8 FEBRUARY DINVISHESH: Check all the latest february dinvishesh like birth, death and important events from MahaNMK.com. February Important Events is the special category which may help you in your MPSC / UPSC / Competitive exams.
फेब्रुवारी दिनविशेष : "आता स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करणं झालं सोप्पं" MahaNMK आपल्यासाठी घेऊन आले आहेत Dinvishesh, सर्व महत्वाच्या दिनविशेष आपल्याला एकाच ठिकाणी उपलब्ध करून देण्यासाठी आम्ही हा नवीन उपक्रम राबवला आहे.

महत्वाच्या घटना (8 FEBRUARY)
8 फेब्रुवारी 1714: छत्रपती शाहू महाराज (सातारा गादी) आणि सरखेल कान्होजी आंग्रे यांच्यात वळवंड (लोणावळा) येथे तह झाला.
8 फेब्रुवारी 1849: रोमन प्रजासत्ताकची रचना करण्यात आली.
8 फेब्रुवारी 1899: रँडचा खून करण्यार्या चाफेकर बंधूंची नावे इंग्रज सरकारला सांगणार्या गणेश शंकर द्रविड व रामचंद्र शंकर द्रविड या बंधूंचा वासुदेव चाफेकर आणि महादेव रानडे यांनी गोळ्या झाडून वध केला.
8 फेब्रुवारी 1931: महादेव विठ्ठल काळे यांनी आत्मोद्धार नावाचे पाक्षिक सुरू केले.
8 फेब्रुवारी 1936: १६ सप्टेंबर १९३५ रोजी नोंदणी झालेल्या बँक ऑफ महाराष्ट्र चे कामकाज सुरू झाले.
8 फेब्रुवारी 1942: दुसरे महायुद्ध – जपानने सिंगापूर ताब्यात घेतले.
8 फेब्रुवारी 1960: पंजाबच्या खडकसिंह या मल्लाविरुद्ध गुणांवर विजय मिळवून गणपत आंदळकर हिंदकेसरी बनले.
8 फेब्रुवारी 1971: NASDAQ हा अमेरिकन शेअर बाजाराचा निर्देशांक सुरू झाला.
8 फेब्रुवारी 1994: भारतीय गोलंदाज कपिलदेव निखंज यांनी ४३२ बळींचा जागतिक विक्रम केला.
8 फेब्रुवारी 2000: छत्रपती शिवाजी महाराज जयंती १९ फेब्रुवारीस करण्याचा महाराष्ट्र शासनाचा निर्णय.
8 फेब्रुवारी 2015: नीती आयोगाची पहिली बैठक
जन्म (8 FEBRUARY)
8 फेब्रुवारी 1677: फ्रेन्च खगोलशास्त्रज्ञ जॅक्स कॅसिनी यांचा जन्म. (मृत्यू: १६ एप्रिल १७५६)
8 फेब्रुवारी 1700: डच गणितज्ञ डॅनियल बर्नोली यांचा जन्म. (मृत्यू: १७ मार्च १७८२)
8 फेब्रुवारी 1828: फ्रेन्च लेखक ज्यूल्स वर्न यांचा जन्म. (मृत्यू: २४ मार्च १९०५)
8 फेब्रुवारी 1834: रशियन रसायनशास्त्रज्ञ दिमित्री मेंदेलिएव्ह यांचा जन्म. (मृत्यू: २ फेब्रुवारी १९०७)
8 फेब्रुवारी 1844: भाषांतरकार गोविंद शंकरशास्त्री बापट यांचा जन्म.
8 फेब्रुवारी 1897: भारताचे ३ रे राष्ट्रपती, शिक्षणतज्ञ. पद्मविभूषण व भारतरत्न डॉ. झाकिर हुसेन यांचा जन्म. (मृत्यू: ३ मे १९६९)
8 फेब्रुवारी 1909: तत्त्वज्ञानाचे प्राध्यापक, श्रीब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराजांचे शिष्य प्रा. केशव विष्णू तथा बाबा बेलसरे यांचा जन्म. (मृत्यू: ३ जानेवारी १९९८)
8 फेब्रुवारी 1925: शास्त्रीय गायिका शोभा गुर्टू यांचा जन्म. (मृत्यू: २७ सप्टेंबर २००४)
8 फेब्रुवारी 1941: गझलगायक जगजीतसिंग यांचा जन्म. (मृत्यू: १० ऑक्टोबर २०११)
8 फेब्रुवारी 1963: भारतीय क्रिकेटपटू मोहम्मद अजहरुद्दीन यांचा जन्म.
