन्द्रनाथ टागोर यांना स्वीडिश अॅकॅडमीने गीतांजली या साहित्यासाठी नोबेल पारितोषिक जाहीर केले.
13 नोव्हेंबर 1921: वामनराव पटवर्धनांनी पुढाकार घेऊन पुण्यास अखिल भोर संस्थान प्रजा सभा स्थापन केली.
13 नोव्हेंबर 1931: शंकर रामचंद्र तथा मामाराव दाते यांनी मोनोटाईप मशीनवर देवनागरी लिपीची यांत्रिक जुळणी यशस्वी केली.
13 नोव्हेंबर 1947: सोव्हिएत युनियनने एके ४७ बंदुक तयार केली.
13 नोव्हेंबर 1970: बांगला देशात आलेल्या भयानक चक्रीवादळात एका रात्रीत सुमारे ५,००,००० लोक मृत्यूमुखी पडले. ही विसाव्या शतकातील सर्वात भीषण नैसर्गिक आपत्ती होती.
13 नोव्हेंबर 1994: स्वीडनमधे घेतलेल्या सार्वमतात जनतेने युरोपियन समुदायात सामील होण्याचा निर्णय घेतला.
13 नोव्हेंबर 2012: ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण प्रशांत महासागराच्या काही भागात पूर्ण सूर्यग्रहण झाले.
जन्म (13 NOVEMBER)
13 नोव्हेंबर 1780: शिख साम्राज्याचे संस्थापक महाराजा रणजितसिंग यांचा जन्म. (मृत्यू: २७ जून १८३९)
13 नोव्हेंबर 1850: इंग्लिश लेखक व कवी आर. एल. स्टीव्हनसन यांचा जन्म. (मृत्यू: ३ डिसेंबर १८९४)
13 नोव्हेंबर 1855: आद्य मराठी नाटककार गोविंद बल्लाळ देवल यांचा जन्म. (मृत्यू: १४ जून १९१६)
13 नोव्हेंबर 1873: कायदेपंडित, पं. मोतीलाल नेहरूंचे सहकारी, संसदपटू आणि पुणे विद्यापीठाचे पहिले कुलगुरू बॅ. मुकुंद रामराव जयकर यांचा जन्म. (मृत्यू: १० मार्च १९५९)
13 नोव्हेंबर 1898: पाकिस्तानचे पहिले राष्ट्रपती इस्कंदर मिर्झा यांचा जन्म. (मृत्यू: १३ नोव्हेंबर १९६९)
13 नोव्हेंबर 1917: महाराष्ट्राचे ५ वे व ९ वे मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांचा जन्म. (मृत्यू: १ मार्च १९८९)
13 नोव्हेंबर 1917: हिंदी कवी, लेखक, टीकाकार व संपादक गजानन माधव मुक्तिबोध यांचा जन्म. (मृत्यू: ११ सप्टेंबर १९६४)
13 नोव्हेंबर 1954: सन मायक्रोसिस्टिम्स चे सहसंस्थापक स्कॉट मॅकनीली यांचा जन्म.
13 नोव्हेंबर 1967: अभिनेत्री जूही चावला यांचा जन्म.
मृत्यू (13 NOVEMBER)
13 नोव्हेंबर 1740: प्राचीन मराठी कवी कृष्णदयार्णव यांचे निधन.
13 नोव्हेंबर 1956: शीख धर्माचा समग्र इतिहास लिहिणारे आधुनिक बंगाली इतिहासकार इंदुभूषण बॅनर्जी यांचे निधन. (जन्म: १ नोव्हेंबर १८९३ – मेखलीगंज, कुच बिहार, पश्चिम बंगाल)
13 नोव्हेंबर 2001: ज्येष्ठ लेखिका सरोजिनी मधुसूदन शारंगपाणी यांचे निधन. (जन्म: १५ ऑगस्ट १९१७)
13 नोव्हेंबर 2002: नेपाळी लेखक, राजकारणी व मानवाधिकार कार्यकर्ते ऋषिकेश साहा यांचे निधन.
नोव्हेंबर महिन्यातील दिनविशेष
नोव्हेंबर महिन्यातील महत्त्वाच्या आणि विशेष घटना
भारताचे पहिले पंतप्रधान पं. जवाहरलाल नेहरू यांचा जन्म. (मृत्यू: २७ मे १९६४)दिनांक : 14 नोव्हेंबर 1889
झारखंड हे २८ वे राज्य तयार झाले.दिनांक : 15 नोव्हेंबर 2000
युनेस्को (UNESCO) ची स्थापना झाली.दिनांक : 16 नोव्हेंबर 1945
डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या हस्ते शिवाजी विद्यापीठाचे उद्घाटन झाले.दिनांक : 18 नोव्हेंबर 1962
उत्तराखंड उच्च न्यायालयाची स्थापना.दिनांक : 9 नोव्हेंबर 2000
स्वातंत्र्य चळवळीतील नेते चित्तरंजन दास यांचा जन्म. (मृत्यू: १६ जून १९२५)दिनांक : 5 नोव्हेंबर 1870
द्विभाषिक मुंबई राज्याची निर्मितीदिनांक : 1 नोव्हेंबर 1956
डॉ. भाऊ दाजी लाड जन्मदिन.दिनांक : 7 नोव्हेंबर 1824
उत्तराखंड राज्याची निर्मिती.दिनांक : 9 नोव्हेंबर 2000
राष्ट्रीय एकत्मता दिन.दिनांक : 19 नोव्हेंबर 2013
इंदिरा गांधी यांचा जन्म दिवस.दिनांक : 19 नोव्हेंबर 1917
संयुक्त राष्ट्र विकास कार्यक्रम (UNDP) स्थापना झाली.दिनांक : 22 नोव्हेंबर 1965
संविधान दिन.दिनांक : 26 नोव्हेंबर 1949