५ एप्रिल दिनविशेष
5 April Dinvishesh For MPSC / UPSC and Any Competitive Exam. You can use following search box to find out more dinvishesh by just typing day along with the month number. (eg. If you want to search for 15th August then type 15-08).
जानेवारी
फेब्रुवारी
मार्च
एप्रिल
मे
जून
जुलै
ऑगस्ट
सप्टेंबर
ऑक्टोबर
नोव्हेंबर
डिसेंबर
५ एप्रिल महत्वाच्या घटना
〉
१६६३: दहा हजार फौजेसह पुण्याच्या लाल महालात तळ देऊन राहिलेला मोगल सुभेदार शाहिस्तेखान याच्यावर शिवाजी महाराजांनी दोनशे स्वारांसह अकस्मात छापा घातला. शाहिस्तेखान खिडकीतुन पळून गेल्याने बचावला; मात्र पळुन जाण्याच्या प्रयत्नात त्याची तीन बोटे तुटली. या प्रसं
〉
१६७९: राजारामास पकडण्यासाठी झुल्फिकारखानाने रायगडास वेढा दिला असता राजाराम रायगडावरुन प्रतापगडास गेला. पुढे प्रतापगडासही शत्रूने वेढा दिल्यावर राजारामास पन्हाळगडावर जावे लागले.
〉
१९५७: कम्युनिस्ट पक्षाने भारतात प्रथमच केरळमध्ये निवडणूका जिंकल्या आणि इ. एम. एस. नंबुद्रीपाद हे केरळचे मुख्यमंत्री झाले.
〉
२०००: अभिनेत्री सुलोचना यांच्या हस्ते डी. डी. – १० या मराठी उपग्रह वाहिनीचे सह्याद्री असे नामकरण करण्यात आले.
〉
२०००: जळगाव नगरपालिकेच्या १७ माजली इमारतीचे उद्घाटन.
〉
१९९९: राष्ट्रीय समुद्री दिवस भारताच्या मालकीचं पहिलं जहाज एस.एस. लॉयल्टी लंडनला रवाना झालं.
५ एप्रिल जन्म
〉
१८२७: निर्जंतुकीकरणामुळे जखमा लवकर बर्या होतात हे सिध्द करणारा ब्रिटिश शल्यविशारद सर जोसेफ लिस्टर यांचा जन्म. (मृत्यू: १० फेब्रुवारी १९१२)
〉
१८५६: अमेरिकन निग्रोंच्या प्रश्नासाठी कार्य करणारे समाजसेवक, लेखक, वक्ते व शिक्षणतज्ञ बुकर टी. वॉशिंग्टन यांचा जन्म. (मृत्यू: १४ नोव्हेंबर १९१५)
〉
१९०८: स्वातंत्र्यसैनिक, समाजसुधारक, राजकारणी, केंद्रीय मंत्री व भारताचे उपपंतप्रधान बाबू जगजीवनराम यांचा जन्म. (मृत्यू: ६ जुलै १९८६)
〉
१९०९: जेम्स बाँड चित्रपटांचे निर्माते अल्बर्ट आर. ब्रोकोली यांचा जन्म. (मृत्यू: २७ जून १९९६)
〉
१९१६: हॉलीवूड अभिनेता ग्रेगरी पेक यांचा जन्म. (मृत्यू: १२ जून २००३)
〉
१९२०: महाराष्ट्राचे नगरविकासमंत्री आणि लोकसभा सदस्य डॉ. रफिक झकारिया यांचा जन्म. (मृत्यू: ९ जुलै २००५)
〉
१९२०: इंग्लिश कादंबरीकार आर्थर हॅले यांचा जन्म. (मृत्यू: २४ नोव्हेंबर २००४)
〉
१९६६: भारतीय-अमेरिकन अभिनेते आणि निर्माते आसिफ मांडवी यांचा जन्म.
५ एप्रिल मृत्यू
〉
१९१७: स्वातंत्र्यशाहीर शंकरराव निकम यांचे निधन.
〉
१९२२: आर्य महिला समाजच्या संस्थापिका पंडिता रमाबाई यांचे निधन. (जन्म: २३ एप्रिल १८५८)
〉
१९४०: इंग्लिश मिशनरी, महात्मा गांधींचे जवळचे मित्र, समाजसेवक आणि भारताच्या स्वातंत्र्याचे पुरस्कर्ते चार्लस फ्रिअरी तथा दीनबंधू अॅन्ड्र्यूज यांचे निधन. (जन्म: १२ फेब्रुवारी १८७१)
〉
१९६४: नकलाकार गोपाळ विनायक भोंडे यांचे निधन.
〉
१९९३: हिंदी, तामिळ आणि तेलगु चित्रपट अभिनेत्री दिव्या भारती यांचे निधन. (जन्म: २५ फेब्रुवारी १९७४)
〉
१९९६: बालगंधर्वांना पंधरा वर्षे साथ करणारे ऑर्गनवादक भालचंद्र नीळकंठ तथा बाबा पटवर्धन यांचे निधन.
〉
१९९८: चित्रपट व नाट्य अभिनेत्री रुही बेर्डे यांचे निधन.
〉
२००२: दुबईस्थित वादग्रस्त भारतीय उद्योगपती, जम्बो ग्रुपचे संचालक मनोहर राजाराम तथा मनू छाबरिया यांचे निधन.
एप्रिल महिन्यातील इतर महत्त्वाच्या आणि विशेष घटना

