23 February Dinvishesh

23 February Dinvishesh (२३ फेब्रुवारी दिनविशेष) For MPSC / UPSC and Any Competitive Exam. You can use following search box to find out more dinvishesh like 23 February 2025 Dinvishesh by just typing day along with the month number. (eg. If you want to search for 15th August then type 15-08).

आपल्या मित्रांना पाठवा :

२३ फेब्रुवारी महत्वाच्या घटना

संपूर्ण दिनविशेष दिनदर्शिकायेथे क्लिक करा आणि लगेच डाऊनलोड करा आपल्या मोबाईल / कॉम्पुटर मध्ये. (75% Discount)
१४५५: पाश्चिमात्य देशातील पहिले छापील पुस्तक गटेनबर्ग बायबल प्रकाशित झाले.
१७३९: चिमाजी अप्पांच्या वसई मोहिमेत मानाजी आंग्रे यांनी रेवदंड्यावर हल्ला चढवला.
१९४१: डॉ. ग्लेन सीबोर्ग यांनी प्लूटोनिअम हे मूलद्रव्य प्रथमच वेगळे केले.
१९४५: दुसरे महायुद्ध – इवो जिमाची लढाई – अमेरिकन नौदलाचे काही सैनिक (मरीन्स) प्रशांत महासागरातील माउंट सुराबाचीवर पोचले व त्यांनी तेथे अमेरिकन झेंडा उभारला. हे करीत असतानाचे त्यांचे छायाचित्र जगप्रसिद्ध झाले.
१९४५: दुसरे महायुद्ध – अमेरिकन सैन्याने फिलिपाईन्सची राजधानी मनिला जपानी सैन्यापासून मुक्त केली.
१९४५: दुसरे महायुद्ध – पोलंडच्या पोझ्नान शहरात जर्मन सैन्याने शरणागती पत्करली.
१९४५: दुसरे महायुद्ध – रॉयल एअर फोर्सच्या विमानांनी जर्मनीतील फोर्झेम शहर बेचिराख केले.
१९४७: आंतरराष्ट्रीय मानक संस्थेची (ISO) स्थापना.
१९५२: संसदेने कामगार भविष्य निर्वाह निधी विधेयक मंजूर केले.
१९६६: सीरियात लष्करी उठाव झाला.
१९९६: कोकण रेल्वेच्या चिपळूण – खेड टप्प्यातील वाहतूकीचा शुभारंभ झाला.
१९९७: रशियाच्या मीर या अंतराळस्थानकामधे आग लागली.
२०००: संस्कृत पंडित रा. ना. दांडेकर आणि काश्मिरी कवी रेहमान राही यांना साहित्य अकादमीची फेलोशिप जाहीर.
२०१२: इराक - देशात झालेल्या हल्ल्यांच्या मालिकेत किमान ८३ लोकांचे निधन तर २५० हून अधिक जखमी झाले.
१९५४: पोलिओ - अमेरिकेतील पिट्सबर्गमध्ये साल्क लसीने पोलिओविरूद्ध मुलांचे पहिले सामूहिक लसीकरण सुरू झाले.
१९०५: रोटरी इंटरनॅशनल - अमेरिकन वकील पॉल हॅरिस आणि इतर तीन व्यावसायिक दुपारच्या जेवणासाठी भेटले तेव्हा रोटरी क्लब, जगातील पहिला सेवा क्लब स्थापन झाला.
१९०५: रोटरी इंटरनॅशनल - स्थापना.
१९०३: ग्वांटानामो बे - क्युबा देशाने 'ग्वांटानामो बे' प्रदेश अमेरिकेला शाश्वत भाड्याने दिला.
१८८७: फ्रांस - देशातील फ्रेंच रिव्हिएरा प्रांतात मोठा भूकंप, या दुर्घटनेत किमान २००० लोकांचे निधन.

