२ मे दिनविशेष


2 May Dinvishesh For MPSC / UPSC and Any Competitive Exam. You can use following search box to find out more dinvishesh by just typing day along with the month number. (eg. If you want to search for 15th August then type 15-08).

जानेवारी
फेब्रुवारी
मार्च
एप्रिल
मे
जून
जुलै
ऑगस्ट
सप्टेंबर
ऑक्टोबर
नोव्हेंबर
डिसेंबर

२ मे महत्वाच्या घटना

१९०८: स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी लंडनमधे प्रथमच शिवजयंती उत्सव साजरा केला.

१९१८: जनरल मोटर्सने शेवरले मोटर कंपनी विकत घेतली.

१९२१: स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे बंधू बाबाराव व तात्याराव यांची अंदमानातुन हिन्दुस्थानात पाठवणी केली.

१९४५: दुसरे महायुद्ध – सोविएत सैन्याने बर्लिनचा पाडाव केला.

१९९४: बँक ऑफ कराड चे बँक ऑफ इंडिया मधे विलिनीकरण झाले.

१९९४: नगर जिल्ह्यातील रामदास ढमाले या अपंग युवकाने पुण्यातील टिळक तलावात सलग ३७ तास ४५ मिनिटे पोहून एक नवा विक्रम प्रस्थापित केला.

१९९७: टोनी ब्लेअर इंग्लंडचे पंतप्रधान बनले.

१९९७: राष्ट्रीय अ बुद्धीबळ अजिंक्यपद स्पर्धेत पुण्याच्या अभिजित कुंटेने इंटरनॅशनल मास्टर किताबासाठीचे निकष पूर्ण केले.

१९९९: कोल्हापूर येथील शर्वरी मानसिंग पवार या तीन वर्षे चार महिन्याच्या बालिकेने ५१.१ कि. मी. अंतर न थांबता स्केटिंग करुन ३ तास ५१ मिनिटांत पार केले.

१९९९: मीरा मोस्कोसो पनामा देशाच्या अध्यक्ष म्हणून निवडलेल्या पहिल्या महिला ठरल्या.

२००४: एस. राजेन्द्रबाबू यांनी भारताचे ३४वे सरन्यायाधीश म्हणुन कार्यभार सांभाळला.

२०११: अमेरिकन सैन्याच्या Navy Seals 6 या विशेष तुकडीने ओसामा बिन लादेन याची पाकिस्तानातील अ‍ॅबोटाबाद येथे हत्या केली.

२०१२: नॉर्वेजियन चित्रकार एडवर्ड माँच यांचे द स्क्रीम हे चित्र लिलावात १२० मिलियन डॉलर्सला विकले गेले. हा एक नवा जागतिक विक्रम बनला.

२ मे जन्म

१८९९: मराठी चित्रपटसृष्टी चे चित्रमहर्षी भालजी पेंढारकर यांचा जन्म. (मृत्यू: २६ नोव्हेंबर १९९४)

१९२०: शास्त्रीय व नाट्यसंगीत गायक डॉ. वसंतराव देशपांडे यांचा जन्म. (मृत्यू: ३० जुलै १९८३)

१९२१: ख्यातनाम चित्रपट निर्माते व दिग्दर्शक आणि भारतरत्‍न तसेच विशेष ऑस्कर पुरस्कार विजेते सत्यजित रे यांचा जन्म. (मृत्यू: २३ एप्रिल १९९२)

१९२९: भूतानचे राजे जिग्मे दोरजी वांगचुकयांचा जन्म. (मृत्यू: २१ जुलै १९७२)

१९६९: वेस्ट इंडीजचा क्रिकेटपटू ब्रायन लारा यांचा जन्म.

१९७२: स्काईप सॉफ्टवेअर चे सहनिर्माते अहटी हेनला यांचा जन्म.

२ मे मृत्यू

१५१९: इटालियन चित्रकार, संशोधक, गणितज्ञ आणि भौतिकशास्त्रज्ञ लिओनार्डो दा विंची यांचे निधन. (जन्म: १५ एप्रिल १४५२)

१६८३: शिवाजी महाराजांच्या सांगण्यावरुन राज्यव्यवहारकोश तयार करणारे मुत्सद्दी रघुनाथ नारायण हणमंते तथा रघुनाथपंडित यांचे निधन.

१९६३: महाराष्ट्रातील जादूगारांचे आचार्य डॉ. के. बी. लेले यांचे निधन. (जन्म: २ नोव्हेंबर १८८२)

१९७३: लेखक, तत्त्वचिंतक व समीक्षक दिनकर केशव तथा दि. के. बेडेकर यांचे निधन. (जन्म: ८ जून १९१०)

१९७५: चित्रपट दिग्दर्शक, लेखक, कवी व गीतकार शांताराम आठवले यांचे निधन. (जन्म: २१ जानेवारी १९१०)

१९९८: गोवा मुक्ती संग्रामातील स्वातंत्र्यसैनिक, काँग्रेसचे नेते, ५व्या लोकसभेचे सदस्य पुरुषोत्तम काकोडकर यांचे निधन. (जन्म: १८ मे १९१३)

१९९९: जयपूर-अत्रौली घराण्याचे शास्त्रीय गायक पं. सुधाकरबुवा डिग्रजकर यांचे निधन.

२०११: अल कायदा चे संस्थापक ओसामा बिन लादेन अमेरिकन सैन्याने ठार मारले. (जन्म: १० मार्च १९५७)

मे महिन्यातील इतर महत्त्वाच्या आणि विशेष घटना

NMK
मुंबईसह मराठी भाषिक महाराष्ट्र राज्य आणि गुजरात या स्वतंत्र राज्यांचा निर्माण झाला.
दिनांक : १ मे १९६०
NMK
थोर समाजसेवक गोपाल कृष्ण गोखले यांचा कातळूक, रत्नागिरी येथे जन्म. (मृत्यू: १९ फेब्रुवारी १९१५)
दिनांक : ९ मे १८६६
NMK
समाजसुधारक, धर्मसुधारक व ब्राम्हो समाजाचे संस्थापक राजा राम मोहन रॉय यांचा जन्म. (मृत्यू: २७ सप्टेंबर १८३३)
दिनांक : २२ मे १७७२
NMK
क्रांतिकारक स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांचा जन्म. (मृत्यू: २६ फेब्रुवारी १९६६)
दिनांक : २८ मे १८८३
NMK
देवेंद्रनाथ टागोर ह्याचा जन्मदिवस
दिनांक : ८ मे १८१७
NMK
राष्ट्रीय तंत्रज्ञान दिन
दिनांक : ११ मे १९९८