7 November Dinvishesh


7 November Dinvishesh (७ नोव्हेंबर दिनविशेष) For MPSC / UPSC and Any Competitive Exam. You can use following search box to find out more dinvishesh like 7 November 2022 Dinvishesh by just typing day along with the month number. (eg. If you want to search for 15th August then type 15-08).

जानेवारी
फेब्रुवारी
मार्च
एप्रिल
मे
जून
जुलै
ऑगस्ट
सप्टेंबर
ऑक्टोबर
नोव्हेंबर
डिसेंबर

७ नोव्हेंबर महत्वाच्या घटना

१६६५: सर्वात जुने जर्नल लंडन गॅझेट पहिल्यांदा प्रकाशित झाले.

१८७५: सुजलाम् सुफलाम्, मलयज शीतलाम्, साश्यशामलाम्, मातरम् वंदे…! वंदे मातरम् असे भारतमातेचे वर्णन करणारे गीत बंकिमचंद्र यादावचंद्र चटर्जी यांनी लिहिले.

१८७९: वासुदेव बळवंत फडके यांना जन्मठेप (काळ्यापाण्याची) शिक्षा ठोठवण्यात आली.

१९१७: पहिले महायुद्ध – गाझाच्या तिसर्‍या लढाईत ब्रिटिश फौजांनी गाझा ताब्यात घेतले.

१९३६: प्रभात चा संत तुकाराम हा चित्रपट पुण्यातील प्रभात चित्र्पटगृहात रिलीज झाला.

१९४४: फ्रँकलिन डी. रूझवेल्ट चौथ्यांदा अमेरिकेचे अध्यक्ष म्हणून निवडून आले.

१९५१: एम. पातंजली शास्त्री यांनी भारताचे २ रे सरन्यायाधीश म्हणुन कार्यभार सांभाळला.

१९९०: मेरी रॉबिन्सन या आयर्लंडच्या पहिल्या महिला राष्ट्राध्यक्ष बनल्या.

२००१: बेल्जियमची राष्ट्रीय विमान वाहतुक कंपनी सबीना (SABENA) दिवाळखोरीत गेली.

७ नोव्हेंबर जन्म

१८५८: लाल-बाल-पाल या त्रयीतील स्वातंत्र्यसेनानी बिपिन चंद्र पाल यांचा जन्म. (मृत्यू: २० मे १९३२)

१८६७: नोबेल पारितोषिक विजेत्या पोलिश-फ्रेन्च भौतिकशास्त्रज्ञ मेरी क्यूरी यांचा वाॅर्सा पोलंड येथे जन्म. (मृत्यू: ४ जुलै १९३४)

१८६८: व्याकरणकार व निबंधकार मोरो केशव दामले यांचा जन्म. (मृत्यू: ३० एप्रिल १९१३)

१८७९: रशियन क्रांतिकारक लिऑन ट्रॉट्स्की यांचा जन्म. (मृत्यू: २१ ऑगस्ट १९४०)

१८८४: क्रांतिकारक, विद्वान, कृषीतज्ञ, इतिहासकार आणि गदर पार्टी चे शिल्पकार डॉ. पांडुरंग सदाशिव खानखोजे यांचा जन्म. (मृत्यू: २२ जानेवारी १९६७)

१८८८: नोबेल पारितोषिक विजेते भारतीय भौतिकशास्त्रज्ञ सर चंद्रशेखर वेंकट रमण यांचा जन्म. (मृत्यू: २१ नोव्हेंबर १९७०)

१९००: स्वातंत्र्यसैनिक, संसदपटू, शेतकरी चळवळीतील नेते आणि काँग्रेसचे पुढारी प्रा. गोगिनेनी रंगा नायकुलू ऊर्फ एन. जी. रंगा यांचा जन्म. (मृत्यू: ९ जून १९९५)

१९०३: शिक्षणशास्त्र, मानस व बालमानस या विषयांचे लेखक भास्कर धोंडो कर्वे यांचा जन्म.

१९१५: महाराष्ट्रातील विचारवंत व शिक्षणतज्ञ गोवर्धन धनराज पारिख यांचा जन्म.

१९५४: अभिनेता, निर्माता, दिग्दर्शक, पटकथालेखक कमल हासन यांचा जन्म.

१९६०: भारतीय चित्रपट निर्माते श्यामप्रसाद यांचा जन्म.

