10 October Dinvishesh

10 October Dinvishesh (१० ऑक्टोबर दिनविशेष) For MPSC / UPSC and Any Competitive Exam. You can use following search box to find out more dinvishesh like 10 October 2024 Dinvishesh by just typing day along with the month number. (eg. If you want to search for 15th August then type 15-08).

आपल्या मित्रांना पाठवा :

१० ऑक्टोबर महत्वाच्या घटना

संपूर्ण दिनविशेष दिनदर्शिकायेथे क्लिक करा आणि लगेच डाऊनलोड करा आपल्या मोबाईल / कॉम्पुटर मध्ये. (75% Discount)
१८४६: इंग्रजी खगोलशास्त्रज्ञ विल्यम लॅसेल यांनी नेपच्यून ग्रहाचा सर्वात मोठा चंद्र ट्रायटन चा शोध लावला.
१९११: चीनमध्ये किंग वंशाचा शेवट.
१९१३: पनामा कालव्याचे बांधकाम पूर्ण झाले.
१९४२: सोव्हिएत युनियनचे ऑस्ट्रेलिया बरोबर राजनैतिक संबंध प्रस्थापित झाले.
१९४४: दुसरे महायुद्ध – ८०० जिप्सी बालकांना छळ छावणीत ठार केले.
१९५४: श्यामची आई चित्रपटाला राष्ट्रपतींचे सुवर्णपदक मिळाले.
१९६०: विद्याधर गोखले यांच्या ’सुवर्णतुला’ या नाटकाचा पहिला प्रयोग झाला.
१९६४: जपानमधील टोकियो येथे १८ व्या ऑलिम्पिक स्पर्धांना सुरुवात झाली.
१९७०: फिजीला युनायटेड किंगडमपासून स्वातंत्र्य.
१९७५: पापुआ न्यू गिनी चा संयुक्त राष्ट्रांत (United Nations) प्रवेश केला.
१९९८: आदर्श सेन आनंद भारताचे २९ वे सरन्यायाधीश.

१० ऑक्टोबर जन्म

संपूर्ण दिनविशेष दिनदर्शिकायेथे क्लिक करा आणि लगेच डाऊनलोड करा आपल्या मोबाईल / कॉम्पुटर मध्ये. (75% Discount)
१७३१: हायड्रोजन आणि आॅरगोन वायूंचा शोध लावणारे ब्रिटिश रसायनशास्त्रज्ञहेन्री कॅव्हेंडिश यांचा जन्म. (मृत्यू: २४ फेब्रुवारी १८१०)
१८३०: स्पेनची राणी इसाबेला (दुसरी) यांचा जन्म.
१८४४: रा. काँग्रेसचे ३रे अध्यक्ष बद्रुद्दिन तैय्यबजी यांचा जन्म.
१८७१: निष्ठावान समर्थभक्त, समर्थ वाङ्‌मयाचे आणि संप्रदायाचे अभ्यासक व प्रकाशक शंकर श्रीकृष्ण देव यांचा जन्म. (मृत्यू: २३ एप्रिल १९५८)
१८७७: मॉरिस मोटर्सचे संस्थापक विल्यम मॉरिस यांचा जन्म. (मृत्यू: २२ ऑगस्ट १९६३)
१८९९: भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे संस्थापक व कामगार पुढारी, संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीतील अग्रणी नेते कॉम्रेड श्रीपाद अमृत डांगे यांचा जन्म. (मृत्यू: २२ मे १९९१)
१९०२: कन्नड लेखक, सामाजिक कार्यकर्ते, चित्रपट निर्माते के. शिवराम कारंथ यांचा जन्म. (मृत्यू: ९ डिसेंबर १९९७)
१९०६: इंग्रजी भाषेतून लेखन करणारे भारतीय लेखक रासीपुरम कृष्णस्वामी नारायणस्वामी तथा आर. के. नारायण यांचा जन्म. (मृत्यू: १३ मे २००१)
१९०९: क्रिकेटपटू, कुशल क्रीडा संघटक क्रीडा महर्षी प्रिं. नोशीरवान दोराबजी तथा एन. डी. नगरवाला यांचा जन्म. (मृत्यू: ११ सप्टेंबर १९९८ – पुणे, महाराष्ट्र)
१९१०: हिंदी-चिनी मैत्रीचे प्रतीक डॉ. द्वारकानाथ कोटणीस यांचा जन्म.
१९१२: भारतीय कवी आणि समीक्षक राम विलास शर्मा यांचा जन्म. (मृत्यू: ३० मे २०००)
१९१६: सामाजिक कार्यकर्त्या डॉ. लीला मूळगावकर यांचा जन्म.
१९५४: चित्रपट अभिनेत्री रेखा यांचा जन्म.

१० ऑक्टोबर मृत्यू

संपूर्ण दिनविशेष दिनदर्शिकायेथे क्लिक करा आणि लगेच डाऊनलोड करा आपल्या मोबाईल / कॉम्पुटर मध्ये. (75% Discount)
१८९८: अष्टपैलू लेखक मणिलाल नथुभाई त्रिवेदी यांचे निधन. (जन्म: २६ सप्टेंबर १८५८)
१९११: जॅक डॅनियल चे संस्थापक जॅक डॅनियल यांचे निधन.
१९६४: प्रसिद्ध चित्रपट दिग्दर्शक, निर्माते आणि अभिनेते गुरू दत्त यांचे निधन. (जन्म: ९ जुलै १९२५)
१९८३: मूकपटांच्या जमान्यातील अभिनेत्री रुबी मायर्स ऊर्फ सुलोचना यांचे निधन.
२०००: श्रीलंकेच्या ६व्या व जगातील पहिल्या महिला पंतप्रधान सिरिमाओ बंदरनायके यांचे निधन. त्यांनीच सिलोन हे नाव बदलून श्रीलंका केले. (जन्म: १७ एप्रिल १९१६)
२००५: युगांडा देशाचे राष्ट्राध्यक्ष मिल्टन ओबोटे यांचे निधन.
२००६: शास्त्रीय गायिका सरस्वतीबाई राणे यांचे निधन. (जन्म: ४ ऑक्टोबर १९१३)
२००८: कथ्थक नर्तिकारोहिणी भाटे यांचे निधन. (जन्म: १४ नोव्हेंबर १९२४)
२०११: गझल गायक जगजित सिंग यांचे निधन. (जन्म: ८ फेब्रुवारी १९४१)

ऑक्टोबर महिन्यातील महत्त्वाच्या आणि विशेष घटना

NMK

दिनांक : २१ ऑक्टोबर १९४३

NMK

दिनांक : २४ ऑक्टोबर १९४५

NMK

दिनांक : २ ऑक्टोबर १८६९

NMK

दिनांक : २ ऑक्टोबर १९०४

NMK

दिनांक : ११ ऑक्टोबर १९०२

NMK

दिनांक : १५ ऑक्टोबर १९३१

NMK

दिनांक : ३१ ऑक्टोबर १८७५

NMK

दिनांक : ५ ऑक्टोबर १९४८

NMK

दिनांक : ८ ऑक्टोबर १९७२

NMK

दिनांक : १२ ऑक्टोबर १९९३

NMK

दिनांक : २६ ऑक्टोबर २००६

आपल्या मित्रांना पाठवा :
Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.