15 April Dinvishesh

15 April Dinvishesh (१५ एप्रिल दिनविशेष) For MPSC / UPSC and Any Competitive Exam. You can use following search box to find out more dinvishesh like 15 April 2025 Dinvishesh by just typing day along with the month number. (eg. If you want to search for 15th August then type 15-08).

आपल्या मित्रांना पाठवा :

१५ एप्रिल महत्वाच्या घटना

संपूर्ण दिनविशेष दिनदर्शिकायेथे क्लिक करा आणि लगेच डाऊनलोड करा आपल्या मोबाईल / कॉम्पुटर मध्ये. (75% Discount)
१६७३: मराठा साम्राज्याचे सरनौबत प्रतापराव गुजर यांनी बहलोलखान पठाणाविरुद्ध मोठी लढाई जिंकली.
१८९२: जनरल इलेक्ट्रिक कंपनीची स्थापना झाली.
१९१२: आर. एम. एस. टायटॅनिक हे जहाज उत्तर अटलांटिक महासागरात बुडाले.
१९२३: मधुमेह असणा-यांना इन्सूलिन वापरण्यासाठी सामान्यतः उपलब्ध झाले.
१९४०: दुसरे महयुद्ध – नाझी जर्मनीच्या ताब्यात असलेल्या नॉर्वेतील नॉर्विक शहरावर दोस्त राष्ट्रांच्या फौजांनी हल्ला सुरू केला.
१९९७: मक्‍केपासून सहा किमी अंतरावरील मिना (सौदी अरेबिया) येथे हज यात्रेकरुंच्या तंबूला आग लागून किमान ३०० जण मृत्युमुखी पडले.
१९९४: भारताची इंकेल प्रस्तावावर स्वाक्षरी झाली

