27 MARCH DINVISHESH: Check all the latest march dinvishesh like birth, death and important events from MahaNMK.com. March Important Events is the special category which may help you in your MPSC / UPSC / Competitive exams.
मार्च दिनविशेष : "आता स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करणं झालं सोप्पं" MahaNMK आपल्यासाठी घेऊन आले आहेत Dinvishesh, सर्व महत्वाच्या दिनविशेष आपल्याला एकाच ठिकाणी उपलब्ध करून देण्यासाठी आम्ही हा नवीन उपक्रम राबवला आहे.
महत्वाच्या घटना (27 MARCH)
27 मार्च 1667: शिवरायांना सोडुन गेलेल्या नेताजी पालकरचे औरंगजेबाने धर्मांतर केले व यांचे नाव महंमद कुली खान ठेवले.
27 मार्च 1794: अमेरिकन नौदलाची स्थापना झाली.
27 मार्च 1854: क्रिमियन युद्ध – इंग्लडने रशियाविरुद्ध युद्ध पुकारले.
27 मार्च 1958: निकीता क्रुश्चेव्ह सोविएत रशियाचे अध्यक्ष झाले.
27 मार्च 1966: २० मार्च रोजी चोरीला गेलेला फुटबॉलचा विश्वचषक दक्षिण लंडनमधील एका बागेत पिकल्स नावाच्या कुत्र्याला सापडला. त्यानंतर हा चषक १९८३ मधे पुन्हा चोरीला गेला, तो आजतागायत सापडलेला नाही.
27 मार्च 1977: तेनेरिफ द्वीपावरील धावपट्टीवर पॅन अॅम आणि के. एल. एम. या दोन बोईंग ७४७ प्रकारच्या विमानांची टक्कर होऊन ५८३ जण ठार झाले.
27 मार्च 1992: पंडित भीमसेन जोशी यांना मध्य प्रदेश सरकारचा तानसेन पुरस्कार प्रदान.
27 मार्च 2000: चित्रपट निर्माते व दिग्दर्शक बी. आर. चोप्रा यांना फाय फाउंडेशनतर्फे राष्ट्रभूषण पुरस्कार जाहीर.
जन्म (27 MARCH)
27 मार्च 1785: फ्रान्सचा राजा लुई (सतरावा) यांचा जन्म. (मृत्यू: ८ जून १७९५)
27 मार्च 1845: नोबेल पारितोषिक विजेते जर्मन भौतिकशास्त्रज्ञ विलहेम राँटजेन यांचा जन्म. (मृत्यू: १० फेब्रुवारी १९२३)
27 मार्च 1863: रोल्स-रॉइस लिमिटेड चे निर्माते हेन्री रॉयस यांचा जन्म. (मृत्यू: २२ एप्रिल १९३३)
27 मार्च 1901: डोनाल्ड डक चे हास्यचित्रकार कार्ल बार्क्स यांचा जन्म. (मृत्यू: २५ ऑगस्ट २०००)
मृत्यू (27 MARCH)
27 मार्च 1898: भारतीय शिक्षणतज्ञ, समाजसुधारक आणि तत्त्ववेत्ते सर सय्यद अहमद खान यांचे निधन. (जन्म: १७ ऑक्टोबर १८१७)
27 मार्च 1952: टोयोटा मोटर कंपनीचे संस्थापक काइचिरो टोयोटा यांचे निधन. (जन्म: ११ जून १८९४)
27 मार्च 1967: नोबेल पारितोषिक विजेते झेक रसायनशास्त्रज्ञ जेरोस्लॉव्ह हेरॉव्हस्की यांचे निधन. (जन्म: २० डिसेंबर १८९०)
27 मार्च 1968: पृथ्वीप्रदक्षिणा करणारे पहिले अंतराळवीर युरी गागारीन यांचे निधन. (जन्म: ९ मार्च १९३४)
27 मार्च 1992: साहित्यिक, गरवारे वाणिज्य महाविद्यालयाचे प्राचार्य प्रा. शरच्चंद्र वासुदेव चिरमुले यांचे निधन.
27 मार्च 1997: संगीत नाटकातील अभिनेते व गायक भार्गवराम आचरेकर यांचे निधन.
27 मार्च 2000: हिन्दी चित्रपट अभिनेत्री वेरा सुंदर सिंग तथा प्रिया राजवंश यांची चेतन आनंद यांच्या मुंबईतील रुईया पार्क येथील बंगल्यात हत्या करण्यात आली.
मार्च महिन्यातील दिनविशेष
मार्च महिन्यातील महत्त्वाच्या आणि विशेष घटना
पहिल्यांदा जागतिक महिला दिन साजरा केला गेला.दिनांक : 8 मार्च 1911
महात्मा गांधी यांनी मिठाच्या सत्याग्रहासाठी २०० मैलाच्या दांडीयात्रेला सुरवात केली.दिनांक : 12 मार्च 1930
भारतीय क्रांतिकारी भगतसिंग, राजगुरू आणि सुखदेव यांना फाशी देण्यात आली.दिनांक : 23 मार्च 1931
टाटा उद्योग समुहाचे संस्थापक भारतीय उद्योगपती जमशेदजी टाटा यांचा जन्म. (मृत्यू: १९ मे १९०४)दिनांक : 3 मार्च 1839
पहिल्या महिला शिक्षिका आणि समाज सुधारक सावित्रीबाई फुले यांचे निधन. (जन्म: ३ जानेवारी १८३१)दिनांक : 10 मार्च 1897
आधुनिक मराठी गद्याचे जनक, ग्रंथकार आणि केसरीचे एक संस्थापक विष्णूशास्त्री चिपळूणकर यांचे निधन. (जन्म: २० मे १८५०)दिनांक : 17 मार्च 1882
राष्ट्रीय बाल हक्क संरक्षण अयोग्य स्थापनादिनांक : 5 मार्च 2007
नियोजन आयोगाची स्थापनादिनांक : 15 मार्च 1950
राष्ट्रीय लसीकरण दिवसदिनांक : 16 मार्च 1955
महार वतन बिल मांडणीदिनांक : 19 मार्च 1928
आंतरराष्ट्रीय वन दिनदिनांक : 21 मार्च 2012
PETA ची स्थापनादिनांक : 22 मार्च 1980
जागतिक क्षय रोग दिनदिनांक : 24 मार्च 1962
६१ वि घटना दुरुस्ती करून मतदाराचे किमान वय २१ वर्षांवरून वरून १८ वर्षांवर वर आणण्यात आलेदिनांक : 28 मार्च 1988
क्रिप्स योजना जाहीरदिनांक : 29 मार्च 1942