1 June Dinvishesh

1 June Dinvishesh (१ जून दिनविशेष) For MPSC / UPSC and Any Competitive Exam. You can use following search box to find out more dinvishesh like 1 June 2025 Dinvishesh by just typing day along with the month number. (eg. If you want to search for 15th August then type 15-08).

आपल्या मित्रांना पाठवा :

१ जून महत्वाच्या घटना

संपूर्ण दिनविशेष दिनदर्शिकायेथे क्लिक करा आणि लगेच डाऊनलोड करा आपल्या मोबाईल / कॉम्पुटर मध्ये. (75% Discount)
१७९२: केंटुकी अमेरिकेचे १५वे राज्य बनले.
१७९६: टेनेसी अमेरिकेचे १६वे राज्य बनले.
१८३१: सरजेम्स रॉस यांनी पृथ्वीच्या चुंबकीय उत्तर ध्रुवाचे स्थान निश्चित केले.
१९२९: विष्णुपंत गोविंद दामले, शेख फत्तेलाल, व्ही. शांताराम व केशवराव धायबर यांनी प्रभात फिल्म कंपनीची कोल्हापूर येथे स्थापना केली.
१९३०: मुंबई व पुणे दरम्यान दख्खनची राणी (Deccan Queen) ही रेल्वेगाडी सुरू झाली.
१९४५: टाटा मूलभूत संशोधन संस्थेची (टाटा इन्स्टिट्यूट ऑफ फंडामेंटल रिसर्च) स्थापना झाली.
१९५९: द. गो. कर्वे पुणे विद्यापीठाचे तिसरे कुलगुरू झाले.
१९६१: अमेरिकेतील फेडरल कम्युनिकेशन्स कमिशन (FCC) ला जगात सर्वप्रथम स्टिरीओ एफ. एम. प्रसारणासाठी परवानगी मिळाली.
१९९६: भारताचे ११वे पंतप्रधान एच. डी. देवेगौडा यांनी सूत्रे हाती घेतली.
२००१: नेपाळचे राजे वीरेंद्र, राणी ऐश्वर्या यांच्यासह अकरा जणांची युवराज दीपेंद्र यांनी निर्घृण हत्या केली.
२००३: चीन मधील महाप्रचंड थ्री गॉर्जेस धरणात पाणी साठवण्यास सुरुवात झाली.
२००४: रमेशचंद्र लाहोटी भारताचे ३५वे सरन्यायाधीश यांनी सूत्रे हाती घेतली.
२०२२: आशिया कप - भारतीय पुरुष हॉकी संघाने २०२२ आशिया कप स्पर्धेत जपानवर 1-0 असा विजय मिळवून कांस्यपदक जिंकले.
२०११: स्पेस शटल एंडेव्हर - ने २५ फ्लाइट्सनंतर अंतिम लँडिंग केले.
२००९: जनरल मोटर्स या कंपनीने दिवाळखोरी जाहीर केली. अमेरिकेच्या इतिहासातील ही चौथी मोठी दिवाळखोरी आहे.
२००४: टेरी निकोल्स यांना ओक्लाहोमा सिटी बॉम्बस्फोटाचा सह-षड्यंत्रकर्ता म्हणून जमिनीच्या शक्यतेशिवाय सलग १६१ जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली, ह्या शिक्षेने गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड बनवला.
१९८८: युरोपियन सेंट्रल बँक या बँक ची स्थापना.
१९८८: इंटरमीडिएट-रेंज न्यूक्लियर फोर्सेस ट्रीटी अंमलात आली.
१९८०: केबल न्यूज नेटवर्क (CNN) हे प्रसारण सुरु केले.
१९६४: केनिया हा देश प्रजासत्ताक बनला.
१९६१: कॅनेडियन इम्पीरियल बँक ऑफ कॉमर्स - कॅनेडियन बँक ऑफ कॉमर्स आणि इम्पीरियल बँक ऑफ कॅनडाचे विलीनीकरण, कॅनडाच्या इतिहासातील सर्वात मोठी बँक विलीनीकरण, यातून कॅनेडियन इम्पीरियल बँक ऑफ कॉमर्सची स्थापना.
१९४१: दुसरे महायुद्ध - क्रेतेची लढाई संपली, क्रेतेने जर्मनीसमोर शरण गेले.
१८९८: हॉटेल रिट्झ, पॅरिस - सुरवात.