१५ एप्रिल जन्म

संपूर्ण दिनविशेष दिनदर्शिकायेथे क्लिक करा आणि लगेच डाऊनलोड करा आपल्या मोबाईल / कॉम्पुटर मध्ये. (75% Discount)
१४५२: इटालियन चित्रकार, संशोधक, गणितज्ञ आणि भौतिकशास्त्रज्ञ लिओनार्डो डा विंची यांचा जन्म. (मृत्यू: २ मे १५१९)
१४६९: शिख धर्माचे संस्थापक आणि पहिले गुरू गुरू नानक देव यांचा जन्म. (मृत्यू: २२ सप्टेंबर १५३९)
१७०७: स्विस गणितज्ञ लिओनार्ड ऑयलर यांचा जन्म. (मृत्यू: १८ सप्टेंबर १७८३)
१७४१: चित्रकार, निसर्गवैज्ञानिक व सैनिक चार्ल्स विल्सन पील अमेरिकन यांचा जन्म. (मृत्यू: २२ फेब्रुवारी १८२७)
१८९३: चरित्रकार, टीकाकार, इतिहास संशोधक, संत साहित्याचे अभ्यासक व लेखक नरहर रघुनाथ तथा न. र. फाटक यांचा जन्म. (मृत्यू: २१ डिसेंबर १९७९)
१८९४: सोविएत युनियनचे राष्ट्राध्यक्ष निकिता क्रूश्चेव्ह यांचा जन्म. (मृत्यू: ११ सप्टेंबर १९७१)
१९०१: अजय मुखर्जी भारतीय राजकारणी यांचा जन्म.
१९१२: उद्योजक व वेदाभ्यासक मल्हार सदाशिव तथा बाबूराव पारखे यांचा जन्म. (मृत्यू: १३ जानेवारी १९९७)
१९१२: उत्तर कोरियाचे राष्ट्राध्यक्ष किम सुंग (दुसरे) यांचा जन्म. (मृत्यू: ८ जुलै १९९४)
१९२२: गीतकार हसरत जयपुरी यांचा जन्म. (मृत्यू: १७ सप्टेंबर १९९९)
१९३२: कवी सुरेश भट यांचा जन्म. (मृत्यू: १४ मार्च २००३)
१९६३: भारतीय क्रिकेटपटू मनोज प्रभाकर यांचा जन्म.
१९७७: भारतीय शिल्पकार सुदर्शन पटनायक यांचा जन्म
१९६३: पाकिस्तानी क्रिकेटपटू मंजूर इलाही यांचा जन्म
१९६२: भारतीय गायक सुरजित बिंद्राखिया यांचा जन्म (मृत्यू : १७ नोव्हेंबर २००३)
१९४९: भारतीय राजकारणी, आमदार बोज्जला गोपाला कृष्ण रेड्डी यांचा जन्म (मृत्यू : ६ मे २०२२)
१९४३: अमेरिकन डॉक्टर आणि बायोकेमिस्ट - नोबेल पुरस्कार रॉबर्ट लेफकोविट्झ यांचा जन्म
१९४०: दक्षिण आफ्रिकन अभिनेत्री, मॉडेल, ब्युटी क्वीन आणि १९५८ मिस वर्ल्ड पेनेलोप कोलेन यांचा जन्म
१९३७: अमेरिकन अभियंते आणि व्यापारी, गोर-टेक्सचे सह-संशोधक रॉबर्ट डब्ल्यू. गोर यांचा जन्म (मूत्यू : १७ सप्टेंबर २०२०)
१९३१: स्वीडिश कवी, अनुवादक आणि मानसशास्त्रज्ञ - नोबेल पुरस्कार टॉमस ट्रान्सट्रोमर यांचा जन्म (मृत्यू : २६ मार्च २०१५)
१९३०: लोकशाही पद्धतीने राष्ट्राध्यक्ष म्हणून निवडून आलेल्या जगातील पहिल्या महिला, आइसलँड देशाच्या ४थ्या राष्ट्राध्यक्ष विग्डीस फिनबोगाडोत्तिर यांचा जन्म
१९२४: श्रीलंकेचे राजकारणी एम. कनागररत्नम एम. कनागररत्नम यांचा जन्म (मृत्यू : २० एप्रिल १९८०)
१९२३: अमेरिकन कार्यकर्ते, मिनिटमेन (एक कम्युनिस्ट विरोधी संघटना)चे संस्थापक रॉबर्ट डीपग यांचा जन्म (मृत्यू : ३० जुन २००९)
१९२०: जर्मनी देशाचे ६वे राष्ट्राध्यक्ष रिचर्ड वोन वेझसॅकर यांचा जन्म (मृत्यू : ३१ जानेवारी २०१५)
१९१९: भारताच्या हवाई दलाचे 3रे प्रमुख अर्जन सिंग यांचा जन्म (मृत्यू : १६ सप्टेंबर २०१७)
१९०७: डच-इंग्रजी इथोलॉजिस्ट आणि पक्षीशास्त्रज्ञ - नोबेल पुरस्कार निकोलास टिनबर्ग यांचा जन्म (मृत्यू : २१ डिसेंबर १९८८)
१९०१: फ्रान्स देशाचे पंतप्रधान रेने प्लेव्हन यांचा जन्म (मृत्यू : १३ जानेवारी १९९३)
१८९६: रशियन भौतिकशास्त्रज्ञ आणि रसायनशास्त्रज्ञ - नोबेल पुरस्कार निकोले सेम्योनोव्ह यांचा जन्म (मृत्यू : २५ सप्टेंबर १९८६)
१८९०: इंग्रज व्यावसायिक, रात्री रस्त्यावर चमकणाऱ्या प्रतिबिंबित होणाऱ्या स्टिकर (reflective road stud or cat's eye)चे निर्माते पर्सी शॉ यांचा जन्म (मृत्यू : १ सप्टेंबर १९७६)
१८८३: ऑस्ट्रेलिया देशाचे ८वे पंतप्रधान स्टॅनली ब्रुस यांचा जन्म (मृत्यू : २५ ऑगस्ट १९६७)
१८७४: जर्मन भौतिकशास्त्रज्ञ आणि शैक्षणिक - नोबेल पुरस्कार जोहान्स स्टार्क यांचा जन्म (मृत्यू : २१ जुन १९५७)
१८४१: सीग्राम कंपनीचे संस्थापक, कॅनेडियन उद्योगपती जोसेफ ई.सीग्राम यांचा जन्म (मृत्यू : १८ ऑगस्ट १९१९)
१७९५: अॅलोइस हिटलरच्या आई आणि अॅडॉल्फ हिटलरच्या आजी मारिया शिकलग्रुबर यांचा जन्म (मृत्यू : ६ जानेवारी १८४७)
१६४२: ऑट्टोमन सुलतान सुलेमान (दुसरा) यांचा जन्म (मृत्यू : २२ जुन १६९१)
१५६३: शीख धर्माचे ५वे गुरू गुरु अर्जन देव यांचा जन्म (मृत्यू : ३० मे १६०६)

