४ जून दिनविशेष


4 June Dinvishesh For MPSC / UPSC and Any Competitive Exam. You can use following search box to find out more dinvishesh by just typing day along with the month number. (eg. If you want to search for 15th August then type 15-08).

जानेवारी
फेब्रुवारी
मार्च
एप्रिल
मे
जून
जुलै
ऑगस्ट
सप्टेंबर
ऑक्टोबर
नोव्हेंबर
डिसेंबर

४ जून महत्वाच्या घटना

१६७४: राज्याभिषेकापूर्वी छत्रपती शिवाजी महाराजांची सुवर्णतुला झाली. ब्रिटिश वकिलातीच्या मते त्यांचे वजन सुमारे ७३ किलो भरले.

१८७६: ट्रान्सकाँटिनेन्टल एक्स्प्रेस रेल्वे अमेरिकेच्या दोन तीरांना जोडणारी ही रेल्वेची पहिली प्रवासी खेप होती.

१८७८: ऑट्टोमन साम्राज्याने सायप्रस युनायटेड किंग्डमच्या हवाली केले.

१८९६: हेन्री फोर्ड यांनी तयार केलेल्या पहिल्या मोटारीचे यशस्वी परीक्षण.

१९४४: दुसरे महायुद्ध – दोस्त सैन्याने रोम जिंकले.

१९७०: टोंगाला युनायटेड किंग्डमपासून स्वातंत्र्य.

१९७९: घानामधे लष्करी उठाव.

१९९३: आय.एन. एस. म्हैसूर या युद्धविनाशिकेचे जलावतरण.

१९९४: वेस्टइंडिजच्या ब्रायन लाराचा ८ डावांत ७ शतकांचा नवा विक्रम.

१९९४: गीतकार मजरुह सुलतानपुरी यांना दादासाहेब फाळके पुरस्कार जाहीर.

१९९७: इन्सॅट-२डी या संपूर्ण भारतीय बनावटीच्या उपग्रहाचे फ्रेंच गयानातील कोऊरू येथून यशस्वी प्रक्षेपण झाले.

२००१: नेपाळचा शेवटचा राजा ग्यानेंद्र राज्यपदावर.

४ जून जन्म

१७३८: इंग्लंडचा राजा जॉर्ज (तिसरा) यांचा जन्म. (मृत्यू: २९ जानेवारी १८२०)

१९०४: भारतीय प्रकाशक, पर्यावरणवादी भगत पुराण सिंह यांचा जन्म. (मृत्यू: ५ ऑगस्ट १९९२)

१९१०: होव्हर्क्राफ्ट चे शोधक ख्रिस्तोफर कॉकेरेल्म यांचा जन्म. (मृत्यू: १ जुन १९९९)

१९१५: माली देशाचे पहिले अध्यक्ष मालिबो केएटा यांचा जन्म. (मृत्यू: १६ मे १९७७)

१९३६: चित्रपट अभिनेत्री नूतन बहल यांचा जन्म. (मृत्यू: २१ फेब्रुवारी १९९१)

१९४६: दाक्षिणात्य चित्रपटातील पार्श्वगायक पद्मश्री व पद्मभूषण एस.पी. बालसुब्रह्मण्यम यांचा जन्म.

१९४७: विनोदी अभिनेता अशोक सराफ यांचा जन्म.

१९७४: भारतीय शेफ जॅकब सहाय्या कुमार अरुनी यांचा जन्म. (मृत्यू: ४ नोव्हेंबर २०१२)

१९७५: अमेरिकन अभिनेत्री अँजेलिना जोली यांचा जन्म.

१९९०: भूतानची राणी जेत्सुनपेमा वांग्चुक यांचा जन्म.

४ जून मृत्यू

१९४७: बौद्ध धर्माचे अभ्यासक पंडित धर्मानंद कोसंबी यांचे निधन. (जन्म: ९ ऑक्टोबर १८७६)

१९६२: अमेरिकन निसर्गतज्ज्ञ चार्ल्स विल्यम बीब यांचे निधन.

१९९८: इतिहासतज्ज्ञ डॉ.अश्विन दासगुप्ता यांचे निधन.

जून महिन्यातील इतर महत्त्वाच्या आणि विशेष घटना

NMK
तेलंगण भारताचे २९वे राज्य झाले.
दिनांक : २ जून २०१४
NMK
हिन्दूस्तानच्या फाळणीची मांउंटबॅटन योजना जाहीर झाली.
दिनांक : ३ जून १९४७
NMK
रायगड येथे छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक झाला.
दिनांक : ६ जून १६७४
NMK
जागतिक योग दिनाची पराक्रमी सुरवात.
दिनांक : २१ जून २०१५
NMK
जागतिक पर्यावरण दिन
दिनांक : ५ जून १९७४
NMK
छत्रपती शाहू महाराज जयंती
दिनांक : २५ जून १८७४