30 NOVEMBER DINVISHESH: Check all the latest november dinvishesh like birth, death and important events from MahaNMK.com. November Important Events is the special category which may help you in your MPSC / UPSC / Competitive exams.
नोव्हेंबर दिनविशेष : "आता स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करणं झालं सोप्पं" MahaNMK आपल्यासाठी घेऊन आले आहेत Dinvishesh, सर्व महत्वाच्या दिनविशेष आपल्याला एकाच ठिकाणी उपलब्ध करून देण्यासाठी आम्ही हा नवीन उपक्रम राबवला आहे.

महत्वाच्या घटना (30 NOVEMBER)
30 नोव्हेंबर 1872: हॅमिल्टन क्रिसेंट, ग्लासगो येथे स्कॉटलंड व इंग्लंड यांच्यामधे जगातील पहिला आंतरराष्ट्रीय फुटबॉल सामना खेळण्यात आला.
30 नोव्हेंबर 1917: कलकत्ता येथे आचार्य जगदीश चंद्र बोस इन्स्टिट्युटची स्थापना.
30 नोव्हेंबर 1961: १९५९ मध्ये प्रकाशित आल्हाद चित्रच्या सांगत्ये ऐका या बोलपटाने पुणे येथील विजयानंद सिनेमागृहात ५५१ दिवस चालण्याचा विक्रम केला.
30 नोव्हेंबर 1966: बार्बाडोसला युनायटेड किंगडमपासुन स्वातंत्र्य मिळाले.
30 नोव्हेंबर 1995: ऑपरेशन डेझर्ट स्टॉर्म संपल्याची अधिकृत घोषणा.
30 नोव्हेंबर 1996: ख्यातनाम साहित्यिक पु. ल. देशपांडे यांना महाराष्ट्र सरकारचा पहिला महाराष्ट्र भूषण पुरस्कार प्रदान.
30 नोव्हेंबर 1998: एक्सॉन आणि मोबिल यांच्यामध्ये ७३.७ बिलियन अमेरिकन डॉलर्स चा करार झाल्यामुळे एक्सॉनमोबिल ही जगातील सर्वात मोठी कंपनी तयार झाली.
30 नोव्हेंबर 2000: पाच अंतराळवीर आणि महाकाय सौरपंखे घेऊन एन्डेव्हर या अंतराळयानाने फ्लोरिडातील केप कॅनव्हेरॉल येथून आंतरराष्ट्रीय अवकाश स्थानकाच्या दिशेने उड्डाण केले.
जन्म (30 NOVEMBER)
30 नोव्हेंबर 1602: जर्मन पदार्थवैज्ञानिक ऑटो व्हॉन गॅरिक यांचा जन्म. (मृत्यू: २१ मे १६८६)
30 नोव्हेंबर 1761: हिरा हा कार्बनच असतो हे प्रयोगावरुन सिद्ध करणारे ब्रिटिश रसायनशास्त्रज्ञ स्मिथसन टेनांट यांचा जन्म. (मृत्यू: २२ फेब्रुवारी १८१५)
30 नोव्हेंबर 1835: विख्यात अमेरिकन विनोदकार आणि कादंबरीकार मार्क ट्वेन यांचा जन्म. (मृत्यू: २१ एप्रिल १९१०)
30 नोव्हेंबर 1858: भारतीय वनस्पती शास्रज्ञ डॉ. जगदीशचंद्र बोस यांचा जन्म. (मृत्यू: २३ नोव्हेंबर १९३७)
30 नोव्हेंबर 1878: ब्रिटनचे माजी पंतप्रधान सर विन्स्टन चर्चिल यांचा जन्म. (मृत्यू: २४ जानेवारी १९६५)
30 नोव्हेंबर 1910: गोमंतकीय कवी बाकीबाब उर्फ बाळकृष्ण भगवंत बोरकर यांचा खावार्डे, गोवा येथे जन्म. (मृत्यू: ९ जुलै १९८४)
30 नोव्हेंबर 1935: मराठी लेखक आनंद यादव यांचा जन्म.
