MahaNMK > Dinvishesh > 5 FEBRUARY DINVISHESH

5 FEBRUARY DINVISHESH

5 FEBRUARY DINVISHESH: Check all the latest february dinvishesh like birth, death and important events from MahaNMK.com. February Important Events is the special category which may help you in your MPSC / UPSC / Competitive exams.

फेब्रुवारी दिनविशेष : "आता स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करणं झालं सोप्पं" MahaNMK आपल्यासाठी घेऊन आले आहेत Dinvishesh, सर्व महत्वाच्या दिनविशेष आपल्याला एकाच ठिकाणी उपलब्ध करून देण्यासाठी आम्ही हा नवीन उपक्रम राबवला आहे.


5 FEBRUARY DINVISHESH

महत्वाच्या घटना (5 FEBRUARY)

5 फेब्रुवारी 1294: अल्लाउद्दीन खिलजीने देवगिरी किल्ला सर केला आणि देवगिरीच्या यादव साम्राज्याचा अस्त झाला.
5 फेब्रुवारी 1670: सिंहगड ताब्यात मिळवण्यासाठी नरवीर तानाजी मालुसरे यांनी प्राणाची आहुती दिली.
5 फेब्रुवारी 1766: माधवराव पेशवे आणि हैदराबदचा निजाम यांची कुरुमखेड येथे भेट.
5 फेब्रुवारी 1919: चार्ली चॅप्लिनने इतर तीन जणांबरोबर युनायटेड आर्टिस्ट्स कंपनीची स्थापना केली.
5 फेब्रुवारी 1922: रीडर्स डायजेस्टचा पहिला अंक प्रसिद्ध झाला.
5 फेब्रुवारी 1945: दुसरे महायुद्ध – जनरल डग्लस मॅकआर्थर मनिला येथे परतले.
5 फेब्रुवारी 1948: गांधी वधानंतर स्वातंत्र्यवीर सावरकर यांना सुरक्षा-निर्बंधान्वये अटक झाली.
5 फेब्रुवारी 1952: स्वतंत्र भारतात प्रथमच सार्वत्रिक निवडणुका झाल्या.
5 फेब्रुवारी 1958: ७,६०० पौंडाचा एक हायड्रोजन बॉम्ब अमेरिकेच्या वायुसेनेने टायबी बेटांजवळ हरवला. हा बॉम्ब अमेरिकेने कायमचे हरवलेल्या चार आण्विक हत्यारांपैकी एक आहे.
5 फेब्रुवारी 1962: फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष चार्ल्स डी गॉल यांनी अल्जेरियाला स्वातंत्र्य द्यावे असे आवाहन केले.
5 फेब्रुवारी 2003: भारताने २००२ मध्ये सोडलेल्या पीएसएलव्ही सी-४ या हवामानविषयक उपग्रहाला अंतराळवीर कल्पना चावला यांचे नाव देण्यात आल्याची पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांची घोषणा.
5 फेब्रुवारी 2004: पुण्याची स्वाती घाटे बुद्धिबळातील वूमन ग्रँडमास्टर झाली.

जन्म (5 FEBRUARY)

5 फेब्रुवारी 1788: युनायटेड किंग्डमचे पंतप्रधान रॉबर्ट पील यांचा जन्म.
5 फेब्रुवारी 1840: डनलप रबर चे सहसंस्थापक जॉन बॉईड डनलप यांचा जन्म. (मृत्यू: २३ ऑक्टोबर १९२१)
5 फेब्रुवारी 1905: स्वातंत्र्यसैनिक, ४२ च्या चळवळीतील अग्रणी नेते, भारतीय समाजवादी पक्षाचे एक संस्थापक, विचारवंत, तत्त्वचिंतक व सामाजिक कार्यकर्ते अच्युतराव पटवर्धन यांचा जन्म. (मृत्यू: ५ ऑगस्ट १९९२)
5 फेब्रुवारी 1914: प्राचीन मराठी भाषेचे गाढे व्यासंगी, संत वाङ्‌मयाचे अभ्यासक व संशोधक, पुणे विद्यापीठाच्या मराठी विभागाचे प्रमुख शंकर गोपाळ तथा शं. गो. तुळपुळे यांचा जन्म. (मृत्यू: ३० ऑगस्ट १९९४)
5 फेब्रुवारी 1933: लेखिका आणि कथाकथनकार गिरीजा कीर यांचा जन्म.
5 फेब्रुवारी 1936: कीर्तनकार बाबा महाराज सातारकर यांचा जन्म.
5 फेब्रुवारी 1976: अभिनेता अभिषेक बच्‍चन यांचा जन्म.

