9 September Dinvishesh


9 September Dinvishesh (९ सप्टेंबर दिनविशेष) For MPSC / UPSC and Any Competitive Exam. You can use following search box to find out more dinvishesh like 9 September 2022 Dinvishesh by just typing day along with the month number. (eg. If you want to search for 15th August then type 15-08).

जानेवारी
फेब्रुवारी
मार्च
एप्रिल
मे
जून
जुलै
ऑगस्ट
सप्टेंबर
ऑक्टोबर
नोव्हेंबर
डिसेंबर

९ सप्टेंबर महत्वाच्या घटना

१५४३: नऊ महिने वयाची मेरी स्टुअर्ट ही स्कॉटलंडची राणी बनली.

१७९१: वॉशिंग्टन डी.सी हे शहर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जॉर्ज वॉशिंग्टन यांच्या नावावर ठेवण्यात आले.

१८३९: जॉन हर्षेल याने जगातील पहिले छायाचित्र घेतले.

१८५०: कॅलिफोर्निया हे अमेरिकेचे ३१वे राज्य बनले.

१९३९: प्रभात कंपनीचा माणूस हा चित्रपट प्रदर्शित झाला.

१९४५: दुसरे चीन जपान युद्ध, जपानने चीनसमोर शरणागती पत्करली.

१९८५: मूकबधिर जलतरणपटू तारानाथ शेणॉय याने तिसऱ्यांदा इंग्लिश खाडी पोहून पार करून विक्रम केला.

१९९०: श्रीलंकन सैन्याने बट्टिकलोआ येथे १८४ तामिळींची हत्या केली.

१९९१: ताजिकिस्ता देश सोविएत युनियनपासून स्वतंत्र झाला.

१९९७: ७ वेळा राष्ट्रीय विजेतेपद मिळवलेल्या प्रवीण ठिपसेना बुद्धिबळातील ग्रँडमास्टर किताब मिळाला.

२००१: व्हेनिसच्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात मीरा नायरच्या मॉन्सून वेडिंग चित्रपटाला गोल्डन लायन पुरस्कार मिळाला.

२००९: ठीक ९ वाजुन ९ मिनिटे व ९ सेकंदांनी दुबई मेट्रोचे उद्‍घाटन झाले.

२०१२: भारतातील स्पेस एजन्सीने यशस्वीरित्या २१ पीएसएलव्ही प्रक्षेपण केले.

२०१५: एलिझाबेथ (दुसरी) युनायटेड किंग्डम वर सगळ्यात जास्त काळ राज्य करणारी राणी बनली.

२०१६: उत्तर कोरियाने पाचवी अण्वस्त्र चाचणी पूर्ण केली आहे.

९ सप्टेंबर जन्म

१८२८: रशियन लेखक लिओ टॉलस्टॉय यांचा जन्म. (मृत्यू: २० नोव्हेंबर १९१०)

१८५०: आधुनिक हिन्दी साहित्याचे जनक भारतेंदू हरिश्चंद्र यांचा जन्म. (मृत्यू: ६ जानेवारी १८८५)

१८९०: केंटुकी फ्राईड चिकन चे संस्थापक कर्नल सँडर्स यांचा जन्म. (मृत्यू: १६ डिसेंबर १९८०)

१९१०: गांधीवादी, स्वातंत्र्यसैनिक आणि उद्योगपती नवलमल फिरोदिया यांचा जन्म. (मृत्यू: २६ मार्च १९९७)

१९०४: भारतीय-पाकिस्तानी हॉकी खेळाडू फिनोझ खान यांचा जन्म. (मृत्यू: २१ एप्रिल २००५)

१९०५: भारतीय तत्त्वज्ञानी आणि कवी ब्रह्मारीश हुसैन शा यांचा जन्म. (मृत्यू: २४ सप्टेंबर १९८१)

१९०९: अभिनेत्री लीला चिटणीस यांचा जन्म. (मृत्यू: १४ जुलै २००३)

१९४१: अष्टपैलू क्रिकेटपटू अबीद अली यांचा जन्म.

