6 FEBRUARY DINVISHESH: Check all the latest february dinvishesh like birth, death and important events from MahaNMK.com. February Important Events is the special category which may help you in your MPSC / UPSC / Competitive exams.
फेब्रुवारी दिनविशेष : "आता स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करणं झालं सोप्पं" MahaNMK आपल्यासाठी घेऊन आले आहेत Dinvishesh, सर्व महत्वाच्या दिनविशेष आपल्याला एकाच ठिकाणी उपलब्ध करून देण्यासाठी आम्ही हा नवीन उपक्रम राबवला आहे.
महत्वाच्या घटना (6 FEBRUARY)
6 फेब्रुवारी 1685: जेम्स (दुसरा) इंग्लंडचा राजा बनला.
6 फेब्रुवारी 1918: ३० वर्षे वयावरील ब्रिटिश महिलांना मतदानाचा अधिकार मिळाला. १९२८ मध्ये हे वय २१ करण्यात आले.
6 फेब्रुवारी 1932: कलकत्ता विद्यापीठाच्या पदवीदान समारंभात छत्री संघाची सदस्य असलेल्या बीना दास या विद्यार्थिनीने बंगालचे राज्यपाल स्टॅन्ले जॅक्सन यांच्यावर गोळया झाडल्या.
6 फेब्रुवारी 1932: प्रभातचा अयोध्येचा राजा हा बोलपट मुंबईच्या कृष्णा या चित्रपटगृहात प्रदर्शित झाला.
6 फेब्रुवारी 1942: दुसरे महायुद्ध – इंग्लंडने थायलँडविरुद्ध युद्ध पुकारले.
6 फेब्रुवारी 1952: इंग्लंडचा राजा जॉर्ज (सहावा) यांचे निधन झाले आणि एलिझाबेथ (दुसरी) गादीवर बसली.
6 फेब्रुवारी 1959: जॅक किल्बी यांनी इंटिग्रेटेड सर्किटसाठी पहिला पेटंट घेतला.
6 फेब्रुवारी 1968: फ्रांसमध्ये ग्रेनोबल येथे दहावे हिवाळी ऑलिंपिक खेळ सुरू.
जन्म (6 FEBRUARY)
6 फेब्रुवारी 1911: अभिनेते आणि अमेरिकेचे ४० वे राष्ट्राध्यक्ष रोनाल्ड रेगन यांचा जन्म. (मृत्यू: ५ जून २००४)
6 फेब्रुवारी 1912: ऍडोल्फ हिटलर यांची सोबतीण एव्हा ब्राउन यांचा जन्म. (मृत्यू: ३० एप्रिल १९४५)
6 फेब्रुवारी 1915: आधुनिक राष्ट्रकवी रामचंद्र नारायण द्विवेदी ऊर्फ कवी प्रदीपरामचंद्र नारायण द्विवेदी ऊर्फ कवी प्रदीप यांचा जन्म. (मृत्यू: ११ डिसेंबर १९९८)
6 फेब्रुवारी 1945: जमैकन संगीतकार बॉब मार्ली यांचा जन्म. (मृत्यू: ११ मे १९८१)
6 फेब्रुवारी 1952: ऑस्ट्रेलियन हॉकीपटू, हॉकी प्रशिक्षक, क्रिकेटपटू आणि राजकारणी डॉ. रिक चार्ल्सवर्थ यांचा जन्म.
6 फेब्रुवारी 1983: क्रिकेटपटू श्रीशांत यांचा जन्म.
मृत्यू (6 FEBRUARY)
6 फेब्रुवारी 1804: इंग्लिश रसायनशास्रज्ञ जोसेफ प्रिस्टले यांचे निधन. (जन्म: १३ मार्च १७३३)
6 फेब्रुवारी 1931: भारतीय स्वातंत्र्यसेनानी, स्वराज्य पक्षाचे संस्थापक सदस्य, कायदेपंडित मोतीलाल गंगाधर नेहरू यांचे निधन. (जन्म: ६ मे १८६१)
6 फेब्रुवारी 1939: बडोद्याचे महाराज सर सयाजीराव गायकवाड (तिसरे) यांचे निधन.(जन्म: १० मार्च १८६३)
6 फेब्रुवारी 1952: इंग्लंडचा राजा जॉर्ज (सहावा) यांचे निधन. (जन्म: १४ डिसेंबर १८९५)
6 फेब्रुवारी 1976: चित्रपट निर्माते आणि पटकथालेखक ऋत्विक घटक यांचे निधन. (जन्म: ४ नोव्हेंबर १९२५)
6 फेब्रुवारी 1993: अमेरिकन टेनिस खेळाडू आर्थर अॅश यांचे निधन. (जन्म: १० जुलै १९४३)
6 फेब्रुवारी 2001: केन्द्रीय नभोवाणी मंत्री व काँग्रेसचे प्रवक्ते बॅ. विठ्ठलराव गाडगीळ यांचे निधन.
फेब्रुवारी महिन्यातील दिनविशेष
फेब्रुवारी महिन्यातील महत्त्वाच्या आणि विशेष घटना
स्वतंत्र भारताची पहिली जनगणना सुरू.दिनांक : 9 फेब्रुवारी 1951
पुणे विद्यापीठाची स्थापना.दिनांक : 10 फेब्रुवारी 1948
डॉ. सी. व्ही. रामन यांनी भौतिकशास्त्रातील लावलेल्या शोधला रामन इफेक्ट असे नाव देण्यात आले. यामुळे हा दिवस राष्ट्रीय विज्ञान दिन म्हणुन साजरा करण्यात येतो.दिनांक : 28 फेब्रुवारी 1928
संस्कृत विद्वान आणि आर्य समाजाचे संस्थापक मूळशंकर करसनदास तिवारी तथा स्वामी दयानंद सरस्वती यांचा जन्म. (मृत्यू: ३१ ऑक्टोबर १८८३ – अजमेर, राजस्थान)दिनांक : 12 फेब्रुवारी 1824
छत्रपती शिवाजी महाराज यांचा जन्म. (मृत्यू: ३ एप्रिल १६८०)दिनांक : 19 फेब्रुवारी 1630
भारतीय चित्रपटाचे जनक धुंडिराज गोविंद फाळके उर्फ दादासाहेब फाळके यांचे निधन. (जन्म: ३० एप्रिल १८७० – त्र्यंबकेश्वर, नाशिक, महाराष्ट्र)दिनांक : 16 फेब्रुवारी 1944
स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांचे दीर्घ प्रायोपवेशनानंतर निधन. (जन्म: २८ मे १८८३)दिनांक : 26 फेब्रुवारी 1966
विश्व कर्करोग दिनदिनांक : 4 फेब्रुवारी 2000
नीती आयोगाची पहिली बैठकदिनांक : 8 फेब्रुवारी 2015
मराठी राजभाषा दिनदिनांक : 27 फेब्रुवारी 1987