१९७१: भारतीय दिग्दर्शक आणि पटकथालेखक त्रिविक्रम श्रीनिवास यांचा जन्म.

१९७५: भारतीय अभिनेते, दिग्दर्शक आणि पटकथालेखक वेंकट प्रभू यांचा जन्म.

१९८०: भारतीय गायक-गीतकार कार्तिक यांचा जन्म.

१९८१: भारतीय अभिनेत्री अनुष्का शेट्टी यांचा जन्म.

१८२४: डॉ. भाऊ दाजी लाड जन्मदिन.

७ नोव्हेंबर मृत्यू

१५६२: मारवाडचे राव मालदेव राठोड यांचे निधन. (जन्म: ५ डिसेंबर १५११)

१८६२: दिल्लीचा शेवटचा बादशहा बहादूरशहा जफर यांचे निधन. (जन्म: २४ ऑक्टोबर १७७५)

१९०५: आधुनिक मराठी काव्याचे प्रवर्तक म्हणून ओळखले जाणारे एक श्रेष्ठ कवी कृष्णाजी केशव दामले तथा केशवसुत यांचे हुबळी येथे निधन. (जन्म: ७ ऑक्टोबर १८६६)

१९२३: भारतीय शिक्षक अश्विनीकुमार दत्ता यांचे निधन. (जन्म: २५ जानेवारी १८५६)

१९४७: भारतीय-श्रीलंकेचे पत्रकार आणि राजकारणी के. नतेसा अय्यर यांचे निधन.

१९६३: मराठी लघुकथाकार व प्रसाद मासिकाचे संपादक यशवंत गोपाळ तथा य. गो. जोशी यांचे निधन. (जन्म: १७ डिसेंबर १९०१)

१९८०: हॉलिवूड अभिनेता स्टीव्ह मॅकक्‍वीन यांचे निधन. (जन्म: २४ मार्च १९३०)

१९८१: अमेरिकन इतिहासकार व तत्त्वज्ञ विल डुरांट यांचे निधन. (जन्म: ५ नोव्हेंबर १८८५)

१९९८: शास्त्रीय गायक, संगीतकार व शास्त्रीय संगीताचे अभ्यासक पं. जितेंद्र अभिषेकी यांचे निधन. (जन्म: २१ सप्टेंबर १९२९)

२०००: ज्येष्ठ गांधीवादी नेते, माजी केंद्रीयमंत्री, महाराष्ट्राचे माजी राज्यपाल आणि हरितक्रांतीचे अध्वर्यू सी.सुब्रह्मण्यम यांचे निधन. (जन्म: ३० जानेवारी १९१०)

२००६: भारतीय क्रिकेटर आणि मॅनेजर पॉली उम्रीगर यांचे निधन. (जन्म: २८ मार्च १९२६)

२००९: लेखिका व स्वातंत्र्यसैनिक सुनीता देशपांडे यांचे निधन. (जन्म: ३ जुलै १९२६)

२०१५: भारतीय दिग्दर्शक आणि कवी बाप्पादित्य बंदोपाध्याय यांचे निधन. (जन्म: २८ ऑगस्ट १९७०)

नोव्हेंबर महिन्यातील इतर महत्त्वाच्या आणि विशेष घटना

NMK
भारताचे पहिले पंतप्रधान पं. जवाहरलाल नेहरू यांचा जन्म. (मृत्यू: २७ मे १९६४)
NMK
झारखंड हे २८ वे राज्य तयार झाले.
NMK
युनेस्को (UNESCO) ची स्थापना झाली.
NMK
डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या हस्ते शिवाजी विद्यापीठाचे उद्‍घाटन झाले.
NMK
उत्तराखंड उच्‍च न्यायालयाची स्थापना.
NMK
स्वातंत्र्य चळवळीतील नेते चित्तरंजन दास यांचा जन्म. (मृत्यू: १६ जून १९२५)
NMK
द्विभाषिक मुंबई राज्याची निर्मिती
NMK
डॉ. भाऊ दाजी लाड जन्मदिन.
NMK
उत्तराखंड राज्याची निर्मिती.
NMK
राष्ट्रीय एकत्मता दिन.
NMK
इंदिरा गांधी यांचा जन्म दिवस.
NMK
संयुक्त राष्ट्र विकास कार्यक्रम (UNDP) स्थापना झाली.
NMK
संविधान दिन.