१५ एप्रिल मृत्यू

संपूर्ण दिनविशेष दिनदर्शिकायेथे क्लिक करा आणि लगेच डाऊनलोड करा आपल्या मोबाईल / कॉम्पुटर मध्ये. (75% Discount)
१७९४: पंडीतकवी मोरेश्वर रामचंद्र पराडकर उर्फ मोरोपंत यांचे निधन.
१८६५: अमेरिकेचे १६ वे राष्ट्राध्यक्ष अब्राहम लिंकन यांचे निधन (जन्म: १२ फेब्रुवारी १८०९)
१९१२: आर. एम. एस. टायटॅनिक जहाजाचा कप्तान एडवर्ड जे. स्मिथ यांचे निधन. (जन्म: २७ जानेवारी १८५०)
१९८०: फ्रेन्च लेखक, कवी, तत्त्वज्ञ आणि नोबेल पारितोषिक विजेते जेआँ-पॉल सार्त्र यांचे निधन. (जन्म: २१ जून १९०५)
१९९०: हॉलिवूड अभिनेत्री ग्रेटा लोविसा गुस्ताव्हसन ऊर्फ ग्रेटा गार्बो यांचे निधन. (जन्म: १८ सप्टेंबर १९०५)
१९९५: तत्कालीन मध्यभारत राज्याचे पहिले मुख्यमंत्री पंडित लीलाधर जोशी यांचे निधन.
१९९८: कंबोडियातील २० लाख नागरिकांच्या हत्याकांडास जबाबदार असणारा ख्मेर रुजचा नेता पॉल पॉट यांचे निधन. (जन्म: १९ मे १९२५)
२०१३: संत साहित्याचे अभ्यासक वि. रा. करंदीकर यांचे निधन. (जन्म: २७ ऑगस्ट १९१९)
९४३: दक्षिणी हानचे सम्राट लिऊ बिन यांचे निधन
६२८: जपानचे सम्राट सुईको यांचे निधन (जन्म: ३ जानेवारी ५५४)
२०२२: पाकिस्तानी समाजसेवी आणि अब्दुल सत्तार एधी यांच्या पत्नी बिल्कीस एधी यांचे निधन (जन्म: १४ ऑगस्ट १९४७)
२०१५: नेपाळ देशाचे २४वे पंतप्रधान सूर्य बहादूर थापा यांचे निधन (जन्म: २१ मार्च १९२८)
१९८९: चिनी कम्युनिस्ट पक्षाचे सरचिटणीस हू यॊबंग यांचे निधन (जन्म: २० नोव्हेंबर १९१५)
१९६६: बंगाली राजकारणी, लेखक, पत्रकार, पूर्व पाकिस्तानचे पहिले आरोग्य मंत्री हबीबुल्ला बहार चौधरी यांचे निधन
१९१२: आरएमएस टायटॅनिक जहाजाचे रचनाकार थॉमस ऍन्ड्रयूज यांचे निधन (जन्म: ७ फेब्रुवारी १८७३)
१७६४: राजा लुई XVची शिक्षिका मॅडम डी पोम्पाडोर यांचे निधन (जन्म: २९ डिसेंबर १७२१)
१७६१: आर्गीलचे ३रे ड्यूक, स्कॉटिश वकील आणि राजकारणी, कोर्ट ऑफ सेशनचे लॉर्ड अध्यक्ष आर्किबाल्ड कॅम्पबेल यांचे निधन
१७१९: फ्रान्सच्या लुई १४वे यांची पत्नी फ्रँकोइस डी'ऑबिग्ने, मार्क्विस डी मेनटेनॉन यांचे निधन (जन्म: २७ नोव्हेंबर १६३५)
१५५८: सुलेमान द मॅग्निफिसेंट यांची पत्नी रोक्सेलाना यांचे निधन
१५०२: आर्लेचे लॉर्ड आणि ऑरेंजचे राजकुमार चालोन-अरलेचा जॉन (चौथा) यांचे निधन

एप्रिल महिन्यातील महत्त्वाच्या आणि विशेष घटना

NMK

दिनांक : १ एप्रिल १९३५

NMK

दिनांक : २ एप्रिल १८७०

NMK

दिनांक : ६ एप्रिल १९३०

NMK

दिनांक : ७ एप्रिल १९४८

NMK

दिनांक : १३ एप्रिल १९१९

NMK

दिनांक : १६ एप्रिल १८५३

NMK

दिनांक : १७ एप्रिल १९५२

NMK

दिनांक : १८ एप्रिल १९५०

NMK

दिनांक : १९ एप्रिल १९७५

NMK

दिनांक : २२ एप्रिल १९७०

NMK

दिनांक : २८ एप्रिल १९१६

NMK

दिनांक : ९ एप्रिल १८२८

NMK

दिनांक : ११ एप्रिल १८२७

NMK

दिनांक : २३ एप्रिल १८५८

NMK

दिनांक : ८ एप्रिल १८५७

NMK

दिनांक : १० एप्रिल १९१७

NMK

दिनांक : २४ एप्रिल १९९३

NMK

दिनांक : २५ एप्रिल २००८

NMK

दिनांक : २५ एप्रिल २००८

आपल्या मित्रांना पाठवा :
Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.