३ जुलै दिनविशेष


3 July Dinvishesh For MPSC / UPSC and Any Competitive Exam. You can use following search box to find out more dinvishesh by just typing day along with the month number. (eg. If you want to search for 15th August then type 15-08).

जानेवारी
फेब्रुवारी
मार्च
एप्रिल
मे
जून
जुलै
ऑगस्ट
सप्टेंबर
ऑक्टोबर
नोव्हेंबर
डिसेंबर

३ जुलै महत्वाच्या घटना

१६०८: सॅम्यूअल बी. चॅम्पलेन यांनी कॅनडातील क्‍वेबेक शहराची स्थापना केली.

१८५०: ईस्ट इंडिया कंपनीच्या अध्यक्षांनी भारतातून आणलेला कोहिनूर हिरा इंग्लंडच्या राणीच्या स्वाधीन केला.

१८५२: महात्मा फुले यांनी दलित मुलांसाठी पहिली शाळा काढली.

१८५५: भारतात कायदे शिक्षणाचा प्रारंभ झाला.

१८८४: डाऊ जोन्स (DJIA) हा निर्देशांक सुरू झाला.

१८८६: जर्मनीच्या कार्ल बेन्झ यांनी जगातील पहिली मोटारगाडी बनवली.

१८९०: ओहायो हे अमेरिकेचे ४३ वे राज्य बनले.

१९२८: लंडनमध्ये प्रथमतः रंगीत दूरचित्रवाणी कार्यक्रमांचे प्रक्षेपण झाले.

१९३८: मॅलार्ड हे वाफेचे इंजिन ताशी २०२ किमी वेगाने धावले. वाफेच्या इंजिनाचा विक्रम अजूनही अबाधित आहे.

१९९८: कवी प्रदीप यांना दादासाहेब फाळके पुरस्कार जाहीर.

२०००: विक्रांत या विमानवाहू युद्धनौकेचे मुंबईच्या समुद्रात सागरी संग्रहालयात रूपांतर करण्यास मान्यता.

२००१: सुधीर फडके यांना राज्य सरकारचा गानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार जाहीर.

२००६: एक्स. पी. १४ हा लघुग्रह पृथ्वीच्या अगदी जवळून गेला.

३ जुलै जन्म

१६८३: इंग्लिश कवी एडवर्ड यंग यांचे जन्म.

१८३८: पत्रकार, प्रार्थना समाजाचे एक संस्थापक मामा परमानंद यांचा जन्म. (मृत्यू: १३ सप्टेंबर १८९३)

१८८६: आधुनिक विद्याविभूषित तत्त्वज्ञ व संत, फर्ग्युसन व विलींग्डन महाविद्यालयातील तत्त्वज्ञानाचे प्राध्यापक रामचंद्र दत्तात्रय तथा गुरूदेव रानडे यांचा जन्म. (मृत्यू: ६ जून १९५७)

१९०९: कायदेपंडित, स्वातंत्र्यसैनिक, मुंबई उच्‍च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश व सर्वोच्‍च न्यायालयात सामाजिक समस्यांसाठी लढा देणारे झुंजार कायदेतज्ञ बॅरिस्टर व्ही. एम. तथा भाऊसाहेब तारकुंडे यांचा जन्म. (मृत्यू: २२ मार्च २००४)

१९१२: मराठी रंगभूमीवरील लोकप्रिय गायक व नट श्रीपाद गोविंद नेवरेकर यांचा जन्म. (मृत्यू: १६ जून १९७७)

१९१४: इतिहासकार, नाटककार, कलादिग्दर्शक, वेशभूषाकार आणि नेपथ्यकार दत्तात्रय गणेश गोडसे यांचा जन्म. (मृत्यू: ५ जानेवारी १९९२)

१९१८: भारतीय अभिनेते, दिग्दर्शक आणि निर्माते व्ही. रंगारा राव यांचा जन्म. (मृत्यू: १८ जुलै १९७४)

१९२४: तामीळवंशीय राजकारणी, सिंगापूरच्या प्रजासत्ताकाचे ६वे राष्ट्राध्यक्ष सेल्लप्पन रामनाथन यांचा जन्म.