मृत्यू (5 FEBRUARY)

5 फेब्रुवारी 1920: आळंदी येथील वारकरी शिक्षणसंस्थेचे संस्थापक, कीर्तनकार, प्रवचनकार आणि लेखक विष्णू नरसिंह जोग यांनी समाधि घेतली. (जन्म: १४ सप्टेंबर १८६७)
5 फेब्रुवारी 1927: हिन्दुस्थानी शास्त्रीय गायक हजरत इनायत खाँ यांचे निधन. (जन्म: ५ जुलै १८८२)
5 फेब्रुवारी 2000: गायिका कालिंदी केसकर यांचे निधन.
5 फेब्रुवारी 2003: ज्येष्ठ गांधीवादी विचारवंत व महात्मा गांधींच्या हरिजन या मराठी अंकाचे संपादक गणेश गद्रे यांचे निधन.
5 फेब्रुवारी 2008: योग गुरू महर्षी महेश योगी यांचे निधन. (जन्म: १२ जानेवारी १९१७)
5 फेब्रुवारी 2010: चित्रपट अभिनेता व निर्माता सुजित कुमार यांचे निधन. (जन्म: ७ फेब्रुवारी १९३४)

फेब्रुवारी महिन्यातील दिनविशेष

5 FEBRUARY DINVISHESH
सोममंगळबुधगुरुशुक्रशनिरवि
12345
6789101112
13141516171819
20212223242526
2728
5 FEBRUARY DINVISHESH

फेब्रुवारी महिन्यातील महत्त्वाच्या आणि विशेष घटना

स्वतंत्र भारताची पहिली जनगणना सुरू.

दिनांक : 9 फेब्रुवारी 1951

पुणे विद्यापीठाची स्थापना.

दिनांक : 10 फेब्रुवारी 1948

डॉ. सी. व्ही. रामन यांनी भौतिकशास्त्रातील लावलेल्या शोधला रामन इफेक्ट असे नाव देण्यात आले. यामुळे हा दिवस राष्ट्रीय विज्ञान दिन म्हणुन साजरा करण्यात येतो.

दिनांक : 28 फेब्रुवारी 1928

संस्कृत विद्वान आणि आर्य समाजाचे संस्थापक मूळशंकर करसनदास तिवारी तथा स्वामी दयानंद सरस्वती यांचा जन्म. (मृत्यू: ३१ ऑक्टोबर १८८३ – अजमेर, राजस्थान)

दिनांक : 12 फेब्रुवारी 1824

छत्रपती शिवाजी महाराज यांचा जन्म. (मृत्यू: ३ एप्रिल १६८०)

दिनांक : 19 फेब्रुवारी 1630

भारतीय चित्रपटाचे जनक धुंडिराज गोविंद फाळके उर्फ दादासाहेब फाळके यांचे निधन. (जन्म: ३० एप्रिल १८७० – त्र्यंबकेश्वर, नाशिक, महाराष्ट्र)

दिनांक : 16 फेब्रुवारी 1944

स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांचे दीर्घ प्रायोपवेशनानंतर निधन. (जन्म: २८ मे १८८३)

दिनांक : 26 फेब्रुवारी 1966

विश्व कर्करोग दिन

दिनांक : 4 फेब्रुवारी 2000

नीती आयोगाची पहिली बैठक

दिनांक : 8 फेब्रुवारी 2015

मराठी राजभाषा दिन

दिनांक : 27 फेब्रुवारी 1987

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2022 All Rights Reserved.

Made with ❤ in India.