19 FEBRUARY DINVISHESH: Check all the latest february dinvishesh like birth, death and important events from MahaNMK.com. February Important Events is the special category which may help you in your MPSC / UPSC / Competitive exams.
फेब्रुवारी दिनविशेष : "आता स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करणं झालं सोप्पं" MahaNMK आपल्यासाठी घेऊन आले आहेत Dinvishesh, सर्व महत्वाच्या दिनविशेष आपल्याला एकाच ठिकाणी उपलब्ध करून देण्यासाठी आम्ही हा नवीन उपक्रम राबवला आहे.
महत्वाच्या घटना (19 FEBRUARY)
19 फेब्रुवारी 1878: थॉमस एडिसन यांनी फोनोग्राफचे पेटंट घेतले.
19 फेब्रुवारी 1884: यू. एस. ए. च्या दक्षिण भागाला ६० चक्रीवादळांनी तडाखा दिला.
19 फेब्रुवारी 1942: पर्ल हार्बरच्या हल्ल्यानंतर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष रुझव्हेल्ट यांनी जपानी वंशाच्या अमेरिकन नागरिकांना बंदिवासात ठेवण्याच्या आदेशावर सह्या केल्या.
19 फेब्रुवारी 2003: तंबाखू उत्पादनांच्या जाहिरातींवर संपूर्णपणे बंदी घालण्याच्या विधेयकाला केंद्रीय मंत्रीमंडळाने मंजुरी दिली.
जन्म (19 FEBRUARY)
19 फेब्रुवारी 1473: सूर्यकेन्द्री विश्वाच्या संकल्पनेचा सिद्धांत मांडणारा पोलिश खगोलशास्त्रज्ञ आणि गणितज्ञ निकोलस कोपर्निकस यांचा जन्म. (मृत्यू: २४ मे १५४३)
19 फेब्रुवारी 1630: छत्रपती शिवाजी महाराज यांचा जन्म. (मृत्यू: ३ एप्रिल १६८०)
19 फेब्रुवारी 1859: स्वीडीश भौतिक व रसायनशास्त्रज स्वांते अर्हेनिअस यांचा जन्म. (मृत्यू: २ ऑक्टोबर १९२७)
19 फेब्रुवारी 1899: गुजरातचे दुसरे मुख्यमंत्री बळवंतराय मेहता यांचा जन्म.
19 फेब्रुवारी 1906: राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे दुसरे सरसंघचालक माधव सदाशिव गोळवलकर तथा श्री गुरूजी यांचा जन्म. (मृत्यू: ५ जून १९७३)
19 फेब्रुवारी 1919: मराठी नवकथेचे जनक अरविंद गोखले यांचा जन्म. (मृत्यू: २४ ऑक्टोबर १९९२)
19 फेब्रुवारी 1922: पंजाबचे मुख्यमंत्री सरदार बियंत सिंग यांचा जन्म. (मृत्यू: ३१ ऑगस्ट १९९५)
19 फेब्रुवारी 1962: झेकोस्लोव्हाकियाची टेनिस खेळाडू हॅना मंडलिकोव्हा यांचा जन्म.
मृत्यू (19 FEBRUARY)
19 फेब्रुवारी 1818: पेशव्यांचे अखेरचे सरसेनापती सरदार बापू गोखले यांचे आष्टी येथे निधन.
19 फेब्रुवारी 1915: थोर समाजसेवक, काँग्रेसचे अध्यक्ष, संसदपटू, भारत सेवक समाजाचे (Servants of India Society) संस्थापक नामदार गोपाळ कृष्ण गोखले यांचे निधन. (जन्म: ९ मे १८६६)
19 फेब्रुवारी 1956: प्रजा समाजवादी पक्षाचे नेते, लखनौ विद्यापीठाचे कुलगुरू आचार्य नरेन्द्र देव यांचे निधन.
19 फेब्रुवारी 1956: ज्योतिर्गणितज्ञ, संशोधक आणि बुद्धीप्रामाण्यवादी विचारवंत केशव लक्ष्मण दफ्तरी यांचे निधन. (जन्म: २२ नोव्हेंबर १८८०)
19 फेब्रुवारी 1978: गायक व संगीतकार पंकज मलिक यांचे निधन. (जन्म: १० मे १९०५)
19 फेब्रुवारी 1997: संगीतकार राम कदम यांचे निधन. (जन्म: २८ ऑगस्ट १९१८)
19 फेब्रुवारी 1997: सुधारणावादी चिनी नेते डेंग जियाओ पिंग यांचे निधन. (जन्म: २२ ऑगस्ट १९०४)
19 फेब्रुवारी 2003: पौराणिक हिन्दी व मराठी चित्रपट अभिनेते अनंत मराठे यांचे निधन.
फेब्रुवारी महिन्यातील दिनविशेष
फेब्रुवारी महिन्यातील महत्त्वाच्या आणि विशेष घटना
स्वतंत्र भारताची पहिली जनगणना सुरू.दिनांक : 9 फेब्रुवारी 1951
पुणे विद्यापीठाची स्थापना.दिनांक : 10 फेब्रुवारी 1948
डॉ. सी. व्ही. रामन यांनी भौतिकशास्त्रातील लावलेल्या शोधला रामन इफेक्ट असे नाव देण्यात आले. यामुळे हा दिवस राष्ट्रीय विज्ञान दिन म्हणुन साजरा करण्यात येतो.दिनांक : 28 फेब्रुवारी 1928
संस्कृत विद्वान आणि आर्य समाजाचे संस्थापक मूळशंकर करसनदास तिवारी तथा स्वामी दयानंद सरस्वती यांचा जन्म. (मृत्यू: ३१ ऑक्टोबर १८८३ – अजमेर, राजस्थान)दिनांक : 12 फेब्रुवारी 1824
छत्रपती शिवाजी महाराज यांचा जन्म. (मृत्यू: ३ एप्रिल १६८०)दिनांक : 19 फेब्रुवारी 1630
भारतीय चित्रपटाचे जनक धुंडिराज गोविंद फाळके उर्फ दादासाहेब फाळके यांचे निधन. (जन्म: ३० एप्रिल १८७० – त्र्यंबकेश्वर, नाशिक, महाराष्ट्र)दिनांक : 16 फेब्रुवारी 1944
स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांचे दीर्घ प्रायोपवेशनानंतर निधन. (जन्म: २८ मे १८८३)दिनांक : 26 फेब्रुवारी 1966
विश्व कर्करोग दिनदिनांक : 4 फेब्रुवारी 2000
नीती आयोगाची पहिली बैठकदिनांक : 8 फेब्रुवारी 2015
मराठी राजभाषा दिनदिनांक : 27 फेब्रुवारी 1987