८ जून दिनविशेष


8 June Dinvishesh For MPSC / UPSC and Any Competitive Exam. You can use following search box to find out more dinvishesh by just typing day along with the month number. (eg. If you want to search for 15th August then type 15-08).

जानेवारी
फेब्रुवारी
मार्च
एप्रिल
मे
जून
जुलै
ऑगस्ट
सप्टेंबर
ऑक्टोबर
नोव्हेंबर
डिसेंबर

८ जून महत्वाच्या घटना

१६७०: पुरंदरच्या तहात गमावलेला रोहिडा किल्ला शिवाजी महाराजांनी परत जिंकून घेतला.

१६२४: पेरू येथे भूकंप.

१७०७: औरंगजेबाच्या मृत्यूनंतर मुअज्जम आणि आझमशाह या त्याच्या दोन मुलांमधे दिल्लीच्या तख्तासाठी युद्ध झाले. यात मुअज्जमने आझमशाहला ठार करुन दिल्लीची गादी बळकावली.

१७१३: मुघलांनी १६८९ मधे जिंकलेला रायगड किल्ला पंतप्रतिनिधी यांनी सिद्दीकडुन राजकारणाने जिंकुन घेतला.

१७८३: आईसलँड मधील लाकी ज्वालामुखीचा उद्रेक, हजार ठार.

१९१२: कार्ल लेम्ले यांनी यूनिव्हर्सल पिक्चर्स या कंपनीची स्थापना केली.

१९१५: लोकमान्य टिळकांनी मंडालेच्या तुरुंगात असताना लिहुन पूर्ण केलेल्या गीतारहस्य या ग्रंथाचे गायकवाडवाड्यात प्रकाशन झाले.

१९१८: नोव्हा अ‍ॅक्‍विला या सर्वाधिक तेजस्वी तेजोमेघाचा शोध.

१९४१: दुसरे महायुद्ध – दोस्त राष्ट्रांनी सीरीया व लेबानॉन पादाक्रांत केले.

१९४८: एअर इंडिया ची मुंबई – लंडन विमानसेवा सुरू झाली.

१९४८: जॉर्ज ऑर्वेलची १९८४ या नावाची कांदबरी प्रसिद्ध झाली.

१९५३: कृष्णवर्णीयांना हॉटेलमधे सेवा नाकारण्यास अमेरिकन सर्वोच्च न्यायालयाने बंदी घातली.

१९६९: लष्करप्रमुख म्हणून सॅम माणेकशा यांची नियुक्ती.

१९९२: पहिल्यांदा जागतिक महासागर दिन साजरा केला गेला.

२००४: आधुनिक काळातील शुक्राचे (सूर्यावरुन) पहिले अधिक्रमण झाले. याआधीचे अधिक्रमण १८८२ या वर्षी झाले होते.

८ जून जन्म

१९०६: भारतीय क्रिकेट खेळाडू सैयद नझीर अली यांचा जन्म.

१९१०: लेखक, तत्त्वचिंतक व समीक्षक दिनकर केशव तथा दि. के. बेडेकर यांचा जन्म. (मृत्यू: २ मे १९७३)

१९१५: भारतीय पत्रकार, लेखक, आणि कवी काययार सिंहनाथ राय यांचा जन्म. (मृत्यू: ९ ऑगस्ट २०१५)

१९१७: भावगीत गायक गजाननराव वाटवे यांचा जन्म. (मृत्यू: २ एप्रिल २००९)

१९२१: इंडोनेशियाचे दुसरे राष्ट्राध्यक्ष सुहार्तो यांचा जन्म. (मृत्यू: २७ जानेवारी २००८)

१९२५: अमेरिकन राष्ट्राध्यक्ष जॉर्ज बुश यांची पत्नी बार्बरा बुश यांचा जन्म.

१९३२: इंग्लिश क्रिकेटपटू रे इलिंगवर्थ यांचा जन्म.

१९३६: नोबेल पारितोषिक विजेते अमेरिकन भैतिकशास्त्रज्ञ केनिथ गेडीज विल्सन यांचा जन्म.

१९५५: वर्ल्ड वाईड वेब चे जनक टिम बर्नर्स-ली यांचा जन्म.

१९५७: चित्रपट अभिनेत्री डिंपल कपाडिया यांचा जन्म.

१९७५: भारतीय अभिनेत्री आणि निर्माता शिल्पा शेट्टी यांचा जन्म.

८ जून मृत्यू

६३२: ६३२ई.पुर्व : इस्लाम धर्माचे संस्थापक मोहंमद पैगंबर यांचे निधन.

१७९५: फ्रान्सचा राजा लुई १७ वा यांचे निधन. (जन्म: २७ मार्च १७८५)

१८०९: अमेरिकन विचारवंत राजकारणी थॉमस पेन यांचे निधन. (जन्म: २९ जानेवारी १७३७)

१८४५: अमेरिकेचे ७वे राष्ट्राध्यक्ष अॅन्ड्रयू जॅक्सन यांचे निधन. (जन्म: १५ मार्च १७६७)

१९९५: रंगभूमी कलावंत एकपात्री प्रयोगकार राम नगरकर यांचे निधन.

१९९८: नायजेरियाचे राष्ट्राध्यक्ष सानी अबाचा यांचे निधन.

जून महिन्यातील इतर महत्त्वाच्या आणि विशेष घटना

NMK
तेलंगण भारताचे २९वे राज्य झाले.
दिनांक : २ जून २०१४
NMK
हिन्दूस्तानच्या फाळणीची मांउंटबॅटन योजना जाहीर झाली.
दिनांक : ३ जून १९४७
NMK
रायगड येथे छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक झाला.
दिनांक : ६ जून १६७४
NMK
जागतिक योग दिनाची पराक्रमी सुरवात.
दिनांक : २१ जून २०१५
NMK
जागतिक पर्यावरण दिन
दिनांक : ५ जून १९७४
NMK
छत्रपती शाहू महाराज जयंती
दिनांक : २५ जून १८७४