२३ फेब्रुवारी जन्म

संपूर्ण दिनविशेष दिनदर्शिकायेथे क्लिक करा आणि लगेच डाऊनलोड करा आपल्या मोबाईल / कॉम्पुटर मध्ये. (75% Discount)
१६३३: विख्यात इंग्रजी रोजनिशीकार व कुशल प्रशासक सॅम्युअल पेपिस यांचा जन्म. (मृत्यू: २६ मे १७०३)
१८५०: रिट्झ हॉटेल, लंडन आणि रिट्झ हॉटेल, पॅरिस चे निर्माते सीझर रिट्झ यांचा जन्म. (मृत्यू: २४ ऑक्टोबर १९१४ )
१८७६: देबुजी झिंगराजी जानोरकर ऊर्फ संत गाडगे महाराज यांचा जन्म. (मृत्यू: २० डिसेंबर १९५६)
१९१३: जादूगार प्रफुल्लचंद्र तथा पी. सी. सरकार यांचा जन्म. (मृत्यू: ६ जानेवारी १९७१)
१९५७: तेलगु देसम पक्षाचे लोकसभेतील नेते येरेन नायडू यांचा जन्म. (मृत्यू: २ नोव्हेंबर २०१२)
१९६५: झेकोस्लोव्हाकियाची टेनिस खेळाडू हेलेना सुकोव्हा यांचा जन्म.
१९६५: मुंबईच्या आतंकवादी हल्ल्यात शहीद झालेले पोलिस कमिशनर अशोक कामटे यांचा जन्म. (मृत्यू: २६ नोव्हेंबर २००८)
१९६९: अमेरिकन फॅशन डिझायनर, FUBU कंपनीचे संस्थापक - डेमंड जॉन
१९५४: युक्रेन देशाचे ३रे राष्ट्राध्यक्ष - व्हिक्टर युश्चेन्को
१९४९: मार्क गार्न्यु - पहिले कॅनेडियन अंतराळवीर, राजकारणी
१९२४: दक्षिण आफ्रिकन-अमेरिकन भौतिकशास्त्रज्ञ - नोबेल पारितोषिक - ऍलन मॅक्लिओड कॉर्मॅक (मृत्यू : ७ मे १९९८)
१९२३: ग्रीस देशाचे १७६वे पंतप्रधान - इओनिस ग्रीवास (मृत्यू : २७ नोव्हेंबर २०१६)
१९२३: उरुग्वे देशाचे अध्यक्ष - राफेल एडिएगो ब्रुनो (मृत्यू : २० फेब्रुवारी २०१४)
१९०८: ऑस्ट्रेलिया देशाचे २०वे पंतप्रधान - विल्यम मॅकमोहन (मृत्यू : ३१ मार्च १९८८)
१८७४: एस्टोनिया देशाचे पहिले अध्यक्ष - कॉन्स्टँटिन पॅट्स (मृत्यू : १८ जानेवारी १९५६)
१८५२: व्हिएतनामी सम्राट - डक डक (मृत्यू : ६ ऑक्टोबर १८८३)
१४४३: हंगेरी आणि क्रोएशियाचे राजा - मॅथियास कॉर्विनस (मृत्यू : ६ एप्रिल १४९०)

