2 FEBRUARY DINVISHESH: Check all the latest february dinvishesh like birth, death and important events from MahaNMK.com. February Important Events is the special category which may help you in your MPSC / UPSC / Competitive exams.
फेब्रुवारी दिनविशेष : "आता स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करणं झालं सोप्पं" MahaNMK आपल्यासाठी घेऊन आले आहेत Dinvishesh, सर्व महत्वाच्या दिनविशेष आपल्याला एकाच ठिकाणी उपलब्ध करून देण्यासाठी आम्ही हा नवीन उपक्रम राबवला आहे.
महत्वाच्या घटना (2 FEBRUARY)
2 फेब्रुवारी 1848: कॅलिफोर्निया गोल्ड रश – सोने मिळवण्याच्या उद्देशाने चिनी स्थलांतरितांचा पहिला जथा कॅलिफोर्नियात दाखल झाला.
2 फेब्रुवारी 1933: अॅडॉल्फ हिटलरने जर्मनीची संसद बरखास्त केली.
2 फेब्रुवारी 1943: दुसरे महायुद्ध – स्टॅलिनग्राडच्या लढाईनंतर जर्मनीचे सैन्य सोवियेत संघाला शरण, जर्मन सैन्याच्या माघारीची सुरूवात झाली.
2 फेब्रुवारी 1557: गोवा मुक्तीसंग्राम – नानासाहेब गोरे, मधू लिमये, जगन्नाथराव जोशी यांची गोव्यातील तुरूंगातुन मुक्तता.
2 फेब्रुवारी 1962: ४०० वर्षांनंतर नेपच्यून व प्लूटो हे ग्रह एका रेषेत आले.
2 फेब्रुवारी 1971: इराणमधील रामसर येथे पाणथळ भूमीचे महत्त्व या विषयावर एक परिषद आयोजित करण्यात आली होती. मानवी जीवनातील पाणथळ भूमीचे महत्त्व समजावे म्हणून दरवर्षी २ फेब्रुवारी हा दिवस जगभर जागतिक पाणथळ भूमी दिन म्हणून साजरा केला जावा असा त्या परिषदेत निर्णय घेण्यात आला
2 फेब्रुवारी 1971: इदी अमीन हे युगांडाचे सर्वेसर्वा बनले.
जन्म (2 FEBRUARY)
2 फेब्रुवारी 1754: फ्रान्सचे पंतप्रधान चार्ल्स मॉरिस डी टॅलीरॅड यांचा जन्म. (मृत्यू: १७ मे १८३८)
2 फेब्रुवारी 1856: स्वामी दयानंदांचे शिष्य, गुरुकुल विश्वविद्यालयाचे संस्थापक, शिक्षणमहर्षी आणि आर्य समाजाचे प्रसारक स्वामी श्रद्धानंद यांचा जन्म. (मृत्यू: २३ डिसेंबर १९२६)
2 फेब्रुवारी 1884: ज्ञानकोशकार डॉ. श्रीधर व्यंकटेश केतकर यांचा जन्म. (मृत्यू: १० एप्रिल १९३७ – पुणे)
2 फेब्रुवारी 1897: हॉवर्ड जॉन्सन कंपनीचे संस्थापक हॉवर्ड डीरिंग जॉन्सन यांचा जन्म. (मृत्यू: २० जून १९७२)
2 फेब्रुवारी 1905: जन्माने रशियन असलेल्या अमेरिकन लेखिका व तत्त्ववेत्त्या अॅन रँड यांचा जन्म. (मृत्यू: ६ मार्च १९८२)
2 फेब्रुवारी 1922: भारतीय फील्ड हॉकीपटू कुंवर दिग्विजय सिंग यांचा जन्म. (मृत्यू: २७ मार्च १९७८)
2 फेब्रुवारी 1923: केंद्रीय रेल्वे मंत्री, गृह राज्यमंत्री, अर्थ राज्यमंत्री, पहिल्या, दुसर्या व पाचव्या लोकसभेचे सदस्य, राज्यसभा खासदार ललित नारायण मिश्रा यांचा जन्म. (मृत्यू: ३ जानेवारी १९७५ – समस्तीपूर, बिहार)
2 फेब्रुवारी 1979: भिनेत्री शमिता शेट्टी यांचा जन्म.
मृत्यू (2 FEBRUARY)
2 फेब्रुवारी 1907: रशियन रसायनशास्त्रज दिमित्री मेंदेलिएव्ह याचं निधन. (जन्म: ८ फेब्रुवारी १८३४)
2 फेब्रुवारी 1917: लोकमान्य टिळकांचे स्नेही आणि विख्यात वैद्य महर्षी अण्णासाहेब पटवर्धन यांनी देहत्याग केला. (जन्म: ४ मे १८४७)
2 फेब्रुवारी 1930: लेखक, भाषांतरकार, पत्रकार, संपादक, अनुवादक, निबंधकार व कोशकार वासुदेव गोविंद आपटे याचं निधन. (जन्म: १२ एप्रिल १८७१)
2 फेब्रुवारी 1970: ब्रिटिश गणितज्ञ, तत्त्वज्ञ आणि इतिहासकार बर्ट्रांड रसेल याचं निधन. (जन्म: १८ मे १८७२)
2 फेब्रुवारी 1987: स्कॉटिश साहसकथा लेखक अॅलिएस्टर मॅकलिन याचं निधन. (जन्म: २१ एप्रिल १९२२)
2 फेब्रुवारी 2007: हिन्दी चित्रपट आणि टीव्ही अभिनेता विजय अरोरा याचं निधन. (जन्म: २७ डिसेंबर १९४४)
फेब्रुवारी महिन्यातील दिनविशेष
फेब्रुवारी महिन्यातील महत्त्वाच्या आणि विशेष घटना
स्वतंत्र भारताची पहिली जनगणना सुरू.दिनांक : 9 फेब्रुवारी 1951
पुणे विद्यापीठाची स्थापना.दिनांक : 10 फेब्रुवारी 1948
डॉ. सी. व्ही. रामन यांनी भौतिकशास्त्रातील लावलेल्या शोधला रामन इफेक्ट असे नाव देण्यात आले. यामुळे हा दिवस राष्ट्रीय विज्ञान दिन म्हणुन साजरा करण्यात येतो.दिनांक : 28 फेब्रुवारी 1928
संस्कृत विद्वान आणि आर्य समाजाचे संस्थापक मूळशंकर करसनदास तिवारी तथा स्वामी दयानंद सरस्वती यांचा जन्म. (मृत्यू: ३१ ऑक्टोबर १८८३ – अजमेर, राजस्थान)दिनांक : 12 फेब्रुवारी 1824
छत्रपती शिवाजी महाराज यांचा जन्म. (मृत्यू: ३ एप्रिल १६८०)दिनांक : 19 फेब्रुवारी 1630
भारतीय चित्रपटाचे जनक धुंडिराज गोविंद फाळके उर्फ दादासाहेब फाळके यांचे निधन. (जन्म: ३० एप्रिल १८७० – त्र्यंबकेश्वर, नाशिक, महाराष्ट्र)दिनांक : 16 फेब्रुवारी 1944
स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांचे दीर्घ प्रायोपवेशनानंतर निधन. (जन्म: २८ मे १८८३)दिनांक : 26 फेब्रुवारी 1966
विश्व कर्करोग दिनदिनांक : 4 फेब्रुवारी 2000
नीती आयोगाची पहिली बैठकदिनांक : 8 फेब्रुवारी 2015
मराठी राजभाषा दिनदिनांक : 27 फेब्रुवारी 1987