MahaNMK > Dinvishesh > 22 FEBRUARY DINVISHESH

22 FEBRUARY DINVISHESH

22 FEBRUARY DINVISHESH: Check all the latest february dinvishesh like birth, death and important events from MahaNMK.com. February Important Events is the special category which may help you in your MPSC / UPSC / Competitive exams.

फेब्रुवारी दिनविशेष : "आता स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करणं झालं सोप्पं" MahaNMK आपल्यासाठी घेऊन आले आहेत Dinvishesh, सर्व महत्वाच्या दिनविशेष आपल्याला एकाच ठिकाणी उपलब्ध करून देण्यासाठी आम्ही हा नवीन उपक्रम राबवला आहे.


22 FEBRUARY DINVISHESH

महत्वाच्या घटना (22 FEBRUARY)

22 फेब्रुवारी 1819: स्पेनने फ्लोरिडा हा प्रांत अमेरिकेला ५० लाख डॉलरच्या मोबदल्यात विकला.
22 फेब्रुवारी 1942: दुसरे महायुद्ध – फिलिपाईन्समध्ये जपानी सैन्याकडुन पराभव अटळ दिसत असल्यामुळे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष एफ. डी. रूझवेल्ट यांनी जनरल डग्लस मॅकआर्थरला माघार घ्यायचा हुकुम दिला.
22 फेब्रुवारी 1948: झेकोस्लोव्हाकिया मध्ये कम्युनिस्ट क्रांती.
22 फेब्रुवारी 1958: इजिप्त आणि सीरिया या देशांनी एकत्र येऊन युनायटेड अरब प्रजासत्ताक तयार केले.
22 फेब्रुवारी 1978: श्री. यशवंत विष्णू चंद्रचूड यांनी भारताचे १६ वे सरन्यायाधीश म्हणुन कार्यभार सांभाळला.
22 फेब्रुवारी 1979: सेंट लुशिया ला ब्रिटनपासून स्वातंत्र्य मिळाले.

जन्म (22 FEBRUARY)

22 फेब्रुवारी 1732: अमेरिकेचे पहिले राष्ट्राध्यक्ष जॉर्ज वॉशिंग्टन यांचा जन्म. (मृत्यू: १४ डिसेंबर १७९९)
22 फेब्रुवारी 1836: महामहोपाध्याय पण्डित महेशचंद्र न्यायरत्‍न भट्टाचार्य यांचा जन्म. (मृत्यू: १२ एप्रिल १९०६)
22 फेब्रुवारी 1857: जर्मन भौतिकशास्त्रज्ञ हेन्‍रिच हर्ट्‌झ यांचा जन्म. (मृत्यू: १ जानेवारी १८९४)
22 फेब्रुवारी 1857: बालवीर (Scout) चळवळीचे प्रणेते लॉर्ड बेडन पॉवेल यांचा जन्म. (मृत्यू: ८ जानेवारी १९४१)
22 फेब्रुवारी 1902: जर्मन भौतिकशात्रज्ञ फ्रिट्झ स्ट्रासमान यांचा जन्म. (मृत्यू: २२ एप्रिल १९८०)
22 फेब्रुवारी 1920: चरित्र अभिनेता इफ्तिखार यांचा जन्म. (मृत्यू: ४ मार्च १९९५)
22 फेब्रुवारी 1922: व्हायोलिनवादक व्ही. जी. जोग यांचा जन्म. (मृत्यू: ३१ जानेवारी २००४)
22 फेब्रुवारी 1964: मॉर्टल कोमबॅट व्हिडिओ गेमचे निर्माते एड बून यांचा जन्म.
22 फेब्रुवारी 1975: अमेरिकन अभिनेत्री, दिग्दर्शक, निर्माता ड्रिव बॅरीमोर यांचा जन्म

मृत्यू (22 FEBRUARY)