२३ फेब्रुवारी मृत्यू

संपूर्ण दिनविशेष दिनदर्शिकायेथे क्लिक करा आणि लगेच डाऊनलोड करा आपल्या मोबाईल / कॉम्पुटर मध्ये. (75% Discount)
१७७७: जर्मन गणितज्ञ आणि भौतिकशास्त्रज्ञ कार्ल फ्रेड्रिक गाऊस यांचे निधन. (जन्म: ३० एप्रिल १७७७)
१७९२: ब्रिटिश चित्रकार व रॉयल अ‍ॅकॅडमीचे पहिले अध्यक्ष सर जोशुआ रेनॉल्ड्स यांचे निधन. (जन्म: १६ जुलै १७२३ – प्लिम्प्टन, प्लायमाऊथ, इंग्लंड)
१९०४: होमिओपॅथ, समाजसुधारक व विज्ञानप्रसारक महेन्द्र लाल सरकार यांचे निधन. (जन्म: २ नोव्हेंबर १८३३ – पैकपारा, हावडा, पश्चिम बंगाल)
१९४४: अमेरिकन रसायनशास्त्रज्ञ लिओ हेन्ड्रिक आर्थर बेकेलँड यांचे निधन. (जन्म: १४ नोव्हेंबर १८६३ – घेन्ट, बेल्जिअम)
१९६९: चित्रपट अभिनेत्री मुमताज जहाँ बेगम देहलवी ऊर्फ मधुबाला यांचे निधन. (जन्म: १४ फेब्रुवारी १९३३ – नवी दिल्ली)
१९९८: क्रिकेटपटू रमण लांबा यांचे निधन. (जन्म: २ जानेवारी १९६०)
२०००: वेदशास्त्राचे गाढे अभ्यासक वासुदेवशास्त्री धुंडिराज तांबे यांचे निधन.
२००४: केन्द्रीय परराष्ट्रमंत्री सिकंदर बख्त यांचे निधन. (जन्म: २१ ऑगस्ट १९१८)
२००४: हिन्दी चित्रपट निर्माते व दिग्दर्शक विजय आनंद यांचे निधन. (जन्म: २२ जानेवारी १९३४)
२०११: सहज योग च्या संस्थापिका आणि अध्यात्म गुरु निर्मला श्रीवास्तव यांचे निधन. (जन्म: ३० एप्रिल १९२३)
२०१३: भारतीय वकील आणि शैक्षणिक - लोटिका सरकार (जन्म: ४ जानेवारी १९२३)
२००९: नॉर्वेजियन वास्तुविशारद, हेडमार्क संग्रहालयाचे रचनाकार - स्वेररे फेहन (जन्म: १४ ऑगस्ट १९२४)
२००८: स्लोव्हेनिया देशाचे २रे अध्यक्ष - जेनेझ ड्रनोव्हसेक (जन्म: १७ मे १९५०)
२००६: कॅनेडियन प्रसारक, मचमुसिक कंपनीचे सहसंस्थापक - जॉन मार्टिन
१९९०: एल साल्वाडोर देशाचे अध्यक्ष - जोस नेपोलियन दुआर्टे (जन्म: २३ नोव्हेंबर १९२५)
१९७३: अमेरिकन डॉक्टर आणि फिजिओलॉजिस्ट - नोबेल पारितोषिक - डिकिन्सन डब्ल्यू. रिचर्ड्स (जन्म: ३० ऑक्टोबर १८९५)
१९६९: सौदी अरेबिया देशाचे २रे राजा - सौद बिन अब्दुलाझीझ अल सौद (जन्म: १५ जानेवारी १९०२)
१९३३: इंग्लिश चित्रपट प्रणेते, युनिव्हर्सल स्टुडिओचे सहसंस्थापक - डेव्हिड होर्सले (जन्म: ११ मार्च १८७३)
१८७९: प्रुशिया देशाचे १०वे मंत्री-राष्ट्राध्यक्ष - अल्ब्रेक्ट वॉन रून (जन्म: ३० एप्रिल १८०३)
१८४८: अमेरिका देशाचे ६वे राष्ट्राध्यक्ष - जॉन क्विन्सी ऍडम्स (जन्म: ११ जुलै १७६७)
१७८१: युनायटेड स्टेट्स ऑफ अमेरिकेचे संस्थापक - जॉर्ज टेलर

फेब्रुवारी महिन्यातील महत्त्वाच्या आणि विशेष घटना

NMK

दिनांक : ९ फेब्रुवारी १९५१

NMK

दिनांक : १० फेब्रुवारी १९४८

NMK

दिनांक : २८ फेब्रुवारी १९२८

NMK

दिनांक : १२ फेब्रुवारी १८२४

NMK

दिनांक : १९ फेब्रुवारी १६३०

NMK

दिनांक : १६ फेब्रुवारी १९४४

NMK

दिनांक : २६ फेब्रुवारी १९६६

NMK

दिनांक : ४ फेब्रुवारी २०००

NMK

दिनांक : ८ फेब्रुवारी २०१५

NMK

दिनांक : २७ फेब्रुवारी १९८७

आपल्या मित्रांना पाठवा :
Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.