१९२४: भारतीय क्रिकेटपटू अर्जुन नायडू यांचा जन्म.

१९२६: लेखिका स्वातंत्र्य सैनिक सुनीता देशपांडे यांचा जन्म. (मृत्यू: ७ नोव्हेंबर २००९)

१९५१: न्यूझीलंडचा क्रिकेट खेळाडू सररिचर्ड हॅडली यांचा जन्म.

१९५२: भारतीय गायक अमित कुमार यांचा जन्म.

१९५२: भारतीय कॅनेडियन लेखक रोहिनटन मिस्त्री यांचा जन्म.

१९७१: विकीलीक्स चे संस्थापक ज्युलियन असांज यांचा जन्म.

१९७६: झिम्बाब्वेचे क्रिकेटपटू हेन्‍री ओलोंगा यांचा जन्म.

१९८०: भारतीय क्रिकेटपटू हरभजन सिंग यांचा जन्म.

१९८७: युवसेना जिल्हाअधिकारी जळगाव माननीय प्रितेश ठाकूर यांचा जन्म.

३ जुलै मृत्यू

१३५०: संत नामदेव यांनी समाधी घेतली. (जन्म: २९ ऑक्टोबर १२७०)

१९३३: अर्जेंटिनाचे राष्ट्राध्यक्ष हिपोलितो य्रिगोयेन यांचे निधन. (जम: १२ जुलै १८५२)

१९३५: सिट्रोएन कंपनीचे संस्थापक आंद्रे सीट्रोएन यांचे निधन. (जन्म: ५ फेब्रुवारी १८७८)

१९६९: द रोलिंग स्टोन्सचे संस्थापक, गिटार, हार्मोनिका आणि पियानो वादक ब्रायन जोन्स यांचे निधन. (जन्म: २८ फेब्रुवारी १९४२)

१९९६: हिंदी चित्रपट अभिनेता कुलभूषण पंडित तथा राजकुमार यांचे निधन. (जन्म: ८ ऑक्टोबर १९२६)

जुलै महिन्यातील इतर महत्त्वाच्या आणि विशेष घटना

NMK
मुंबई विद्यापीठाची स्थापना.
दिनांक : १८ जुलै १८५७
NMK
भारताचा कारगिल युद्धात विजय झाला.
दिनांक : २६ जुलै १९९९
NMK
लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांचा रत्नागिरी जिल्ह्यातील चिखलगाव येथे जन्म. (मृत्यू: १ ऑगस्ट १९२० – मुंबई)
दिनांक : २३ जुलै १८५६
NMK
आधुनिक मुंबईचे शिल्पकार जगन्नाथ उर्फ नाना शंकर शेटे यांचे निधन. (जन्म: १० फेब्रुवारी १८०३)
दिनांक : ३१ जुलै १८६५
NMK
वसंतराव नाईक जयंती
दिनांक : १ जुलै १९१३
NMK
FRBM कायदा २००३ अमलात.
दिनांक : ५ जुलै २००४
NMK
राज्य मतदार दिन (महाराष्ट्र सरकार) सुरुवात.
दिनांक : ५ जुलै २०१७
NMK
बॉम्बे स्पिनिंग अँड वेअविंग मिल स्थापना.
दिनांक : ७ जुलै १८५४
NMK
फोर्ट विल्यम कॉलेज ची स्थापना.
दिनांक : १० जुलै १८००
NMK
जागतिक लोकसंख्या दिन सुरुवात.
दिनांक : ११ जुलै १९८९
NMK
जागतिक युवा कौशल्य दिन
दिनांक : १५ जुलै २०१४
NMK
अण्णाभाऊ साठे स्मृतिदिन
दिनांक : १८ जुलै १९६९
NMK
बहिष्कृत हितकारिणी सभेची स्थापना.
दिनांक : २० जुलै १९२४
NMK
राष्ट्रीय ध्वजाचा स्वीकार.
दिनांक : २२ जुलै १९४७
NMK
१४ बँकांचे राष्ट्रीयकरण
दिनांक : १९ जुलै १९६९
NMK
कोल्हापूर संस्थानात आरक्षणाची तरतूद.
दिनांक : २६ जुलै १९०२