6 August Dinvishesh

6 August Dinvishesh (६ ऑगस्ट दिनविशेष) For MPSC / UPSC and Any Competitive Exam. You can use following search box to find out more dinvishesh like 6 August 2024 Dinvishesh by just typing day along with the month number. (eg. If you want to search for 15th August then type 15-08).

आपल्या मित्रांना पाठवा :

६ ऑगस्ट महत्वाच्या घटना

संपूर्ण दिनविशेष दिनदर्शिकायेथे क्लिक करा आणि लगेच डाऊनलोड करा आपल्या मोबाईल / कॉम्पुटर मध्ये. (75% Discount)
१९१४: पहिले महायुद्ध - सर्बियाने जर्मनीविरुद्ध तर ऑस्ट्रियाने रशियाविरुद्ध युद्ध पुकारले.
१९२६: जेरट्रूड एडर्ले ही इंग्लिश खाडी पोहुन जाणारी पहिली महिला बनली.
१९४०: सोविएत युनियनने इस्टोनियाचा बेकायदेशीरपणे ताबा घेतला.
१९४५: जपान मधील हिरोशिमा या शहरावर अमेरिकेने अणुबाँब टाकला. इतिहासात पहिल्यांदा अणुबाँबचा वापर करण्यात आला.
१९६०: अमेरिकेने घातलेल्या व्यापारबंदीला प्रत्युत्तर म्हणून क्युबाने अमेरिकन बँकांसह सर्व परदेशी बँकाचे राष्ट्रीयीकरण केले.
१९६२: जमैकाला इंग्लंडपासुन स्वातंत्र्य मिळाले.
१९९०: कुवैत बळकावल्याबद्दल संयुक्त राष्ट्रांनी इराकवर व्यापारी बंधने लादली.
१९९४: डॉ. शिवराम कारंथ यांना राष्ट्रपती डॉ. शंकरदयाळ शर्मा यांच्या हस्ते इंदिरा गांधी पर्यावरण पुरस्कार प्रदान.
१९९७: कोलंबो येथे भारताविरुद्धच्या कसोटी सामन्यात श्रीलंकेने ६ बाद ९५२ अशी विक्रमी धावसंख्या उभारली. त्यात सनत जयसूर्या याने ३४० धावा केल्या.
२०१०: भारतातील जम्मू आणि काश्मीर भागात भयानक पूर आला.
१९५२: राष्ट्रीय विकास परिषदेची स्थापना.

६ ऑगस्ट जन्म

संपूर्ण दिनविशेष दिनदर्शिकायेथे क्लिक करा आणि लगेच डाऊनलोड करा आपल्या मोबाईल / कॉम्पुटर मध्ये. (75% Discount)
१८०९: इंग्लिश कवी लॉर्ड टेनिसन यांचा जन्म. (मृत्यू: ६ ऑक्टोबर १८९२)
१८८१: पेनिसिलीन औषधाचे निर्माते नोबेल पारितोषिक विजेते स्कॉटिश शास्त्रज्ञ अलेक्झांडर फ्लेमिंग यांचा पाश्चिम स्कॉटलंड येथील लॉकफील्डफार्म येथे जन्म. (मृत्यू: ११ मार्च १९५५)
१९००: टेक्सास इन्स्ट्रूमेंट्स कंपनी चे सहसंस्थापक सीसिल हॉवर्ड ग्रीन यांचा जन्म. (मृत्यू: ११ एप्रिल २००३)
१९२५: लेखिका योगिनी जोगळेकर यांचा जन्म. (मृत्यू: १ नोव्हेंबर २००५)
१९५९: भारतीय पर्यावरणवादी राजेंद्र सिंग यांचा जन्म.
१९६५: भारतीय चित्रपट दिग्दर्शक विशाल भारद्वाज यांचा जन्म.
१९७०: भारतीय वंशाचे अमेरिकन चित्रपट निर्माते, दिग्दर्शक व पटकथालेखक एम. नाईट श्यामलन यांचा जन्म.

६ ऑगस्ट मृत्यू

संपूर्ण दिनविशेष दिनदर्शिकायेथे क्लिक करा आणि लगेच डाऊनलोड करा आपल्या मोबाईल / कॉम्पुटर मध्ये. (75% Discount)
१९२५: भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे एक संस्थापक , राष्ट्रगुरू सुरेंद्रनाथ बॅनर्जी यांचे निधन. (जन्म: १० नोव्हेंबर १८४८)
१९६५: संगीतकार वसंत पवार यांचे निधन.
१९९१: ईराणचे ७४ वे पंतप्रधान शापूर बख्तियार यांचे निधन. (जन्म: २६ जून १९१४)
१९९७: ज्ञानपीठ पुरस्कार विजेते आसामी साहित्यिक वीरेन्द्रकुमार भट्टाचार्य यांचे निधन. (जन्म: १४ ऑक्टोबर १९२४)
१९९९: केन्द्रीय मंत्री, राज्यसभा खासदार (३ वेळा), लोकसभा खासदार (४ वेळा), काँग्रेसचे नेते कल्पनाथ राय यांचे निधन. (जन्म: ४ जानेवारी १९४१ – सेमरी जमालपूर, माऊ, उत्तर प्रदेश)
२००१: भारतीय नौदल प्रमुख आधार कुमार चॅटर्जी यांचे निधन.
२०१९: २५ व्या वर्षीच हरयाणाच्या कॅबिनेट मंत्री, १९९८ मध्ये दिल्लीच्या मुख्यमंत्री, २०००-२००३ माहिती आणि प्रसारण मंत्री, २००३-२००४ आरोग्य आणि कुटुंबकल्याण मंत्री, २०१४ मध्ये भाजप सरकारमध्ये परराष्ट्र मंत्री म्हणून काम पाहिलं अश्या भाजपच्या नेत्या सुषमा स्व

ऑगस्ट महिन्यातील महत्त्वाच्या आणि विशेष घटना

NMK

दिनांक : १५ ऑगस्ट १९४७

NMK

दिनांक : २९ ऑगस्ट १९०५

NMK

दिनांक : १ ऑगस्ट १९२०

NMK

दिनांक : ६ ऑगस्ट १९५२

NMK

दिनांक : ८ ऑगस्ट १९६७

NMK

दिनांक : ९ ऑगस्ट १९४२

NMK

दिनांक : १५ ऑगस्ट १९६९

NMK

दिनांक : १६ ऑगस्ट १९३२

NMK

दिनांक : २७ ऑगस्ट १९७२

NMK

दिनांक : २९ ऑगस्ट २०१३

आपल्या मित्रांना पाठवा :
Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.