8 फेब्रुवारी 1963: भारतीय क्रिकेटपटू मोहम्मद अजहरुद्दीन यांचा जन्म.
मृत्यू (8 FEBRUARY)
8 फेब्रुवारी 1725: रशियाचा झार पीटर द ग्रेट (पहिला) यांचे निधन. (जन्म: ९ जून १६७२)
8 फेब्रुवारी 1927: ग्वाल्हेर घराण्याचे शास्त्रीय गायक बाळकृष्णबुवा इचलकरंजीकर यांचे निधन. (जन्म: ७ सप्टेंबर १८४९)
8 फेब्रुवारी 1971: मुंबईचे पहिले गृहमंत्री, हैदराबाद संस्थानात भारत सरकारचे एंजट जनरल, नामवंत साहित्यिक आणि भारतीय विद्याभवन चे संस्थापक डॉ. कन्हैय्यालाल मुन्शी यांचे निधन. (जन्म: ३० डिसेंबर १८८७)
8 फेब्रुवारी 1975: नोबेल पारितोषिक विजेते वनस्पतिज रंग व अल्कलॉईड्सवर संशोधन करणारे ब्रिटिश रसायनशास्त्रज्ञ सर रॉबर्ट रॉबिनसन यांचे निधन. (जन्म: १३ सप्टेंबर १८८६)
8 फेब्रुवारी 1994: ख्यातनाम चित्रकार गोपाळराव देऊसकर यांचे निधन.
8 फेब्रुवारी 1994: कवी, कोशकार, इतिहास संशोधक, इतिहास लेखक, शाहिरी वाङ्मयाचे संग्राहक, संपादक व प्रकाशक यशवंत नरसिंह केळकर यांचे निधन. (जन्म: १९ जुलै १९०२)
8 फेब्रुवारी 1995: भारताचे माजी नौदलप्रमुख, व्हाईस अॅडमिरल भास्करराव सोमण यांचे निधन.
8 फेब्रुवारी 1999: आनंदग्रामच्या संस्थापिका व थोर समाजसेविका डॉ. इंदुताई पटवर्धन यांचे निधन. (जन्म: १४ मे १९२६)
फेब्रुवारी महिन्यातील दिनविशेष
फेब्रुवारी महिन्यातील महत्त्वाच्या आणि विशेष घटना
स्वतंत्र भारताची पहिली जनगणना सुरू.दिनांक : 9 फेब्रुवारी 1951
पुणे विद्यापीठाची स्थापना.दिनांक : 10 फेब्रुवारी 1948
डॉ. सी. व्ही. रामन यांनी भौतिकशास्त्रातील लावलेल्या शोधला रामन इफेक्ट असे नाव देण्यात आले. यामुळे हा दिवस राष्ट्रीय विज्ञान दिन म्हणुन साजरा करण्यात येतो.दिनांक : 28 फेब्रुवारी 1928
संस्कृत विद्वान आणि आर्य समाजाचे संस्थापक मूळशंकर करसनदास तिवारी तथा स्वामी दयानंद सरस्वती यांचा जन्म. (मृत्यू: ३१ ऑक्टोबर १८८३ – अजमेर, राजस्थान)दिनांक : 12 फेब्रुवारी 1824
छत्रपती शिवाजी महाराज यांचा जन्म. (मृत्यू: ३ एप्रिल १६८०)दिनांक : 19 फेब्रुवारी 1630
भारतीय चित्रपटाचे जनक धुंडिराज गोविंद फाळके उर्फ दादासाहेब फाळके यांचे निधन. (जन्म: ३० एप्रिल १८७० – त्र्यंबकेश्वर, नाशिक, महाराष्ट्र)दिनांक : 16 फेब्रुवारी 1944
स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांचे दीर्घ प्रायोपवेशनानंतर निधन. (जन्म: २८ मे १८८३)दिनांक : 26 फेब्रुवारी 1966
विश्व कर्करोग दिनदिनांक : 4 फेब्रुवारी 2000
नीती आयोगाची पहिली बैठकदिनांक : 8 फेब्रुवारी 2015
मराठी राजभाषा दिनदिनांक : 27 फेब्रुवारी 1987