१९४१: सी प्रोग्रामिंग लँग्वेज चे निर्माते डेनिस रिची यांचा जन्म. (मृत्यू: १२ ऑक्टोबर २०११)

१९५०: संगीतकार श्रीधर फडके यांचा जन्म.

१९७४: कारगिल युद्धात शहीद झालेले परमवीरचक्र प्राप्त विक्रम बात्रा यांचा जन्म.

९ सप्टेंबर मृत्यू

१४३८: पोर्तुगालचा राजा एडवर्ड यांचे निधन. (जन्म: ३१ ऑक्टोबर १३९१)

१९४२: स्वातंत्र्यसैनिक शिरीष कुमार यांचा गोळी लागून मृत्यू. (जन्म: २८ डिसेंबर १९२६)

१९६०: उर्दू कवी व शायर अली सिकंदर ऊर्फ जिगर मोरादाबादी यांचे निधन. (जन्म: ६ एप्रिल १८९०)

१९७६: आधुनिक चीनचे शिल्पकार माओ त्से तुंग यांचे निधन. (जन्म: २६ डिसेंबर १८९३)

१९७८: वॉर्नर ब्रदर्स चे सहस्थापक जॅक एल. वॉर्नर यांचे निधन. (जन्म: २ ऑगस्ट १८९२)

१९९४: लावणी सम्राज्ञी सत्यभामाबाई पंढरपूरकर यांचे निधन.

१९९७: युनिट ट्रस्ट ऑफ इंडियाचे पहिले अध्यक्ष आर. एस. भट यांचे निधन.

१९९९: नाटककार व लेखक पुरुषोत्तम दारव्हेकर यांचे निधन.

२००१: अफगणिस्तानचे उपराष्ट्राध्यक्ष व परराष्ट्रमंत्री अहमदशाह मसूद यांची हत्या. (जन्म: २ सप्टेंबर १९५३)

२०१०: समाजवादी कामगारनेते, लेखक वसंत नीलकंठ गुप्ते यांचे निधन. (जन्म: ९ मे १९२८)

२०१२: भारतीय दुग्धोत्पादनातील धवल क्रांतीचे जनक, अमूल कंपनीचे संस्थापक व्हर्गिस कुरियन यांचे निधन. (जन्म: २६ नोव्हेंबर १९२१ – कोहिकोड, केरळ)

सप्टेंबर महिन्यातील इतर महत्त्वाच्या आणि विशेष घटना

NMK
भारतात अंतरिम सरकारची स्थापना झाली.
NMK
हिंदी हि भारताची राष्ट्रभाषा म्हणून घोषित करून हिंदी दिन साजरा केला.
NMK
प्रायोगिक तत्त्वावर भारतातील पहिली दूरदर्शन सेवा.
NMK
महात्मा फुले यांनी सत्यशोधक समाजाची स्थापना केली.
NMK
भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे एक संस्थापक, ब्रिटिश संसदेचे सदस्यत्त्व मिळवणारे पहिले भारतीय पितामह दादाभाई नौरोजी यांचा जन्म. (मृत्यू: ३० जून १९१७)
NMK
भारताचे दुसरे राष्ट्रपती, तत्त्वज्ञ डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांचा जन्म. (मृत्यू: १७ एप्रिल १९७५)
NMK
आद्द क्रांतिकारक स्वातंत्र्य सैनिक उमाजी नाईक यांचा जन्म. (मृत्यू: ३ फेब्रुवारी १८३२)
NMK
भारतरत्न पुरस्कृत सर मोक्षमुंडम विश्वेश्वरैया यांचा मदनहळ्ळी म्हैसूर येथे जन्म. (मृत्यू: १४ एप्रिल १९६२)
NMK
विख्यात शास्त्रीय गायिका एम. एस. सुब्बुलक्ष्मी यांचा जन्म. (मृत्यू: ११ डिसेंबर २००४)
NMK
NCERT स्थापना
NMK
जागतिक पर्यटन दिन