22 फेब्रुवारी 1815: हिरा हा कार्बनच असतो हे प्रयोगावरुन सिद्ध करणारे ब्रिटिश रसायनशास्त्रज्ञ स्मिथसन टेनांट यांचे निधन. (जन्म: ३० नोव्हेंबर १७६१)
22 फेब्रुवारी 1827: चित्रकार, निसर्गवैज्ञानिक व सैनिक चार्ल्स विल्सन पील अमेरिकन यांचे निधन. (जन्म: १५ एप्रिल १७४१)
22 फेब्रुवारी 1925: ज्वरमापीचा (Clinical thermometer) शोध लावणारे इंग्लिश डॉक्टर सर थॉमस क्लिफोर्ड ऑलबट यांचे निधन. (जन्म: २० जुलै १८३६ - ड्युजबरी, यॉर्कशायर, इंग्लंड)
22 फेब्रुवारी 1944: कस्तुरबा गांधी यांचे पुण्यातील आगाखान पॅलेसमधे निधन. (जन्म: ११ एप्रिल १८६९)
22 फेब्रुवारी 1958: स्वातंत्र्यचळवळीतील विद्वान नेते, भारताचे पहिले शिक्षणमंत्री, भारतरत्‍न मौलाना अबूल कलाम आझाद यांचे निधन. (जन्म: ११ नोव्हेंबर १८८८)
22 फेब्रुवारी 1982: ऊर्दू कवी जोश मलिहाबादी यांचे निधन. (जन्म: ५ डिसेंबर १८९४)
22 फेब्रुवारी 2000: लेखक व पत्रकार विनायक सदाशिव तथा वि. स. वाळिंबे यांचे निधन. (जन्म: ११ ऑगस्ट १९२८)
22 फेब्रुवारी 2000: प्रकाशक, श्री विद्या प्रकाशन चे संस्थापक दामोदर दिनकर तथा मधुकाका कुलकर्णी यांचे निधन. (जन्म: २३ ऑक्टोबर १९२३)
22 फेब्रुवारी 2009: लेखक, दिग्दर्शक व प्राध्यापक लक्ष्मण देशपांडे यांचे निधन. (जन्म: ५ डिसेंबर १९४३)

फेब्रुवारी महिन्यातील दिनविशेष

22 FEBRUARY DINVISHESH
सोममंगळबुधगुरुशुक्रशनिरवि
12345
6789101112
13141516171819
20212223242526
2728
22 FEBRUARY DINVISHESH

फेब्रुवारी महिन्यातील महत्त्वाच्या आणि विशेष घटना

स्वतंत्र भारताची पहिली जनगणना सुरू.

दिनांक : 9 फेब्रुवारी 1951

पुणे विद्यापीठाची स्थापना.

दिनांक : 10 फेब्रुवारी 1948

डॉ. सी. व्ही. रामन यांनी भौतिकशास्त्रातील लावलेल्या शोधला रामन इफेक्ट असे नाव देण्यात आले. यामुळे हा दिवस राष्ट्रीय विज्ञान दिन म्हणुन साजरा करण्यात येतो.

दिनांक : 28 फेब्रुवारी 1928

संस्कृत विद्वान आणि आर्य समाजाचे संस्थापक मूळशंकर करसनदास तिवारी तथा स्वामी दयानंद सरस्वती यांचा जन्म. (मृत्यू: ३१ ऑक्टोबर १८८३ – अजमेर, राजस्थान)

दिनांक : 12 फेब्रुवारी 1824

छत्रपती शिवाजी महाराज यांचा जन्म. (मृत्यू: ३ एप्रिल १६८०)

दिनांक : 19 फेब्रुवारी 1630

भारतीय चित्रपटाचे जनक धुंडिराज गोविंद फाळके उर्फ दादासाहेब फाळके यांचे निधन. (जन्म: ३० एप्रिल १८७० – त्र्यंबकेश्वर, नाशिक, महाराष्ट्र)

दिनांक : 16 फेब्रुवारी 1944

स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांचे दीर्घ प्रायोपवेशनानंतर निधन. (जन्म: २८ मे १८८३)

दिनांक : 26 फेब्रुवारी 1966

विश्व कर्करोग दिन

दिनांक : 4 फेब्रुवारी 2000

नीती आयोगाची पहिली बैठक

दिनांक : 8 फेब्रुवारी 2015

मराठी राजभाषा दिन

दिनांक : 27 फेब्रुवारी 1987

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2022 All Rights Reserved.

Made with ❤ in India.