भारतीय रिझर्व्ह बँकेची स्थापना झाली.
दिनांक :
१ एप्रिल १९३५

गणेश वासुदेव जोशी ऊर्फ सार्वजनिक काका यांच्या प्रेरणेने पुणे सार्वजनिक सभेची स्थापना झाली.
दिनांक :
२ एप्रिल १८७०

प्रसिद्ध दांडीयात्रेनंतर गांधीजींनी मिठाचा सत्याग्रह सुरू केला.
दिनांक :
६ एप्रिल १९३०

जागतिक आरोग्य संघटना (WHO) स्थापना झाली.
दिनांक :
७ एप्रिल १९४८

जालियनवाला बाग हत्याकांड, यात ३७९ लोक ठार तर १२०० जखमी झाले.
दिनांक :
१३ एप्रिल १९१९

भारतात प्रथमच बोरीबंदर ते ठाणे प्रवासी रेल्वे सेवा सुरू झाली.
दिनांक :
१६ एप्रिल १८५३

पहिली लोकसभा अस्तित्वात आली.
दिनांक :
१७ एप्रिल १९५२

आंध्र प्रदेशातील पोचमपल्ली खेड्यातील भूदानाने विनोबा भावे यांची भूदान चळवळ सुरू झाली.
दिनांक :
१८ एप्रिल १९५०

आर्यभट्ट हा भारताचा पहिला उपग्रह रशियन अंतराळस्थानकावरून प्रक्षेपित करण्यात आला.
दिनांक :
१९ एप्रिल १९७५

पृथ्वी दिन पहिल्यांदा साजरा करण्यात आला.
दिनांक :
२२ एप्रिल १९७०

होम रुल लीगची स्थापना झाली.
दिनांक :
२८ एप्रिल १९१६

थोर समाजसुधारक गणेश वासुदेव जोशी उर्फ सार्वजनिक काका यांचा जन्म. (मृत्यू: २५ जुलै १८८०)
दिनांक :
९ एप्रिल १८२८

: श्रेष्ठ समाजसुधारक तसेच श्रमजीवी वर्गाच्या शोषणाची दास्याची मीमांसा करणारे क्रांतिकारक विचारवंत जोतिराव गोविंदराव फुले ऊर्फ महात्मा फुले यांचा जन्म. (मृत्यू: २८ नोव्हेंबर १८९०)
दिनांक :
११ एप्रिल १८२७

समाजसुधारक पंडिता रमाबाई सरस्वती यांचा जन्म. (मृत्यू: ५ एप्रिल १९२२)
दिनांक :
२३ एप्रिल १८५८

मंगल पांडे ह्यांना फाशी झाली
दिनांक :
८ एप्रिल १८५७

गांधी चंपारण्याला आगमन
दिनांक :
१० एप्रिल १९१७

७३ वि घटनात्मक दुरुस्ती, पंचायत संस्थांना घटनात्मक संरक्षण
दिनांक :
२४ एप्रिल १९९३

जागतिक मलेरिया दिन
दिनांक :
२५ एप्रिल २००८

जागतिक मलेरिया दिन
दिनांक :
२५ एप्रिल २००८