30 नोव्हेंबर 1936: युथ इंटरनॅशनल पार्टीचे संस्थापक ऍबी हॉफमन यांचा जन्म. (मृत्यू: १२ एप्रिल १९८९)
30 नोव्हेंबर 1945: पार्श्वगायिका वाणी जयराम यांचा जन्म.
30 नोव्हेंबर 1967: सामाजिक कार्यकर्ता राजीव दिक्षीत यांचा जन्म. (मृत्यू: ३० नोव्हेंबर २०१०)
मृत्यू (30 NOVEMBER)
30 नोव्हेंबर 1900: सुप्रसिद्ध लेखक कवी आणि नाटककार ऑस्कर वाईल्ड यांचे निधन. (जन्म: १६ ऑक्टोबर १८५४)
30 नोव्हेंबर 1970: जन्माने इटालियन असलेल्या फ्रेंच फॅशन डिझायनर निना रिकी यांचे निधन. (जन्म: १४ जानेवारी १८८३)
30 नोव्हेंबर 1989: कॅमेरून देशाचे पहिले अध्यक्ष अहमदिऊ आहिदो यांचे निधन. (जन्म: २४ ऑगस्ट १९२४)
30 नोव्हेंबर 1995: साहित्यिक वामनराव कृष्णाजी तथा वा. कृ. चोरघडे यांचे निधन. (जन्म: १६ जुलै १९१४)
30 नोव्हेंबर 2010: सामाजिक कार्यकर्ता राजीव दिक्षीत यांचे निधन. (जन्म: ३० नोव्हेंबर १९६७)
30 नोव्हेंबर 2012: भारताचे १२ वे पंतप्रधान इंद्रकुमार गुजराल यांचे निधन. (जन्म: ४ डिसेंबर १९१९)
30 नोव्हेंबर 2014: अरुणाचल प्रदेशचे ७वे मुख्यमंत्री जर्बोम गॅमलिन यांचे निधन. (जन्म: १६ एप्रिल १९६१)
नोव्हेंबर महिन्यातील दिनविशेष
नोव्हेंबर महिन्यातील महत्त्वाच्या आणि विशेष घटना
भारताचे पहिले पंतप्रधान पं. जवाहरलाल नेहरू यांचा जन्म. (मृत्यू: २७ मे १९६४)दिनांक : 14 नोव्हेंबर 1889
झारखंड हे २८ वे राज्य तयार झाले.दिनांक : 15 नोव्हेंबर 2000
युनेस्को (UNESCO) ची स्थापना झाली.दिनांक : 16 नोव्हेंबर 1945
डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या हस्ते शिवाजी विद्यापीठाचे उद्घाटन झाले.दिनांक : 18 नोव्हेंबर 1962
उत्तराखंड उच्च न्यायालयाची स्थापना.दिनांक : 9 नोव्हेंबर 2000
स्वातंत्र्य चळवळीतील नेते चित्तरंजन दास यांचा जन्म. (मृत्यू: १६ जून १९२५)दिनांक : 5 नोव्हेंबर 1870
द्विभाषिक मुंबई राज्याची निर्मितीदिनांक : 1 नोव्हेंबर 1956
डॉ. भाऊ दाजी लाड जन्मदिन.दिनांक : 7 नोव्हेंबर 1824
उत्तराखंड राज्याची निर्मिती.दिनांक : 9 नोव्हेंबर 2000
राष्ट्रीय एकत्मता दिन.दिनांक : 19 नोव्हेंबर 2013
इंदिरा गांधी यांचा जन्म दिवस.दिनांक : 19 नोव्हेंबर 1917
संयुक्त राष्ट्र विकास कार्यक्रम (UNDP) स्थापना झाली.दिनांक : 22 नोव्हेंबर 1965
संविधान दिन.दिनांक : 26 नोव्हेंबर 1949