३० मार्च दिनविशेष
30 March Dinvishesh For MPSC / UPSC and Any Competitive Exam. You can use following search box to find out more dinvishesh by just typing day along with the month number. (eg. If you want to search for 15th August then type 15-08).
जानेवारी
फेब्रुवारी
मार्च
एप्रिल
मे
जून
जुलै
ऑगस्ट
सप्टेंबर
ऑक्टोबर
नोव्हेंबर
डिसेंबर
३० मार्च महत्वाच्या घटना
〉
१६६५: पुरंदर किल्ल्यावर दिलेरखानाशी लढताना वीर मुरारजी धारातीर्थी पडले.
〉
१७२९: थोरले बाजीराव पेशवे यांनी जैतपूर येथे महंमदशहा बंगश याचा पराभव केला.
〉
१८४२: अमेरिकन शल्यविशारद डॉ. क्रॉफर्ड लाँग यांनी शस्त्रक्रिया करताना भूल देण्यासाठी इथर या द्रव्याचा प्रथमच वापर केला.
〉
१८५६: पॅरिसचा तह झाल्याने क्रिमियन युद्ध संपले.
〉
१९२९: भारत व इंग्लंडदरम्यान हवाई टपालसेवा सुरू झाली.
〉
१९३९: हेइंकेल १०० ह्या सैनिकी विमानाने ७४५ किमी / ताशी वेगाने उडण्याचा विक्रम केला.
〉
१९४४: दुसरे महायुद्ध – दोस्त राष्ट्रांनी सोफिया, बल्गेरिया येथे तुफानी बॉम्बवर्षाव केला.
३० मार्च जन्म
〉
१८५३: डच चित्रकार व्हिन्सेंट व्हॅन गॉग यांचा जन्म. (मृत्यू: २९ जुलै १८९०)
〉
१८९४: इल्युशीन विमान कंपनी चे निर्माते सर्जी इल्युशीन यांचा जन्म. (मृत्यू: ९ फेब्रुवारी १९७७)
〉
१८९५: सोविएत युनियनचे अध्यक्ष निकोलाय बुल्गानिन यांचा जन्म. (मृत्यू: २४ फेब्रुवारी १९७५)
〉
१८९९: बंगाली लेखक शरदेंन्दू बंदोपाध्याय यांचा जन्म. (मृत्यू: २२ सप्टेंबर १९७०)
〉
१९०६: भारतीय भूदलाचे ६ वे सरसेनापती जनरल कोडेन्डेरा सुबय्या तथा के. एस. थिमय्या यांचा जन्म. (मृत्यू: १७ डिसेंबर १९६५)
〉
१९०८: अभिनेत्री देविका राणी यांचा जन्म. (मृत्यू: ९ मार्च १९९४)
〉
१९३८: वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम चे स्थापक क्लाउस स्च्वाब यांचा जन्म.
〉
१९४२: भाषातज्ज्ञ, कोशकार, लेखक आणि कवी वसंत आबाजी डहाके यांचा जन्म.
〉
१९७७: भारतीय संचालक आणि पटकथालेखक अभिषेक चोब्बे यांचा जन्म.
३० मार्च मृत्यू
〉
१९५२: भूतानचे २ रे राजे जिग्मे वांगचुक यांचे निधन.
〉
१९६९: कवी व समाजसेवक वासुदेव गोविंद मायदेव यांचे निधन. (जन्म: २६ जुलै १८९४)
〉
१९७६: चित्रकार रघुवीर मूळगावकर यांचे निधन. (जन्म: १४ नोव्हेंबर १९१८)
〉
१९८१: रीडर्स डॅाजेस्ट चे निर्माते डेविट वलास यांचे निधन. (जन्म: १२ नोव्हेंबर १८८९)
〉
१९८९: सोबत साप्ताहिकाचे संस्थापक, संपादक व साहित्यिक गजानन वासुदेव तथा ग. वा. बेहेरे यांचे निधन. (जन्म: २४ सप्टेंबर १९२२)
〉
२००२: गीतकार आनंद बक्षी यांचे निधन. (जन्म: २१ जुलै १९२०)
〉
२००५: भारतीय लेखक आणि चित्रकार ओ. व्ही. विजयन यांचे निधन. (जन्म: २ जुलै १९३०)
〉
२०१२: कॅनेडियन-भारतीय समाजशास्त्रज्ञ आणि शैक्षणिक अक्विला बेर्लास किंनी यांचे निधन.
मार्च महिन्यातील इतर महत्त्वाच्या आणि विशेष घटना

पहिल्यांदा जागतिक महिला दिन साजरा केला गेला.
दिनांक :
८ मार्च १९११

महात्मा गांधी यांनी मिठाच्या सत्याग्रहासाठी २०० मैलाच्या दांडीयात्रेला सुरवात केली.
दिनांक :
१२ मार्च १९३०

भारतीय क्रांतिकारी भगतसिंग, राजगुरू आणि सुखदेव यांना फाशी देण्यात आली.
दिनांक :
२३ मार्च १९३१

टाटा उद्योग समुहाचे संस्थापक भारतीय उद्योगपती जमशेदजी टाटा यांचा जन्म. (मृत्यू: १९ मे १९०४)
दिनांक :
३ मार्च १८३९

पहिल्या महिला शिक्षिका आणि समाज सुधारक सावित्रीबाई फुले यांचे निधन. (जन्म: ३ जानेवारी १८३१)
दिनांक :
१० मार्च १८९७

आधुनिक मराठी गद्याचे जनक, ग्रंथकार आणि केसरीचे एक संस्थापक विष्णूशास्त्री चिपळूणकर यांचे निधन. (जन्म: २० मे १८५०)
दिनांक :
१७ मार्च १८८२

राष्ट्रीय बाल हक्क संरक्षण अयोग्य स्थापना
दिनांक :
५ मार्च २००७

नियोजन आयोगाची स्थापना
दिनांक :
१५ मार्च १९५०

राष्ट्रीय लसीकरण दिवस
दिनांक :
१६ मार्च १९५५

महार वतन बिल मांडणी
दिनांक :
१९ मार्च १९२८

आंतरराष्ट्रीय वन दिन
दिनांक :
२१ मार्च २०१२

PETA ची स्थापना
दिनांक :
२२ मार्च १९८०

जागतिक क्षय रोग दिन
दिनांक :
२४ मार्च १९६२

६१ वि घटना दुरुस्ती करून मतदाराचे किमान वय २१ वर्षांवरून वरून १८ वर्षांवर वर आणण्यात आले
दिनांक :
२८ मार्च १९८८

क्रिप्स योजना जाहीर
दिनांक :
२९ मार्च १९४२