14 MARCH DINVISHESH: Check all the latest march dinvishesh like birth, death and important events from MahaNMK.com. March Important Events is the special category which may help you in your MPSC / UPSC / Competitive exams.
मार्च दिनविशेष : "आता स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करणं झालं सोप्पं" MahaNMK आपल्यासाठी घेऊन आले आहेत Dinvishesh, सर्व महत्वाच्या दिनविशेष आपल्याला एकाच ठिकाणी उपलब्ध करून देण्यासाठी आम्ही हा नवीन उपक्रम राबवला आहे.
महत्वाच्या घटना (14 MARCH)
14 मार्च 1931: पहिला भारतीय बोलपट आलम आरा मुंबई मध्ये प्रदर्शित झाला.
14 मार्च 1954: दिल्ली येथे साहित्य अकादमीची स्थापना झाली.
14 मार्च 1967: अमेरीकेचे माजी अध्यक्ष जॉन एफ. केनेडी यांचे पार्थिव आर्लिंग्टन राष्ट्रीय दफनभूमी येथे हलविण्यात आले.
14 मार्च 2000: कलकत्ता येथील टेक्निशियन आय हा देशातील सर्वात जुना स्टुडिओ आगीच्या भक्ष्यस्थानी पडला.
14 मार्च 2001: सिक्कीममधील आदिवासी समाजातील चोकीला अय्यर यांनी भारताच्या पहिल्या महिला परराष्ट्र सचिव म्हणून सूत्रे हाती घेतली.
14 मार्च 2001: व्ही. व्ही. एस. लक्ष्मणने ईडन गार्डन वर नाबाद २७५ धावा काढून या मैदानावरील सर्वोच्च धावांचा सुनील गावसकरचा विक्रम मोडला. तसेच एका डावात ४४ चौकार मारण्याच्या डॉन ब्रॅडमन यांच्या विक्रमाची बरोबरी केली.
14 मार्च 2010: ज्येष्ठ कन्नड साहित्यिक डॉ. एस. एल. भैरप्पा यांच्या हस्ते लोकसंस्कृतीचे उपासक आणि संशोधक डॉ. रा. चिं. ढेरे यांना पुण्यभूषण पुरस्कार पुण्यात देण्यात आला.
जन्म (14 MARCH)
14 मार्च 1874: फिलिप्स इलेक्ट्रॉनिक्स कंपनी चे सहसंस्थापक आंतोन फिलिप्स यांचा जन्म. (मृत्यू: ७ ऑक्टोबर १९५१)
14 मार्च 1879: नोबेल पारितोषिक विजेते जर्मन आणि अमेरिकन भौतिकशास्त्रज्ञ अल्बर्ट आईनस्टाईन यांचा जन्म. (मृत्यू: १८ एप्रिल १९५५)
14 मार्च 1899: इर्विंग ओईल कंपनी चे संस्थापक के. सी. इर्विंग यांचा जन्म. (मृत्यू: १३ डिसेंबर १९९२)
14 मार्च 1908: विन्सेंट मोटारसायकल कंपनी चे संस्थापक फिलिप व्हिन्सेंट यांचा जन्म. (मृत्यू: २७ मार्च १९७९)
14 मार्च 1931: ख्यातनाम अभिनेते प्रभाकर पणशीकर यांचा जन्म. (मृत्यू: १३ जानेवारी २०११)
14 मार्च 1933: ब्रिटिश अभिनेता मायकेल केन यांचा जन्म.
14 मार्च 1961: ब्लॅकबेरी लिमिटेड चे संस्थापक माईक लाझारीडीस यांचा जन्म.
14 मार्च 1963: ऑस्ट्रेलियन क्रिकेटपटू ब्रूस रीड यांचा जन्म.
14 मार्च 1974: पार्श्वागायिका साधना घाणेकर उर्फ साधना सरगम यांचा जन्म.
14 मार्च 1972: भारतीय कवी इरोम चानू शर्मिला यांचा जन्म.
14 मार्च 1974: भारतीय दिग्दर्शक आणि सिनेमॅटोग्राफर रोहित शेट्टी यांचा जन्म.
मृत्यू (14 MARCH)
14 मार्च 1883: जर्मन तत्वज्ञ आणि कम्युनिझमचे प्रणेते कार्ल मार्क्स यांचे निधन. (जन्म: ५ मे १८१८)
14 मार्च 1932: अमेरिकन संशोधक आणि इस्टमन कोडॅक कंपनीचे संस्थापक जॉर्ज इस्टमन यांचे निधन. (जन्म: १२ जुलै १८५४)
14 मार्च 1998: अभिनेते, निर्माते आणि दिग्दर्शक दादा कोंडके यांचे निधन. (जन्म: ८ ऑगस्ट १९३२)
14 मार्च 2003: कविवर्य आणि श्रेष्ठ गझलकार सुरेश भट यांचे निधन. (जन्म: १५ एप्रिल १९३२)
14 मार्च 2010: ज्ञानपीठ विजेते लेखक आणि कवी विंदा करंदीकर यांचे निधन. (जन्म: २३ ऑगस्ट १९१८)
14 मार्च 2010: इंग्रजी सैद्धांतिक भौतिकशास्त्रज्ञ, विश्वशास्त्रज्ञ आणि लेखक जे सिद्धांत कॉस्मोलॉजी सेंटर फॉर रिसर्चचे डायरेक्टर होते.स्टीफन हॉकिंग यांचे निधन. (जन्म: ८ जानेवारी १९४२)
मार्च महिन्यातील दिनविशेष
मार्च महिन्यातील महत्त्वाच्या आणि विशेष घटना
पहिल्यांदा जागतिक महिला दिन साजरा केला गेला.दिनांक : 8 मार्च 1911
महात्मा गांधी यांनी मिठाच्या सत्याग्रहासाठी २०० मैलाच्या दांडीयात्रेला सुरवात केली.दिनांक : 12 मार्च 1930
भारतीय क्रांतिकारी भगतसिंग, राजगुरू आणि सुखदेव यांना फाशी देण्यात आली.दिनांक : 23 मार्च 1931
टाटा उद्योग समुहाचे संस्थापक भारतीय उद्योगपती जमशेदजी टाटा यांचा जन्म. (मृत्यू: १९ मे १९०४)दिनांक : 3 मार्च 1839
पहिल्या महिला शिक्षिका आणि समाज सुधारक सावित्रीबाई फुले यांचे निधन. (जन्म: ३ जानेवारी १८३१)दिनांक : 10 मार्च 1897
आधुनिक मराठी गद्याचे जनक, ग्रंथकार आणि केसरीचे एक संस्थापक विष्णूशास्त्री चिपळूणकर यांचे निधन. (जन्म: २० मे १८५०)दिनांक : 17 मार्च 1882
राष्ट्रीय बाल हक्क संरक्षण अयोग्य स्थापनादिनांक : 5 मार्च 2007
नियोजन आयोगाची स्थापनादिनांक : 15 मार्च 1950
राष्ट्रीय लसीकरण दिवसदिनांक : 16 मार्च 1955
महार वतन बिल मांडणीदिनांक : 19 मार्च 1928
आंतरराष्ट्रीय वन दिनदिनांक : 21 मार्च 2012
PETA ची स्थापनादिनांक : 22 मार्च 1980
जागतिक क्षय रोग दिनदिनांक : 24 मार्च 1962
६१ वि घटना दुरुस्ती करून मतदाराचे किमान वय २१ वर्षांवरून वरून १८ वर्षांवर वर आणण्यात आलेदिनांक : 28 मार्च 1988
क्रिप्स योजना जाहीरदिनांक : 29 मार्च 1942