13 MARCH DINVISHESH: Check all the latest march dinvishesh like birth, death and important events from MahaNMK.com. March Important Events is the special category which may help you in your MPSC / UPSC / Competitive exams.
मार्च दिनविशेष : "आता स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करणं झालं सोप्पं" MahaNMK आपल्यासाठी घेऊन आले आहेत Dinvishesh, सर्व महत्वाच्या दिनविशेष आपल्याला एकाच ठिकाणी उपलब्ध करून देण्यासाठी आम्ही हा नवीन उपक्रम राबवला आहे.
महत्वाच्या घटना (13 MARCH)
13 मार्च 1781: विल्यम हर्षेल यांनी युरेनसचा शोध लावला.
13 मार्च 1897: सॅन डीयेगो विद्यापीठाची स्थापना झाली.
13 मार्च 1910: पॅरिसहुन लंडनला येताच स्वातंत्र्यवीर सावरकर यांना अटक झाली.
13 मार्च 1930: क्लाईड डब्ल्यू. टॉमबॉग यांनी प्लुटो ग्रह शोधल्याचे हार्वर्ड विद्यापीठातील वेधशाळेला कळवले.
13 मार्च 1940: अमृतसर येथील जालियनवाला बाग हत्याकांडाचे समर्थन करणारे पंजाबचे गव्हर्नर मायकेल ओडवायर यांची उधमसिंग यांनी गोळया घालून हत्या केली.
13 मार्च 1997: मदर तेरेसा यांच्या वारस म्हणून सिस्टर निर्मला यांची निवड करण्यात आली.
13 मार्च 1999: कोयना जलविद्युत प्रकल्पाच्या चौथ्या टप्प्याचे उद्घाटन झाले.
13 मार्च 2003: मुंबई शहरातील लोकल रेल्वेमध्ये बॉम्बस्फोट झाले.
13 मार्च 2007: वेस्ट इंडीजमधे ९ व्या क्रिकेट विश्वकरंडक क्रिकेटस्पर्धेचे उद्घाटन झाले.
जन्म (13 MARCH)
13 मार्च 1733: इंग्लिश रसायनशास्रज्ञ जोसेफ प्रिस्टले यांचा जन्म. (मृत्यू: ६ फेब्रुवारी १८०४)
13 मार्च 1896: प्राच्यविद्या संशोधक महामहोपाध्याय डॉ. वासुदेव विष्णू मिराशी यांचा जन्म. (मृत्यू: ३ एप्रिल १९८५)
13 मार्च 1926: ललित लेखक रवींद्र पिंगे यांचा जन्म. (मृत्यू: १७ ऑक्टोबर २००८)
13 मार्च 1938: ४९वे योकोझुना जपानी सुमो तोचीनौमी तेरुयोशी यांचा जन्म.
मृत्यू (13 MARCH)
13 मार्च 1800: पेशवे दरबारातील एक मंत्री नानासाहेब फडणवीस यांचे निधन. (जन्म: १२ फेब्रुवारी १७४२ – सातारा)
13 मार्च 1899: दत्तात्रेय कोंडो घाटे उर्फ कवी दत्त यांचे निधन. (जन्म: २७ जून १८७५)
13 मार्च 1901: अमेरिकेचे ३३वे राष्ट्राध्यक्ष बेंजामिन हॅरिसन यांचे निधन. (जन्म: २० ऑगस्ट १८३३)
13 मार्च 1955: नेपाळचे राजे वीर विक्रम शाह त्रिभुवन यांचे निधन. (जन्म: २३ जून १९०६)
13 मार्च 1967: वेस्ट इंडिजचे क्रिकेट खेळाडू सर फँक वॉरेल यांचे निधन. (जन्म: १ ऑगस्ट १९२४)
13 मार्च 1969: गणितशास्रज्ञ रँग्लर मोहिनीराज लक्ष्मण चंद्रात्रेय यांचे निधन.
13 मार्च 1994: मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे ज्येष्ठ नेते व सिटू या कामगार संघटनेचे लढवय्ये नेते श्रीपाद यशवंत कोल्हटकर यांचे निधन.
13 मार्च 1996: अभिनेते आणि नाट्यनिर्माते शफी इनामदार यांचे निधन. (जन्म: २३ ऑक्टोबर १९४५)
13 मार्च 1997: राष्ट्रीय महिला हॉकी खेळाडू शीला इराणी यांचे निधन.
13 मार्च 2004: सतारवादक उस्ताद विलायत खाँ यांचे निधन. (जन्म: २८ ऑगस्ट १९२८)
13 मार्च 2006: चिकन नुग्गेत चे निर्माते रॉबर्ट सी बेकर यांचे निधन. (जन्म: २९ डिसेंबर १९२१)
मार्च महिन्यातील दिनविशेष
मार्च महिन्यातील महत्त्वाच्या आणि विशेष घटना
पहिल्यांदा जागतिक महिला दिन साजरा केला गेला.दिनांक : 8 मार्च 1911
महात्मा गांधी यांनी मिठाच्या सत्याग्रहासाठी २०० मैलाच्या दांडीयात्रेला सुरवात केली.दिनांक : 12 मार्च 1930
भारतीय क्रांतिकारी भगतसिंग, राजगुरू आणि सुखदेव यांना फाशी देण्यात आली.दिनांक : 23 मार्च 1931
टाटा उद्योग समुहाचे संस्थापक भारतीय उद्योगपती जमशेदजी टाटा यांचा जन्म. (मृत्यू: १९ मे १९०४)दिनांक : 3 मार्च 1839
पहिल्या महिला शिक्षिका आणि समाज सुधारक सावित्रीबाई फुले यांचे निधन. (जन्म: ३ जानेवारी १८३१)दिनांक : 10 मार्च 1897
आधुनिक मराठी गद्याचे जनक, ग्रंथकार आणि केसरीचे एक संस्थापक विष्णूशास्त्री चिपळूणकर यांचे निधन. (जन्म: २० मे १८५०)दिनांक : 17 मार्च 1882
राष्ट्रीय बाल हक्क संरक्षण अयोग्य स्थापनादिनांक : 5 मार्च 2007
नियोजन आयोगाची स्थापनादिनांक : 15 मार्च 1950
राष्ट्रीय लसीकरण दिवसदिनांक : 16 मार्च 1955
महार वतन बिल मांडणीदिनांक : 19 मार्च 1928
आंतरराष्ट्रीय वन दिनदिनांक : 21 मार्च 2012
PETA ची स्थापनादिनांक : 22 मार्च 1980
जागतिक क्षय रोग दिनदिनांक : 24 मार्च 1962
६१ वि घटना दुरुस्ती करून मतदाराचे किमान वय २१ वर्षांवरून वरून १८ वर्षांवर वर आणण्यात आलेदिनांक : 28 मार्च 1988
क्रिप्स योजना जाहीरदिनांक : 29 मार्च 1942