१ जून जन्म

संपूर्ण दिनविशेष दिनदर्शिकायेथे क्लिक करा आणि लगेच डाऊनलोड करा आपल्या मोबाईल / कॉम्पुटर मध्ये. (75% Discount)
१८४२: पहिले भारतीय सनदी अधिकारी (ICS) सत्येंद्रनाथ टागोर यांचा जन्म. (मृत्यू: ९ जानेवारी १९२३)
१८४३: फिंगरप्रिंटिंग चे जनक हेन्री फॉल्स यांचा जन्म. (मृत्यू: २४ मार्च १९३०)
१८७२: मराठी कवी नारायण मुरलीधर गुप्ते ऊर्फ कवी बी यांचा जन्म. (मृत्यू: ३० ऑगस्ट १९४७)
१९०७: जेट इंजिन विकसित करणारे फ्रँक व्हाईट यांचा जन्म. (मृत्यू: ९ ऑगस्ट १९९६)
१९२६: अमेरिकन अभिनेत्री मेरिलीन मन्रो यांचा जन्म. (मृत्यू: ५ ऑगस्ट १९६२)
१९२९: हिन्दी चित्रपट अभिनेत्री फातिमा रशिद ऊर्फ नर्गिस दत्त यांचा जन्म. (मृत्यू: ३ मे १९८१)
१९४७: मॅक्लारेन ग्रुप चे संस्थापक रॉन डेनिस यांचा जन्म.
१९६५: इंग्लिश बुद्धिबळपटू नायगेल शॉर्ट यांचा जन्म.
१९७०: हिंदी चित्रपट अभिनेता आर. माधवन यांचा जन्म.
१९८५: भारतीय क्रिकेटपटू दिनेश कार्तिक यांचा जन्म.
१९५३: भारतीय राजकारणी हरिभाऊ माधव जावळे यांचा जन्म (मृत्यू : १६ जून २०२०)
१९४९: भारतीय राजकारणी, आंध्र प्रदेशचे आमदार गुम्मडी कुथुहलम्मा यांचा जन्म (मृत्यू : १५ फेब्रुवारी २०२३)
१९३७: भारतीय राजकारणी व सामाजिक न्याय नेते राम अवधेशसिंग यादव यांचा जन्म (मृत्यू : २० जुलै २०२०)
१९३६: भारतीय चित्रकार नील पवन बरुआ यांचा जन्म (मृत्यू : २८ ऑक्टोबर २०२२)
१९२९: भारतीय वंशाचे आयरिश उद्योगपती, शापूरजी पालोनजी समूहाचे अध्यक्ष - पद्म भूषण पालोनजी मिस्त्री यांचा जन्म (मृत्यू : २८ जून २०२२)
१९२८: सोव्हिएत अंतराळवीर, व्लादिस्लाव वोल्कोव्ह आणि व्हिक्टर पटसायेव यांच्या सोबत अंतराळात मरण पावलेले पहिले व्यक्ती जॉर्जी डोब्रोव्होल्स्की यांचा जन्म (मृत्यू : २९ जून १९७१)

१ जून मृत्यू

संपूर्ण दिनविशेष दिनदर्शिकायेथे क्लिक करा आणि लगेच डाऊनलोड करा आपल्या मोबाईल / कॉम्पुटर मध्ये. (75% Discount)
१८३०: भारतीय धार्मिक नेते स्वामीनारायण यांचे निधन. (जन्म: ३ एप्रिल १७८१)
१८६८: अमेरिकेचे १५ वे राष्ट्राध्यक्ष जेम्स बुकॅनन यांचे निधन. (जन्म: २३ एप्रिल १७९१)
१८७२: न्यूयॉर्क हेरॉल्ड चे स्थापक जेम्स गॉर्डन बेनेट यांचे निधन. (जन्म: १ सप्टेंबर १७९५)
१९३४: प्रसिद्ध नाटककार आणि विनोदी लेखक श्रीपादकृष्ण कोल्हटकर यांचे निधन. (जन्म: २९ जून १८७१)
१९४४: आंतरराष्ट्रीय कीर्तीचे चित्रकार महादेव विश्वनाथ धुरंधर यांचे निधन. (जन्म: १८ मार्च १८६७)
१९६०: जर्मन-ऑस्ट्रियन बहीण पॉड हिटलर यांचे निधन. (जन्म: २१ जानेवारी १८९६)
१९६२: दुसर्‍या महायुद्धात शेकडो ज्यू लोकांची कत्तल करणार्‍या अ‍ॅडॉल्फ आइकमॅन या जर्मन सेनापतीला इस्त्रायलमधे फाशी देण्यात आले.
१९६८: अंध मूकबधिर असूनही कला शाखेची पदवी मिळवलेल्या पहिल्या व्यक्ती आणि समाजसेविका हेलन केलर यांचे निधन. (जन्म: २७ जून १८८०)
१९८४: हिंदी-मराठी चित्रपट अभिनेते नाना पळशीकर यांचे निधन.
१९८७: दिग्दर्शक, पटकथाकार आणि लेखक के.ए. अब्बास यांचे निधन. (जन्म: ७ जून १९१४)
१९९६: भारताचे ६वे राष्ट्रपती, लोकसभेचे ४ थे सभापती, केंद्रीय मंत्री व आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री नीलमसंजीव रेड्डी यांचे निधन. (जन्म: १९ मे १९१३ – इलुरू, तामिळनाडू)
१९९८: ज्येष्ठ साहित्यिक गो. नी. दांडेकर यांचे निधन. (जन्म: ८ जुलै १९१६)
१९९९: होव्हर्क्राफ्ट चे निर्माते शोध ख्रिस्तोफर कॉकेरेल यांचे निधन. (जन्म: ४ जून १९१०)
२०००: एकपात्री कलाकार मधुकर महादेव टिल्लू यांचे निधन.
२००१: नेपाळचे राजे वीरेन्द्र यांची हत्या. (जन्म: २८ डिसेंबर १९४५)
२००२: दक्षिण अफ्रिकेचा क्रिकेट कप्तान हॅन्सी क्रोनिए यांचे विमान अपघातात निधन. (जन्म: २५ सप्टेंबर १९६९)
२००६: लोकसत्ता देनिकाचे माजी संपादक आणि पत्रकार माधव गडकरी यांचे निधन.
२०२२: भारतीय राजकारणी आणि आदिवासी नेते यदुनाथ बास्के यांचा जन्म
२००८: अल्जेरियन-फ्रेंच फॅशन डिझायनर, यवेस सेंट लॉरेंटचे सहसंस्थापक यवेस सेंट लॉरेंट यांचे निधन (जन्म: १ ऑगस्ट १९३६)
१८४१: कॅनिंगचे निर्माते निकोलस एपर्टीट यांचे निधन (जन्म: १७ नोव्हेंबर १७४९)

जून महिन्यातील महत्त्वाच्या आणि विशेष घटना

NMK

दिनांक : २ जून २०१४

NMK

दिनांक : ३ जून १९४७

NMK

दिनांक : ६ जून १६७४

NMK

दिनांक : २१ जून २०१५

NMK

दिनांक : ५ जून १९७४

NMK

दिनांक : २५ जून १८७४

आपल्या मित्रांना पाठवा :
Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.